< Ijob 17 >

1 Mia spirito senfortiĝis, miaj tagoj mallongiĝis, Tomboj estas antaŭ mi.
“माझा आत्मा भंगला आहे आणि माझे दिवस संपले आहे, कबर माझ्यासाठी तयार आहे.
2 Mokado min ĉirkaŭas; En aflikto pro tio restas mia okulo.
खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत, माझे डोळे नियमीत त्यांचे भडकणे पाहत राहतात.
3 Estu Vi mem mia garantianto antaŭ Vi; Alie kiu donos la manon pro mi?
मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तूच मला जामीन हो, दुसरे कोणीही नाही जो मला मदत करील?
4 Ĉar ilian koron Vi kovris kontraŭ prudento; Tial Vi ne donos al ili triumfon.
तू माझ्या मित्रांची मने समजण्यास बंद करून टाकलीस, तरीही तू त्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस.
5 Se iu fanfaronas antaŭ siaj amikoj pri sia parto, La okuloj de liaj infanoj konsumiĝos.
जो आपल्या मित्रांशी धोका करून त्यास लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, त्याच्या मुलांचे डोळे जातील.
6 Li faris min proverbo por la popoloj; Kaj mi fariĝis homo, al kiu oni kraĉas en la vizaĝon.
त्याने माझे नाव सर्व लोकांसाठी निंदा असे केले आहे. ते माझ्या तोंडावर थुंकतात.
7 Mia okulo mallumiĝis de ĉagreno, Kaj ĉiuj miaj membroj fariĝis kiel ombro.
दु: ख आणि यातना यांनी माझे डोळे अंधुक झाले आहेत, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
8 La justuloj eksentos teruron pro tio, Kaj la senkulpulo ekscitiĝos kontraŭ la hipokritulo.
यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत. देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात.
9 Tamen la virtulo forte konservos sian vojon, Kaj la purmanulo pli firmiĝos.
पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिकाधिक सामर्थ्यवान होत जाईल.
10 Kaj kiom ajn vi ĉiuj revenos, Mi ne trovos inter vi saĝulon.
१०पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या तुमच्यापैकी कोणीही विद्वान नाही.
11 Miaj tagoj forpasis, pereis miaj intencoj, Kiujn havis mia koro.
११माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली.
12 La nokton ili volas fari tago, La lumon alproksimigi al la mallumo.
१२माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे असे ते म्हणतात.
13 Se mi atendas, tamen Ŝeol estas mia domo, En la mallumo estas pretigita mia lito. (Sheol h7585)
१३थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो. (Sheol h7585)
14 Al la kavo mi diras: Vi estas mia patro; La vermojn mi nomas mia patrino kaj mia fratino.
१४जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप किड्यांना म्हणालो तू माझी आई किंवा माझी ‘बहीण’
15 Kion mi devas atendi? Kiu atentos mian esperon?
१५तर आता माझी आशा कोठे आहे? माझ्या आशेविषयी, म्हणाल तर ती कोणाला दिसेल?
16 En la profundon de Ŝeol ĝi malsupreniros, Ni ambaŭ kune kuŝos en la polvo. (Sheol h7585)
१६माझी आशा माझ्याबरोबरच मृत्युलोकात जाईल तेव्हा मातीत एकदाच आम्हास विसावा मिळते.” (Sheol h7585)

< Ijob 17 >