< 1 Rois 18 >
1 Après bien des jours, la parole de Yahvé fut adressée à Élie, la troisième année, en ces termes: « Va, montre-toi à Achab, et je ferai tomber la pluie sur la terre. »
१तेव्हा पुष्कळ दिवसानी, तिसऱ्या वर्षी, एलीयाकडे परमेश्वराचे वचन आले, ते असे की, “जा, आणि अहाब राजाच्या नजरेत ये आणि मग मी भूमीवर पाऊस पाडणार.”
2 Élie alla se montrer à Achab. La famine était grave à Samarie.
२तेव्हा एलीया अहाबाच्या समोर जायला निघाला. तेव्हा शोमरोनात भंयकर दुष्काळ होता.
3 Achab appela Abdias, qui avait la charge de la maison. (Or Abdias craignait beaucoup Yahvé;
३अहाब राजाने आपल्या महालाचा प्रमुख ओबद्या याला बोलावणे पाठवले. पण ओबद्या परमेश्वराचा फार मान राखत असे.
4 car lorsque Jézabel avait exterminé les prophètes de Yahvé, Abdias avait pris cent prophètes, en avait caché cinquante dans une caverne, et les avait nourris de pain et d'eau).
४जेव्हा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले व त्यांच्या अन्नपाण्याचीही तरतूद केली.
5 Achab dit à Abdias: « Parcourez le pays, allez à toutes les sources d'eau et à tous les ruisseaux. Peut-être trouverons-nous de l'herbe et sauverons-nous les chevaux et les mules en vie, afin de ne pas perdre tous les animaux. »
५अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “देशातील सगळ्या पाण्याच्या ओहोळ व झऱ्यांवर जा, कदाचित खेचरे, घोडी वाचतील एवढे गवत मिळणार आणि म्हणजे सर्व पशू मरणार नाहीत.”
6 Et ils se partagèrent le pays pour le parcourir. Achab prit un chemin à part, et Abdias prit un autre chemin à part.
६तेव्हा त्या दोघांनी तो प्रदेश पाहणी करण्यास आपसांत वाटून घेतला, अहाब स्वत: हा एका वाटेने गेला व ओबद्या दुसऱ्या वाटेने गेला.
7 Comme Abdias était en chemin, voici qu'Élie le rencontra. Il le reconnut, tomba sur sa face et dit: « Est-ce toi, mon seigneur Élie? »
७आणि ओबद्या वाटेत असता, एलीया अनपेक्षीतपणे त्यास भेटला. तेव्हा ओबद्याने त्यास ओळखले व जमीनीवर उपडे पडून त्यास म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”
8 Il lui répondit: « C'est moi. Va dire à ton maître: « Voici Élie, il est là! ».
८एलीया म्हणाला, “होय, मीच आहे. आता मी इथे असल्याचे आपल्या धन्याला सांग.”
9 Il dit: « Comment ai-je péché, pour que tu livres ton serviteur entre les mains d'Achab, afin qu'il me tue?
९तेव्हा ओबद्या म्हणाला, “मी काय अपराध केला ज्यावरून तू आपल्या सेवकाला जीवे मारायला अहाबाच्या हाती देतोस?
10 L'Éternel, ton Dieu, est vivant! Il n'y a ni nation ni royaume où mon seigneur n'ait envoyé pour te chercher. Quand on a dit: « Il n'est pas ici », il a juré par le royaume et la nation qu'on ne te trouverait pas.
१०परमेश्वर तुझा देव जिवंत आहे, माझा स्वामीने सर्वत्र तुमचा शोध करायला पाठवले नसेल असे कुठलेच गाव किंवा राज्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही सापडला नाहीत, असे कळले, तेव्हा आपण सापडलात नाही अशी शपथ त्याने त्या राज्याला व राष्ट्राला घ्यायला लावली.
11 Maintenant, vous dites: « Va dire à ton maître: « Voici Élie qui est ici ».
११आणि आता तुम्ही मला म्हणता, ‘जा जाऊन तुझ्या स्वामीला सांग एलीया या ठिकाणी आहे.’
12 Il arrivera, dès que je te quitterai, que l'Esprit de Yahvé te portera je ne sais où; aussi, quand je viendrai prévenir Achab, et qu'il ne te trouvera pas, il me tuera. Mais moi, ton serviteur, j'ai craint Yahvé dès ma jeunesse.
१२तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले, तर परमेश्वराचा आत्मा तुम्हास दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. तरी मी, तुझा सेवक, लहानपणापासून परमेश्वराचे स्तवन करत आहे.
13 N'a-t-on pas raconté à mon seigneur ce que j'ai fait quand Jézabel a tué les prophètes de l'Éternel, comment j'ai caché cent hommes des prophètes de l'Éternel avec cinquante dans une caverne, et comment je les ai nourris de pain et d'eau?
१३ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा जे मी केले ते माझ्या धन्याला माहीत नाही काय? मी परमेश्वराच्या शंभर संदेष्ट्यांना पन्नास पन्नास असे गुहांमध्ये लपवले आणि त्यांना खायला प्यायला पुरवले.
14 Et maintenant, tu dis: « Va dire à ton maître: « Voici Élie », et il me tuera. Il me tuera. »
१४आणि आता तुम्ही म्हणता, ‘जा आपल्या धन्याला सांग की एलीया या ठिकाणी आहे,’ मग तो मला जीवे मारील.”
15 Élie dit: « L'Éternel des armées est vivant, devant qui je me tiens, et je me montrerai à lui aujourd'hui. »
१५यावर एलीया त्यास म्हणाला, “सैन्यांचा परमेश्वर ज्याच्या समोर मी उभा राहतो तो जिवंत आहे, मी खचित त्याच्या दृष्टीस पडेन.”
16 Abdias alla à la rencontre d'Achab et le lui dit, et Achab alla à la rencontre d'Élie.
१६तेव्हा ओबद्याने अहाबाला जाऊन सांगितले, आणि अहाब एलीयाला भेटण्यासाठी निघाला.
17 Lorsqu'Achab vit Élie, il lui dit: « Est-ce toi, le trouble-fête d'Israël? »
१७अहाबाने एलीयाला पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, “इस्राएलाला त्रस्त करून सोडणारा तूच का तो?”
18 Il répondit: « Ce n'est pas Israël que j'ai troublé, mais toi et la maison de ton père, parce que vous avez abandonné les commandements de l'Éternel et que vous avez suivi les Baals.
१८एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही तर तुम्ही आणि तुमचे वडिल यांच्यामुळे ते उद्भवलेले आहे. कारण तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून बआल दैवतांच्या मागे लागलात.
19 Maintenant, envoie et rassemble vers moi tout Israël sur la montagne du Carmel, ainsi que quatre cent cinquante des prophètes de Baal et quatre cents des prophètes d'Ashéra, qui mangent à la table de Jézabel. »
१९तर आता सर्व इस्राएलाला, बआलाच्या साडेचारशे संदेष्टे व तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. जे ईजबेल मेजावर जेवणारे यांना घेऊन कर्मेल पर्वतावर ये.”
20 Achab envoya donc chercher tous les enfants d'Israël et rassembla les prophètes sur le mont Carmel.
२०तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले.
21 Élie s'approcha de tout le peuple et dit: « Jusques à quand hésiterez-vous entre les deux camps? Si Yahvé est Dieu, suivez-le; mais si c'est Baal, suivez-le. » Les gens n'ont pas dit un mot.
२१तेव्हा एलीया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्यास अनुसरा. पण बआल खरा देव असेल तर त्यास अनुसरा.” लोक यावर एका शब्दानेही त्यास उत्तर देऊ शकले नाही.
22 Et Élie dit au peuple: « Moi, et moi seul, je suis resté comme prophète de l'Éternel; mais les prophètes de Baal sont quatre cent cinquante hommes.
२२मग एलीया लोकांस म्हणाला, “मी, मीच फक्त परमेश्वराचा संदेष्टा असा राहलो आहे, पण बआलाचे चारशेपन्नास संदेष्टे आहेत.
23 Qu'ils nous donnent donc deux taureaux; qu'ils en choisissent un pour eux, qu'ils le coupent en morceaux, qu'ils le posent sur le bois et qu'ils n'y mettent pas le feu; et moi, je préparerai l'autre taureau, je le poserai sur le bois et je n'y mettrai pas le feu.
२३तेव्हा त्यांनी आम्हांला दोन गोऱ्हे द्यावे, त्यांनी आपणासाठी त्यातून एक गोऱ्हा निवडून त्याचे तुकडे करावे व लाकडे रचून त्यावर ठेवावे, मात्र त्याखाली विस्तव पेटवू नये. मग मी दुसरा गोऱ्हा तयार करून ठेवीन व विस्तव लावणार नाही.
24 Tu invoqueras le nom de ton dieu, et moi j'invoquerai le nom de Yahvé. Le Dieu qui répond par le feu, qu'il soit Dieu. » Tout le peuple répondit: « Ce que tu dis est bien. »
२४तेव्हा तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या व मी परमेश्वराचे नाव घेईन, आणि जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.” तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले, “हे चांगले आहे.”
25 Élie dit aux prophètes de Baal: « Choisissez pour vous un taureau, et habillez-le le premier, car vous êtes nombreux; invoquez le nom de votre dieu, mais n'y mettez pas le feu. »
२५मग एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा पहिल्याने तुम्ही आपणासाठी एक गोऱ्हा निवडून घेऊन तयार करा आणि विस्तव न लावता आपल्या देवाचे नाव घ्या.”
26 Ils prirent le taureau qu'on leur avait donné, l'habillèrent et invoquèrent le nom de Baal depuis le matin jusqu'à midi, en disant: « Baal, écoute-nous! ». Mais il n'y avait pas de voix, et personne ne répondait. Ils sautèrent autour de l'autel qui avait été construit.
२६तेव्हा त्यांना दिलेला गोऱ्हा त्यांनी घेऊन तयार केला, आणि सकाळ पासून दुपारपर्यंत त्यांनी बआलाचे नाव घेऊन त्यास हाक मारून म्हटले, “हे बाला, आमच्या हाकेला उत्तर दे.” पण कसलीही वाणी नव्हती आणि उत्तर देणाराही कोणी नव्हता. जी वेदी त्यांनी बांधली होती तिच्या भोवती ते नाचू लागले.
27 À midi, Élie se moqua d'eux et dit: « Criez à haute voix, car c'est un dieu. Ou bien il est plongé dans ses pensées, ou bien il est parti quelque part, ou bien il est en voyage, ou bien il dort et il faut le réveiller. »
२७दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादयावेळी प्रवासात किंवा झोपेत असले. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करून त्यास उठवा.”
28 Ils criaient à haute voix et se coupaient sur leur chemin avec des couteaux et des lances jusqu'à ce que le sang jaillisse sur eux.
२८तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वत: वर वार करून घेतले. (ही त्यांची पूजेची पध्दत होती) त्यांचे अंग रक्ताळले.
29 Quand midi fut passé, ils prophétisèrent jusqu'au moment de l'offrande du soir; mais il n'y eut ni voix, ni réponse, et personne ne fit attention.
२९दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते भविष्य सांगत होते. पण काहीही घडले नाही बालाकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!
30 Elie dit à tout le peuple: « Approchez-vous de moi! »; et tout le peuple s'approcha de lui. Il répara l'autel de Yahvé qui avait été renversé.
३०मग एलीया सर्व लोकांस उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले.
31 Elie prit douze pierres, selon le nombre des tribus des fils de Jacob, à qui la parole de Yahvé avait été adressée en disant: « Israël sera ton nom. »
३१एलीयाने बारा दगड घेतले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबाच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबालाच परमेश्वराने इस्राएल या नावाने संबोधले होते.
32 Avec les pierres, il construisit un autel au nom de Yahvé. Il fit autour de l'autel une tranchée assez grande pour contenir deux seahs de semences.
३२परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती.
33 Il rangea le bois, coupa le taureau en morceaux et le posa sur le bois. Il dit: « Remplissez d'eau quatre jarres, et versez-la sur l'holocauste et sur le bois. »
३३एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. “गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले.”
34 Il dit: « Faites-le une seconde fois. » Et ils le firent une seconde fois. Il dit: « Faites-le une troisième fois. » Et ils le firent une troisième fois.
३४मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या होमार्पणाच्या लाकडावर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले.
35 L'eau coulait autour de l'autel; il remplit aussi d'eau la tranchée.
३५वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले.
36 Au moment de l'offrande du soir, le prophète Élie s'approcha et dit: « Yahvé, Dieu d'Abraham, d'Isaac et d'Israël, que l'on sache aujourd'hui que tu es Dieu en Israël et que je suis ton serviteur, et que j'ai fait toutes ces choses selon ta parole.
३६दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे.
37 Écoute-moi, Yahvé, écoute-moi, afin que ce peuple sache que toi, Yahvé, tu es Dieu, et que tu as ramené son cœur à la raison. »
३७हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत: जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.”
38 Le feu de l'Éternel tomba et consuma l'holocauste, le bois, les pierres et la poussière, et il lécha l'eau qui était dans le fossé.
३८तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले.
39 Quand tout le peuple vit cela, il tomba sur sa face. Ils disaient: « Yahvé, c'est Dieu! Yahvé, c'est Dieu! »
३९सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.
40 Élie leur dit: « Saisissez les prophètes de Baal! Ne laissez pas un seul d'entre eux s'échapper! » Ils s'en emparèrent, et Élie les fit descendre au torrent de Kishon, où il les tua.
४०एलीया म्हणाला, “त्या बआलाच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसटू देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.
41 Élie dit à Achab: « Lève-toi, mange et bois, car on entend le bruit d'une pluie abondante. »
४१एलीया मग अहाब राजाला म्हणाला, “जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे”
42 Et Achab monta pour manger et pour boire. Élie monta au sommet du Carmel; il se prosterna par terre et mit son visage entre ses genoux.
४२तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोंचल्यावर ओणवून, गुडघ्यात डोके घालून बसला.
43 Il dit à son serviteur: « Monte maintenant et regarde vers la mer. » Il est monté et a regardé, puis a dit: « Il n'y a rien. » Il a dit sept fois: « Vas-y encore ».
४३आणि आपल्याबरोबरच्या सेवकाला म्हणाला, “समुद्राकडे पाहा” समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला, “तिथे काहीच दिसले नाही” एलीयाने त्यास पुन्हा सात वेळेस जाऊन पाहायला सांगितले.
44 La septième fois, il dit: « Voici qu'un petit nuage, semblable à la main d'un homme, s'élève de la mer. » Il dit: « Monte, dis à Achab: « Prépare-toi et descends, pour que la pluie ne t'arrête pas. »"
४४सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, एक लहानसा, मुठीएवढा ढग मला दिसला. समुद्रावरुन तो येत होता तेव्हा एलीयाने त्या सेवकाला सांगितले, “अहाब राजाकडे जाऊन त्यास रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग. कारण तो आत्ता निघाला नाहीतर पावसामुळे त्यास थांबावे लागेल.”
45 En peu de temps, le ciel s'obscurcit de nuages et de vent, et il y eut une grande pluie. Achab monta à cheval et se rendit à Jizreel.
४५पाहता पाहता आकाश ढगांनी भरुन गेले. वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. अहाब आपल्या रथात बसून इज्रेलला परत जायला निघाला.
46 La main de Yahvé était sur Elie; il mit son manteau dans sa ceinture et courut devant Achab jusqu'à l'entrée de Jizreel.
४६परंतु एलीयावर परमेश्वराचा हात असल्यामुळे, धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरून घट्ट खोचले आणि सरळ इज्रेलपर्यंत तो अहाबाच्या पुढे धावत गेला.