< Jaakobin 5 >
1 Kuulkaa nyt, te rikkaat: itkekää ja vaikeroikaa sitä kurjuutta, joka on teille tulossa.
१धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
2 Teidän rikkautenne on mädännyt, ja teidän vaatteenne ovat koin syömät;
२तुमची संपत्ती नाश पावली आहे व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.
3 teidän kultanne ja hopeanne on ruostunut, ja niiden ruoste on oleva todistuksena teitä vastaan ja syövä teidän lihanne niinkuin tuli. Te olette koonneet aarteita viimeisinä päivinä.
३तुमचे सोनेचांदी मातीमोल झाले आहे. त्याच्यावर चढलेला थर तुमच्याविरुध्द साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. तुम्ही शेवटल्या दिवसांसाठी धन साठवून ठेवले आहे.
4 Katso, työmiesten palkka, jonka te vainioittenne niittäjiltä olette pidättäneet, huutaa, ja leikkuumiesten valitukset ovat tulleet Herran Sebaotin korviin.
४पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दुःख करीत आहे आणि ते रडणे सैन्याच्या परमेश्वराच्या कानी पोहोचले आहे.
5 Te olette herkutelleet maan päällä ja hekumoineet, te olette sydäntänne syötelleet teurastuspäivänä.
५जगात असताना तुम्ही चैनबाजी व विलास केला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या सारखे तुम्ही पुष्ट झालात.
6 Vanhurskaan te olette tuominneet ja tappaneet; hän ei vastusta teitä.
६जे लोक तुम्हास काहीही विरोध करीत नाही अशा नीतिमान लोकांस तुम्ही दोषी ठरवले आहे आणि त्यांची हत्या केली आहे.
7 Niin olkaa kärsivällisiä, veljet, Herran tulemukseen asti. Katso, peltomies odottaa maan kallista hedelmää, kärsivällisesti sitä vartoen, kunnes saa syksyisen sateen ja keväisen.
७यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.
8 Olkaa tekin kärsivällisiä, vahvistakaa sydämenne, sillä Herran tulemus on lähellä.
८तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. तुमचे अंतःकरण बळकट करा कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.
9 Älkää huokailko, veljet, toisianne vastaan, ettei teitä tuomittaisi; katso, tuomari seisoo ovella.
९बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा, न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे.
10 Ottakaa, veljet, vaivankestämisen ja kärsivällisyyden esikuvaksi profeetat, jotka ovat puhuneet Herran nimessä.
१०बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व धीराविषयी उदाहरण घ्या.
11 Katso, me ylistämme autuaiksi niitä, jotka ovat kestäneet; Jobin kärsivällisyyden te olette kuulleet, ja lopun, jonka Herra antaa, te olette nähneet. Sillä Herra on laupias ja armahtavainen.
११त्यांनी दुःखसहन केले म्हणून आपण त्यांना धन्य म्हणतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोसुध्दा पाहिला आहे, तो असा की प्रभू फार दयाळू आणि कनवाळू आहे.
12 Mutta ennen kaikkea, veljeni, älkää vannoko, älkää taivaan kautta älkääkä maan, älkää mitään muutakaan valaa; vaan "on" olkoon teillä "on", ja "ei" olkoon teillä "ei", ettette joutuisi tuomion alle.
१२माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका; स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणायचे तर होयच म्हणा. तुम्हास नाही म्हणायचे तर नाहीच म्हणा.
13 Jos joku teistä kärsii vaivaa, niin rukoilkoon; jos joku on hyvillä mielin, veisatkoon kiitosta.
१३तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे.
14 Jos joku teistä sairastaa, kutsukoon tykönsä seurakunnan vanhimmat, ja he rukoilkoot hänen edestään, voidellen häntä öljyllä Herran nimessä.
१४तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे
15 Ja uskon rukous pelastaa sairaan, ja Herra antaa hänen nousta jälleen; ja jos hän on syntejä tehnyt, niin ne annetaan hänelle anteeksi.
१५विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील.
16 Tunnustakaa siis toisillenne syntinne ja rukoilkaa toistenne puolesta, että te parantuisitte; vanhurskaan rukous voi paljon, kun se on harras.
१६म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
17 Elias oli ihminen, yhtä vajavainen kuin mekin, ja hän rukoili rukoilemalla, ettei sataisi; eikä satanut maan päällä kolmeen vuoteen ja kuuteen kuukauteen.
१७एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही.
18 Ja hän rukoili uudestaan, ja taivas antoi sateen, ja maa kasvoi hedelmänsä.
१८मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजवले.
19 Veljeni, jos joku teistä eksyy totuudesta ja hänet joku palauttaa,
१९माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्यास परत आणले तर पापी मनुष्यास चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो.
20 niin tietäkää, että joka palauttaa syntisen hänen eksymyksensä tieltä, se pelastaa hänen sielunsa kuolemasta ja peittää syntien paljouden.
२०तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापांची रास झाकील.