< Jeremian 18 >
1 Sana, joka tuli Jeremialle Herralta ja kuului:
१यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते आहे, ते म्हणाले:
2 "Nouse ja mene alas savenvalajan huoneeseen; siellä minä annan sinun kuulla sanani".
२“उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी तेथे तुला माझी वचने देईन.”
3 Niin minä menin alas savenvalajan huoneeseen, ja katso, hän teki työtä pyöränsä ääressä.
३म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि पाहा! तो कुंभार चाकावर काम करीत होता,
4 Ja jos astia, jota hän valmisti, meni pilalle, niinkuin savi voi mennä savenvalajan käsissä, niin hän teki siitä taas toisen astian, miten vain savenvalaja näki parhaaksi tehdä.
४पण जे मातीचे पात्र तो तयार करत होता ते त्याच्या हातात असतांनाच बिघडले, म्हणून त्याने आपले विचार बदलले आणि त्याच्या दृष्टीस चांगले वाटणारे त्याचे त्याने पुन्हा एक दुसरे पात्र तयार केले.
5 Silloin tuli minulle tämä Herran sana:
५तेव्हा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले:
6 "Enkö minä voi tehdä teille, te Israelin heimo, niinkuin tekee tuo savenvalaja, sanoo Herra. Katso, niinkuin savi on savenvalajan kädessä, niin te olette minun kädessäni, te Israelin heimo.
६परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलाच्या घराण्यांनो, तुमच्याबरोबर या कुंभार सारखे वागण्यास मी सक्षम नाही काय? अहो, इस्राएलाच्या घराण्यांनो पाहा! जशी माती कुंभाराच्या हातात असती तसे तुम्ही माझ्या हातात आहात.
7 Yhden kerran minä uhkaan temmata pois, hajottaa ja hävittää kansan ja valtakunnan;
७एखाद्यावेळी मी राष्ट्र व राज्य ह्याबद्दल बोलेल, ते बाहर काढने, फाडून टाकने किंवा नाश करणे असे बोलेल.
8 mutta jos se kansa kääntyy pois pahuudestaan, josta minä sitä uhkasin, niin minä kadun sitä pahaa, jota ajattelin tehdä sille.
८पण जर ज्या राष्ट्राविषयी मी बोललो, ते आपल्या दुष्कृत्यांपासून फिरले तर मी जे त्यांच्याविषयी करण्याचे योजिले होते त्याबद्दल अनुतापेन.
9 Toisen kerran taas minä lupaan rakentaa ja istuttaa kansan ja valtakunnan;
९आणि दुसऱ्या क्षणी, मी एखाद्या राष्ट्राबद्दल किंवा राज्याबद्दल ते बांधावे किंवा लावावे असे म्हणीन.
10 mutta jos se tekee sitä, mikä on pahaa minun silmissäni, eikä kuule minun ääntäni, niin minä kadun sitä hyvää, jota olin luvannut tehdä sille.
१०पण त्यांनी माझ्या दृष्टीमध्ये वाईट असे केले, तर मी जे चांगले सांगत होतो ते थांबवीन आणि त्यांच्यासाठी मी ते करीन.
11 Sano siis nyt Juudan miehille ja Jerusalemin asukkaille: Näin sanoo Herra: Katso, minä hankin teille onnettomuutta ja pidän neuvoa teitä vastaan. Kääntykää siis kukin pahalta tieltänne ja parantakaa vaelluksenne ja tekonne.
११तर आता, यहूदाच्या मनुष्यांशी आणि यरूशलेम येथे राहणाऱ्यांना असे सांग, की परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी तुमच्यावर संकटे आणण्याचे पाहत आहे. मी तुमच्याविरुध्द बेत आखत आहे. तेव्हा प्रत्येक आपल्या दुष्ट मार्गाविषयी पश्चाताप करा, आणि आपली मार्गे व आपली कर्मे नीट करा.
12 Mutta he vastaavat: 'Se on turhaa! Sillä me vaellamme omien neuvojemme mukaan, ja me teemme kukin oman pahan sydämensä paatumuksen mukaan.'"
१२पण ते म्हणतात, आशा नाही, यास्तव आपण आपल्या योजनांनुसार कार्य करूया. आम्ही प्रत्येक आपल्या दुष्ट हृदयाच्या इच्छेप्रमाणे वागू.
13 Sentähden, näin sanoo Herra: "Kysykää kansojen keskuudessa, kuka on tämänkaltaista kuullut? Ylen kauhistuttavia tekoja on tehnyt neitsyt Israel.
१३यास्तव परमेश्वर असे म्हणतो: दुसऱ्या राष्ट्रांना विचारा, या अशा गोष्टी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का? इस्राएलाच्या कुमारीने भयंकर असे काम केले आहे.
14 Luopuuko aukealta kalliolta Libanonin lumi? Ehtyvätkö kaukaa virtaavat vedet, kylmät, kuohuvaiset?
१४लबानोन पर्वतांवरचे बर्फ शिखरावरील खडकाला कधी सोडील काय? दूर पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी कधी आटेल काय?
15 Mutta minun kansani on unhottanut minut, he polttavat uhreja turhille jumalille. Nämä ovat saaneet heidät kompastumaan teillänsä, ikivanhoilla poluilla, niin että he ovat joutuneet kulkemaan syrjäpolkuja, raivaamatonta tietä.
१५पण माझे लोक मला विसरले आहेत, ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात आणि आपल्या मार्गात अडखळणे करतात. त्यांनी पूर्वजांच्या जुन्या वाटा सोडून ते आडवळणाने चालतात.
16 Niin he tekevät maansa kauhistukseksi, ikuiseksi ivan vihellykseksi. Jokainen, joka ohitse kulkee, kauhistuu ja pudistaa päätänsä.
१६यास्तव जे राष्ट्र भयानक आणि सर्वकाळासाठी फुत्काराची गोष्ट असा होईल. तिच्याजवळून जाणारा प्रत्येक हादरेल आणि आपले डोके हालवेल.
17 Niinkuin itätuuli minä hajotan heidät vihollisen edessä; minä näytän heille selkäni enkä kasvojani heidän hätänsä päivänä."
१७मी त्यांना पूर्वेचा वारा उडवतो तसे त्यांच्या वैऱ्यांपुढे उडवीन. त्यांच्या संकटाच्या समयी मी त्यांना मुख दाखवणार नाही तर पाठ दाखवीन.”
18 Mutta he sanoivat: "Tulkaa, pitäkäämme neuvoa Jeremiaa vastaan. Sillä ei laki lopu papilta, ei neuvo viisaalta eikä sana profeetalta. Tulkaa, lyökäämme hänet kielellä, älkäämme kuunnelko lainkaan hänen puheitansa."
१८तेव्हा ते लोक म्हणाले, “या आपण यिर्मयाविरूद्ध योजना करु, कारण याजकापासून नियमशास्त्र, ज्ञानी लोकांकडून सल्ला, आणि संदेष्ट्यांपासून येणारे वचन हे नष्ट होणार नाहीत. चला आपण त्यास शब्दांचा मारा देऊ, आणि तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नाही.”
19 Kuuntele sinä, Herra, minua ja kuule, mitä minun vastustajani puhuvat.
१९हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे! आणि माझ्या वैऱ्यांचा आवाज ऐक.
20 Onko hyvä pahalla kostettava, sillä he ovat kaivaneet minulle kuopan? Muista, kuinka minä olen seisonut sinun edessäsi ja puhunut hyvää heidän puolestansa, kääntääkseni pois sinun vihasi heistä.
२०त्यांच्यासाठी चांगले असून पण, अरिष्ट हेच माझी परतफेड असणार काय? कारण त्यांनी माझ्या जीवासाठी खड्डा खोदला आहे. त्यांच्या कल्याणासाठी बोलायला आणि तुझा क्रोध त्यांच्यापासून फिरवायला मी तुझ्यासमोर कसा उभा राहिलो ते आठव.
21 Sentähden jätä heidän lapsensa nääntymään nälkään ja anna heidät alttiiksi miekalle, ja tulkoot heidän vaimonsa lapsettomiksi ja leskiksi, heidän miehensä surmatkoon rutto, ja heidän nuorukaisensa kaatakoon sodassa miekka.
२१यास्तव त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड, आणि तलवार या कडे त्यांना सोपवून दे. त्यांच्या स्त्रिया वांझ आणि विधवा होवोत, आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जावोत, युद्धात तेथील तरुण मारले जावोत.
22 Kuulukoon huuto heidän huoneistansa, kun sinä äkkiä tuot heidän kimppuunsa rosvojoukon. Sillä he ovat kaivaneet kuopan pyydystääkseen minut ja virittäneet salaa pauloja minun jaloilleni.
२२तू त्यांच्यावर अचानक टोळी आणशील तेव्हा त्यांच्या घरातून आरोळी ऐकू येवो, कारण त्यांनी माझ्या पायाकरीता सापळा रचला आहे आणि मला पकडण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे.
23 Mutta sinä, Herra, tiedät kaikki heidän murha-aikeensa minua vastaan. Älä anna anteeksi heidän rikostansa äläkä pyyhi pois heidän syntiänsä kasvojesi edestä. Kaatukoot he sinun kasvojesi edessä. Tee tämä heille vihasi aikana.
२३परमेश्वरा, मला मारण्यासाठी त्यांनी रचलेले बेत तुला माहीत आहेतच. त्यांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करु नकोस. त्यांची पापे पुसून टाकू नकोस. त्याऐवजी ते तुझ्यासमोरुन फेकले जावोत, तू रागाच्या समयी त्यांच्याविरुद्ध कार्य कर.