< Numbers 30 >
1 And Moses speaketh unto the heads of the tribes of the sons of Israel, saying, 'This [is] the thing which Jehovah hath commanded:
१मोशे इस्राएलाच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने जी काही आज्ञा दिली ती ही आहे.
2 'When a man voweth a vow to Jehovah, or hath sworn an oath to bind a bond on his soul, he doth not pollute his word; according to all that is going out from his mouth he doth.
२जर एखाद्याने परमेश्वरास नवस केला किंवा शपथपूर्वक स्वतःला वचनाने बंधन घालून घेतले तर त्याने ते मोडू नये. जे त्याच्या मुखातून निघाले ते सर्व वचने त्याने पाळावे.
3 'And when a woman voweth a vow to Jehovah, and hath bound a bond in the house of her father in her youth,
३एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात राहत असेल आणि तिने परमेश्वरास खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.
4 and her father hath heard her vow, and her bond which she hath bound on her soul, and her father hath kept silent at her, then have all her vows been established, and every bond which she hath bound on her soul is established.
४जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
5 'And if her father hath disallowed her in the day of his hearing, none of her vows and her bonds which she hath bound on her soul is established, and Jehovah is propitious to her, for her father hath disallowed her.
५पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. परमेश्वर तिला क्षमा करील.
6 'And if she be at all to a husband, and her vows [are] on her, or a wrongful utterance [on] her lips, which she hath bound on her soul,
६आणि ती नवऱ्याकडे असता जर तिचे नवस असले किंवा ज्याकडून तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील.
7 and her husband hath heard, and in the day of his hearing, he hath kept silent at her, then have her vows been established, and her bonds which she hath bound on her soul are established.
७तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी.
8 'And if in the day of her husband's hearing he disalloweth her, then he hath broken her vow which [is] on her, and the wrongful utterance of her lips which she hath bound on her soul, and Jehovah is propitious to her.
८पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाहीतर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले. तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
9 'As to the vow of a widow or cast-out woman, all that she hath bound on her soul is established on her.
९विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वरास वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
10 'And if [in] the house of her husband she hath vowed, or hath bound a bond on her soul with an oath,
१०आणि जर लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असता परमेश्वरास काही नवस केला असेल,
11 and her husband hath heard, and hath kept silent at her — he hath not disallowed her — then have all her vows been established, and every bond which she hath bound on her soul is established.
११तिच्या नवऱ्याने ते ऐकून काही बोलला नाही आणि ते पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिचे नवस कायम राहतील.
12 'And if her husband doth certainly break them in the day of his hearing, none of the outgoing of her lips concerning her vows, or concerning the bond of her soul, is established — her husband hath broken them — and Jehovah is propitious to her.
१२पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाहीतर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्यास महत्व नाही. तिचा पती वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील.
13 'Every vow and every oath — a bond to humble a soul — her husband doth establish it, or her husband doth break it;
१३लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वरास काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल.
14 and if her husband certainly keep silent at her, from day unto day, then he hath established all her vows, or all her bonds which [are] upon her; he hath established them, for he hath kept silent at her in the day of his hearing;
१४पती यापैकी कोणत्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कोणत्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो.
15 and if he doth at all break them after his hearing, then he hath borne her iniquity.'
१५पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधांची शिक्षा त्याने भोगावी.
16 These [are] the statutes which Jehovah hath commanded Moses between a man and his wife, between a father and his daughter, in her youth, [in] the house of her father.
१६परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. एक पुरुष आणि त्याची पत्नी यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.