< Ijob 6 >
1 Ijob respondis kaj diris:
१नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
2 Se estus pesita mia ĉagreno, Kaj samtempe estus metita sur la pesilon mia suferado,
२“अहो, जर तुम्ही फक्त माझ्या यातना तोलल्या, जर माझ्या शोकाला तराजूत मोजले.
3 Ĝi estus nun pli peza, ol la sablo ĉe la maroj; Pro tio miaj vortoj estas plenaj de plendo.
३तर ते आता समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे. यामुळेच काय माझे शब्द व्यर्थ आहे.
4 Ĉar la sagoj de la Plejpotenculo estas en mi, Ilian venenon trinkas mia spirito; La teruraĵoj de Dio direktiĝis sur min.
४त्या सर्वशक्तिमानाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या प्राण विषाला पिऊन घेत आहे, देवाने स्वतः त्याची दहशत माझ्या विरुध्द सज्ज केली आहे
5 Ĉu krias sovaĝa azeno sur herbo? Ĉu bovo blekas kolere ĉe sia manĝaĵo?
५वनातील गाढवाला गवत मिळाल्यावर ते ओरडते काय? किंवा गव्हाणीत चारा असता बैल भुकेने हबंरतो काय?
6 Ĉu oni manĝas sengustaĵon sen salo? Ĉu havas guston la albumeno de ovo?
६ज्याला चव नाही असे मिठाशिवाय खातात काय? किंवा अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव असते काय?
7 Kion ne volis tuŝi mia animo, Tio nun estas abomeninde mia manĝaĵo.
७ज्याला मी स्पर्श करण्यास नाकारले, ते माझ्यासाठी तिरस्करणीय अन्न झाले.
8 Ho, se mia peto plenumiĝus, Kaj se Dio donus al mi tion, kion mi esperas!
८अहो, माझ्या विनंती प्रमाणे मला मिळाले आणि माझी आशा देव पूर्ण करील तर किती बरे! ज्या गोष्टी हव्यात त्या देवाने मला दिल्या असत्या.
9 Ho, se Dio komencus kaj disbatus min, Donus liberecon al Sia mano kaj frakasus min!
९जर देवाच्या ईच्छेत आले तर त्याने मला चिरडून टाकावे, त्याने आपला हात मजवरून काढून घ्यावा आणि या जीवनातून मला मुक्त करावे.
10 Tio estus ankoraŭ konsolo por mi; Kaj mi ĝojus, se en la turmento Li ne kompatus, Ĉar mi ne forpuŝis ja la vortojn de la Sanktulo.
१०तशाने माझ्या दुःखाचा परीहार होईल, जरी मी त्रासात असतो तरी मी दुःखात आनंद करीन, कारण जो पवित्र आहे त्याचे शब्द मी कधीही नाकारले नाही.
11 Kio estas mia forto, ke mi persistu? Kaj kia estas mia fino, ke mi havu paciencon?
११माझी काय शक्ती आहे की मी वाट पाहण्याचा प्रयत्न करू? माझा अंत काय, कि मी स्वतःला आवरून धरू?
12 Ĉu mia forto estas forto de ŝtonoj? Ĉu mia karno estas kupro?
१२माझी शक्ती पाषाणासारखी आहे काय? किंवा माझे शरीर पितळेचे बनलेले आहे काय?
13 Mi havas ja nenian helpon, Kaj savo estas forpuŝita for de mi.
१३माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय, आणि ज्ञान माझ्यापासून हिरावून घेण्यात आले नाही काय?
14 Al malfeliĉulo decas kompato de amiko, Eĉ se li forlasas la timon antaŭ la Plejpotenculo.
१४कमजोर व्यक्तीवर संकट आले, त्याने सर्वशक्तिमान देवाचे भय धरणे सोडून दिले, तरी सुद्धा त्याच्या मित्राने विश्वासूपण दाखवावा.
15 Miaj fratoj trompas kiel torento, Kiel akvaj fluegoj, kiuj pasas,
१५बंधूनो, तुम्ही माझ्यासाठी वाळवंटी प्रदेशासमान व कधी न वाहणाऱ्या ओढ्याप्रमाणे आहात.
16 Kiuj estas malklaraj pro glacio, En kiuj kaŝas sin neĝo;
१६त्याच्यावर बर्फ असल्या कारणाने ते गढूळ झाले आणि जे बर्फामध्ये स्वतःला लपवितात असे तुम्ही आहात.
17 En la tempo de degelo ili malaperas, En la tempo de varmego ili forŝoviĝas de sia loko.
१७जेव्हा ते बाहेर फेकले जातात ते नष्ट होतात, जेव्हा उष्णता वाढते ते जागेवरच वितळून जातात.
18 Ili forklinas la direkton de sia vojo, Iras en la dezerton, kaj malaperas.
१८त्यांचा गट त्यांच्या मार्गाने प्रवास करीत असता ते पाण्यासाठी बाजूला वळतात ते सुकलेल्या प्रदेशात भटकतात आणि नंतर नाश पावतात.
19 Serĉas ilin per sia rigardo la vojoj de Tema, Esperas je ili la karavanoj el Ŝeba;
१९तेमाच्या गटाने तेथे तपास केला. शबाच्या काफिल्याने आशेने त्याचा शोध घेतला.
20 Sed ili hontas pro sia fido; Ili aliras, kaj ruĝiĝas de honto.
२०त्याची अपेक्षाभंग झाली कारण त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती, ते तेथे गेले परंतु ते तेथे फसले.
21 Nun vi neniiĝis; Vi ekvidis teruraĵon, kaj ektimis.
२१आता तुम्ही मित्र माझ्यासाठी काहीच नाही, तुम्ही माझी भयानक परिस्थिती पाहीली आणि घाबरून गेला आहात.
22 Ĉu mi diris: Donu al mi, El via havaĵo donacu pro mi,
२२मला काही द्या असे मी म्हणालो का? किंवा आपल्या संपत्तीतून मला काही बक्षीस द्या?
23 Savu min el la mano de premanto, Aŭ liberigu min el la mano de turmentantoj?
२३किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा? किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का?
24 Instruu min, kaj mi eksilentos; Komprenigu al mi, per kio mi pekis.
२४आता तुम्ही मला समज द्या आणि मी शांत होईन. माझी काय चूक झाली ते मला दाखवा.
25 Kial vi mallaŭdas pravajn vortojn? Kaj kion povas instrui la moralinstruanto el vi?
२५प्रामाणिक शब्द किती दु: ख देणारे असतात! परंतु तुमचे वादविवाद, मला कसे धमकावतील?
26 Ĉu vi intencas riproĉi pro vortoj? Sed paroloj de malesperanto iras al la vento.
२६तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का? निराश करणाऱ्या मनुष्याचे शब्द वाऱ्यासारखे आहेत का?
27 Eĉ orfon vi atakus, Kaj sub via amiko vi fosus.
२७खरोखर, पोरक्या मुलांवर जुगार खेळता, आणि तुम्ही व्यापाऱ्यासारखे मित्रांबरोबर घासाघीस करता.
28 Nun, ĉar vi komencis, rigardu min; Ĉu mi mensogos antaŭ via vizaĝo?
२८पण आता माझ्याकडे लक्षपूर्वक पाहा. खात्रीने मी तुमच्या तोंडासमोर खोटे बोलणार नाही.
29 Rigardu denove, vi ne trovos malpiaĵon; Ripetu, vi trovos mian pravecon en la afero.
२९मी तुम्हास विनंती करतो तुम्ही आता कडक धोरण सोडून द्या तुमच्याबरोबर अन्याय होणार नाही. खरोखर, कडक धोरण सोडून द्या, कारण माझे ध्येय नितीचे आहे.
30 Ĉu estas peko sur mia lango? Ĉu mia palato ne komprenas tion, kio estas malbona?
३०माझा जीभेवर काही वाईट आहे काय? माझ्या तोंडाला अर्धमाचा फरक समजत नाही काय?”