< Psalmien 17 >
1 Davidin rukous. Kuule, Herra, oikeutta, havaitse minun huutoni, ota vaari minun rukouksestani, joka ei viekkaasta suusta lähde.
१दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे! माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे.
2 Puhu sinä minun asiassani, ja sinun silmäs katsokaan oikeutta.
२तुझ्या उपस्थितीत माझा न्याय कर; जे खरे ते तुझे डोळे पाहोत.
3 Sinä koettelet minun sydämeni, ja etsiskelet sitä yöllä, ja tutkit minua, ja et mitään löydä; minä olen aikonut, ettei minun suuni missäkään riko.
३तू माझे हृदय पारखले आहे, रात्री तू झडती घेतली आहेस, तू मला गाळून पाहिले आहे, तरी तुला काही सापडत नाही, माझे तोंड पाप करणार नाही असा निश्चय मी केला आहे.
4 Minä varjelen minuni sinun huultes sanoissa, ihmisten töistä, murhaajan tiellä.
४मानवजातीच्या कृत्यांसंबंधित, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे.
5 Hallitse minun käyntöni poluillas, ettei minun askeleeni liukahtaisi.
५माझ्या पावलांनी तुझे मार्ग घट्ट धरले आहेत, माझे पाय घसरले नाहीत.
6 Minä huudan sinua, ettäs, Jumala, minua kuulisit: kallista korvas minun puoleeni, kuule minun puheeni.
६देवा, मी तुला हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझे बोलने ऐक.
7 Osoita ihmeellinen hyvyytes, sinä niiden vapahtaja, jotka sinuun uskaltavat, niitä vastaan, jotka sinun oikiaa kättäs vastaan ovat.
७जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव.
8 Varjele minua niinkuin silmäterää: suojele minua siipeis varjon alla.
८तुझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण कर; मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव.
9 Jumalattomista, jotka minua hävittävät, vihollisistani, jotka minun sieluuni piirittävät.
९वाईट लोक जे माझ्यावर हल्ला करतात, माझे शत्रू ज्यांनी मला घेरले आहे, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
10 Heidän lihavansa yhtä pitävät: he puhuvat suullansa ylpiästi.
१०त्यांना कोणाची दया येत नाही, त्यांचे मुख गर्वाने बोलते.
11 Kuhunka me menemme, niin he meitä piirittävät: siihen he silmänsä tarkoittavat meitä kukistaaksensa maahan,
११त्यांनी माझ्या पावलांना घेरले आहे, मला भूमीवर पाडावयास ते आपली दृष्टी लावत आहेत.
12 Niinkuin jalopeura saalista himoitsee, niinkuin nuori jalopeura, joka luolasta väijyy.
१२एखाद्याचा बळी घेण्यास उत्सुक असणाऱ्या सिंहासारखे ते आहेत, जसा तरुण सिंह जो लपून बसला आहे.
13 Nouse, Herra, ennätä hänen kasvonsa, ja polje häntä; vapahda minun sieluni miekallas jumalattomista,
१३परमेश्वरा, ऊठ! त्यांच्यावर हल्ला कर! त्यांच्या तोंडावर त्यांना पाड! तुझ्या तलवारीने तू माझा जीव दुष्टापासून वाचव.
14 Sinun kädelläs ihmisistä, Herra, tämän maailman ihmisistä, joiden osa on tässä elämässä, ja joiden vatsan sinä täytät tavarallas: heidän lapsensa ravitaan, ja he jättävät tähteensä lapsukaisillensa.
१४परमेश्वरा, ज्यांचे वैभव या जीवनातच आहे, आणि ज्यांचे पोट तू आपल्या धनाने भरतोस, अशा मनुष्यांपासून तू आपल्या हाताने मला वाचव. ते आपल्या संततीने तृप्त आहेत, आणि ते आपले उरलेले द्रव्य आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवतात.
15 Mutta minä saan nähdä sinun kasvos vanhurskaudessa: minä ravitaan herättyäni sinun kuvas jälkeen.
१५मी न्यायीपणात तुझे मुख पाहीन, जेव्हा मी जागा होईन, तेव्हा तुझ्या दर्शनाने मी समाधानी होईन.