< 3 Mooseksen 3 >

1 "Jos hänen uhrilahjansa on yhteysuhri, tuokoon hän, jos hän tuo raavaskarjasta härän tai lehmän, virheettömän eläimen Herran eteen.
जर कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी परमेश्वरासमोर अर्पावा.
2 Ja hän laskekoon kätensä uhriteuraansa pään päälle ja teurastakoon sen ilmestysmajan ovella; ja papit, Aaronin pojat, vihmokoot veren alttarille ympärinsä.
त्याने त्याच्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे.
3 Ja hän tuokoon yhteysuhrista uhrina Herralle sisälmyksiä peittävän rasvan ja kaiken sisälmysten rasvan
परमेश्वरास शांत्यर्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी,
4 ja molemmat munuaiset ynnä niiden päällä lantiolihaksissa olevan rasvan ja maksanlisäkkeen, joka on irroitettava munuaisten luota.
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे
5 Ja Aaronin pojat polttakoot sen alttarilla polttouhrin päällä, joka on halkojen päällä tulessa, suloisesti tuoksuvana uhrina Herralle.
व या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वरासाठी केलेले सुवासीक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे.
6 Mutta jos hän tuo uhrilahjanaan Herralle yhteysuhriksi pikkukarjasta urospuolen tai naaraspuolen, niin tuokoon virheettömän eläimen.
परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे.
7 Jos hän tuo uhrilahjanaan lampaan, niin tuokoon sen Herran eteen
जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे.
8 ja laskekoon kätensä uhriteuraansa pään päälle ja teurastakoon sen ilmestysmajan ovella, ja Aaronin pojat vihmokoot sen veren alttarille ympärinsä.
त्याने त्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोवती टाकावे.
9 Ja hän tuokoon yhteysuhrista uhrina Herralle sen rasvan, koko rasvahännän, joka on irroitettava häntänikamista, sisälmyksiä peittävän rasvan ja kaiken sisälmysten rasvan
अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.
10 ja molemmat munuaiset ynnä niiden päällä lantiolihaksissa olevan rasvan ja maksanlisäkkeen, joka on irroitettava munuaisten luota.
१०दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
11 Ja pappi polttakoon sen alttarilla uhriruokana Herralle.
११मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे.
12 Ja jos hänen uhrilahjansa on vuohi, tuokoon sen Herran eteen
१२“कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा.
13 ja laskekoon kätensä sen pään päälle ja teurastakoon sen ilmestysmajan ovella; ja Aaronin pojat vihmokoot sen veren alttarille ympärinsä.
१३त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व त्याच्या सभोवती टाकावे.
14 Ja hän tuokoon siitä uhrilahjanaan Herralle uhriksi sisälmyksiä peittävän rasvan ja kaiken sisälmysten rasvan
१४त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी.
15 ja molemmat munuaiset ynnä niiden päällä lantiolihaksissa olevan rasvan ja maksanlisäkkeen, joka on irroitettava munuaisten luota.
१५दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे.
16 Ja pappi polttakoon ne alttarilla uhriruokana, suloisesti tuoksuvana uhrina; kaikki rasva olkoon Herran oma.
१६मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा या सुवासिक शांत्यर्पणाने परमेश्वरास आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे.
17 Tämä olkoon teille ikuinen säädös sukupolvesta sukupolveen, missä asuttekin: mitään rasvaa tai verta älkää syökö."
१७तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढया कायमचा चालू राहील.”

< 3 Mooseksen 3 >