< 1 Samuel 18 >
1 And it cometh to pass, when he finisheth to speak unto Saul, that the soul of Jonathan hath been bound to the soul of David, and Jonathan loveth him as his own soul.
१तेव्हा असे झाले की, दावीदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता, योनाथानाचा जीव दावीदाच्या जिवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जिवा सारखी त्याच्यावर प्रीती करू लागला होता.
2 And Saul taketh him on that day, and hath not permitted him to turn back to the house of his father.
२त्या दिवशी शौलाने त्यास ठेवून घेतले आणि त्यास त्याच्या वडिलाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही.
3 And Jonathan maketh — also David — a covenant, because he loveth him as his own soul,
३मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता.
4 and Jonathan strippeth himself of the upper robe which [is] upon him, and giveth it to David, and his long robe, even unto his sword, and unto his bow, and unto his girdle.
४योनाथानाने आपल्या अंगातील जो झगा होता तो काढून दावीदाला दिला आणि आपले अंग वस्त्रे आणि आपली तलवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद ही त्यास दिला.
5 And David goeth out whithersoever Saul doth send him; he acted wisely, and Saul setteth him over the men of war, and it is good in the eyes of all the people, and also in the eyes of the servants of Saul.
५तेव्हा शौल दावीदाला जेथे जेथे पाठवी तेथे तेथे तो चतुराईने वागत असे. शौलाने त्यास लढाईच्या मनुष्यांवर नेमिले आणि तो शौलाच्या चाकराच्या दृष्टीतही तो मान्य झाला.
6 And it cometh to pass, in their coming in, in David's returning from smiting the Philistine, that the women come out from all the cities of Israel to sing — also the dancers — to meet Saul the king, with tabrets, with joy, and with three-stringed instruments;
६मग असे झाले की, ते त्या पलिष्ट्याला मारून माघारी आले, तेव्हा स्त्रिया इस्राएलच्या सर्व नगरातून गात व नाचत, डफ व झांज वाजवीत शौल राजाची भेट घ्यावयास निघाल्या.
7 and the women answer — those playing, and say, 'Saul hath smitten among his thousands, And David among his myriads.'
७त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.”
8 And it is displeasing to Saul exceedingly, and this thing is evil in his eyes, and he saith, 'They have given to David myriads, and to me they have given the thousands, and more to him [is] only the kingdom;'
८तेव्हा शौलला फार राग आला, आणि त्या गाण्याने त्यास वाईट वाटून त्याने म्हटले, “त्यांनी दावीदाला दहा हजारचे यश दिले आणि मला मात्र हजाराचे यश दिले. राज्याशिवाय त्यास आणखी काय अधिक मिळवायचे राहिले?”
9 and Saul is eyeing David from that day and thenceforth.
९त्या दिवसापासून पुढे शौल दावीदाकडे संशयाने पाहू लागला.
10 And it cometh to pass, on the morrow, that the spirit of sadness [from] God prospereth over Saul, and he prophesieth in the midst of the house, and David is playing with his hand, as day by day, and the javelin [is] in the hand of Saul,
१०मग दुसऱ्या दिवशी असे झाले; देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बडबडत होता. म्हणून दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता.
11 and Saul casteth the javelin, and saith, 'I smite through David, even through the wall;' and David turneth round out of his presence twice.
११तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, “मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन.” परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला.
12 And Saul is afraid of the presence of David, for Jehovah hath been with him, and from Saul He hath turned aside;
१२मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता.
13 and Saul turneth him aside from him, and appointeth him to himself head of a thousand, and he goeth out an cometh in, before the people.
१३शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे.
14 And David is in all his ways acting wisely, and Jehovah [is] with him,
१४दावीदाची त्याच्या सर्व मार्गात भरभराट झाली, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता.
15 and Saul seeth that he is acting very wisely, and is afraid of him,
१५जेव्हा शौलाने बघितले त्याची भरभराट झाली आहे, तेव्हा त्यास त्याचा धाक बसला.
16 and all Israel and Judah love David when he is going out and coming in before them.
१६परंतु सर्व इस्राएली आणि यहूदी दावीदावर प्रीती करीत होते, कारण की तो त्यांच्यादेखत आत बाहेर जात येत असे.
17 And Saul saith unto David, 'Lo, my elder daughter Merab — her I give to thee for a wife; only, be to me for a son of valour, and fight the battles of Jehovah;' and Saul said, 'Let not my hand be on him, but let the hand of the Philistines be upon him.'
१७मग शौलाने दावीदाले म्हटले, “पाहा मी आपली वडील कन्या मेरब ही तुला पत्नी करून देईन. माझ्यासाठी तू केवळ शूर हो, आणि परमेश्वरासाठी लढाया कर.” कारण शौल म्हणाला, माझा हात त्याजवर न पडो, पण पलिष्टंयाचा हात त्याजवर पडो.
18 And David saith unto Saul, 'Who [am] I? and what my life — the family of my father in Israel — that I am son-in-law to the king?'
१८तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “मी राजाचा जावई व्हावे असा मी कोण आहे? माझा जीव काय? आणि इस्राएलामध्ये माझ्या बापाचे कुळ काय?”
19 And it cometh to pass, at the time of the giving of Merab daughter of Saul to David, that she hath been given to Adriel the Meholathite for a wife.
१९परंतु असे झाले की, ज्या वेळेस शौलाची कन्या मेरब दावीदाला द्यायची होती तेव्हा ती अद्रीएल महोलाथी याला पत्नी करून देण्यात आली.
20 And Michal daughter of Saul loveth David, and they declare to Saul, and the thing is right in his eyes,
२०तेव्हा शौलाची कन्या मीखल ही दावीदावर प्रीती करीत असे, आणि हे शौलाला सांगितले असता त्यास बरे वाटले.
21 and Saul saith, 'I give her to him, and she is to him for a snare, and the hand of the Philistines is on him;' and Saul saith unto David, 'By the second — thou dost become my son-in-law to-day.'
२१तेव्हा शौलाने म्हटले, “मी ती त्यास देईन आणि ती त्यास पाशरुप होईल आणि पलिष्ट्यांचा हात त्याजवर पडेल. मग शौलाने दावीदाला दुसऱ्यांदा म्हटले की, तू माझा जावई होशील.”
22 And Saul commandeth his servants, 'Speak unto David gently, saying, Lo, the king hath delighted in thee, and all his servants have loved thee, and now, be son-in-law to the king.'
२२शौलाने आपल्या चाकरास आज्ञा केली की, “तुम्ही दावीदाला गुप्तपणे बोलून म्हणा, की पाहा राजा तुजवर संतुष्ट आहे आणि त्याचे अवघे चाकर तुजवर प्रीती करतात. तर आता राजाचा जावई हो.”
23 And the servants of Saul speak in the ears of David these words, and David saith, 'Is it a light thing in your eyes to be son-in-law to the king — and I a poor man, and lightly esteemed?'
२३शौलाच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले. तेव्हा दावीदाने म्हटले की, “राजाचा जावई होणे ही तुमच्या हिशोबात हलकी गोष्ट आहे की काय?” मी तर दीन व तुच्छ असा मनुष्य आहे.
24 And the servants of Saul declare to him, saying, 'According to these words hath David spoken.'
२४मग असे जे दावीदाने म्हटले ते शौलाच्या चाकरांनी त्यास सांगितले.
25 And Saul saith, 'Thus do ye say to David, There is no delight to the king in dowry, but in a hundred foreskins of the Philistines — to be avenged on the enemies of the king;' and Saul thought to cause David to fall by the hand of the Philistines.
२५तेव्हा शौलाने म्हटले, “तुम्ही दावीदास असे म्हणा, राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा याशिवाय काही हुंडा राजा मागत नाही.” परंतु दावीदाला पलिष्ट्यांच्या हाताकडून मारावे असे शौलाने इच्छिले होते.
26 And his servants declare to David these words, and the thing is right in the eyes of David, to be son-in-law to the king; and the days have not been full,
२६मग त्याच्या चाकरांनी हे शब्द दावीदाला सांगितले, तेव्हा राजाचा जावई होणे हे दावीदाले बरे वाटले.
27 and David riseth and goeth, he and his men, and smiteth among the Philistines two hundred men, and David bringeth in their foreskins, and they set them before the king, to be son-in-law to the king; and Saul giveth to him Michal his daughter for a wife.
२७नेमलेला वेळ अद्याप समाप्त झालेला नव्हता; तेव्हाच दावीदाने उठून आपल्या मनुष्यांसह जाऊन दोनशे पलिष्ट्यांस जिवे मारले आणि त्यांच्या अग्रत्वचा आणून आपण राजाचा जावई होण्यासाठी राजाजवळ त्या मोजून दिल्या; तेव्हा शौलाने आपली कन्या मीखल त्यास पत्नी करून दिली.
28 And Saul seeth and knoweth that Jehovah [is] with David, and Michal daughter of Saul hath loved him,
२८मग हे पाहून शौलाला कळले की, परमेश्वर दावीदाच्या बरोबर आहे आणि शौलाची कन्या मीखल हीने त्याजवर प्रीती केली.
29 and Saul addeth to be afraid of the presence of David yet; and Saul is an enemy with David all the days.
२९तेव्हा शौल दावीदाला अधिक भ्याला आणि शौल दावीदाचा कायमचा वैरी झाला.
30 And the princes of the Philistines come out, and it cometh to pass from the time of their coming out, David hath acted more wisely than any of the servants of Saul, and his name is very precious.
३०नंतर पलिष्ट्यांचे सरदार लढायास बाहेर आले आणि असे झाले की ते आले असता दावीद शौलाच्या सर्व चाकरापेक्षा चतुराईने वर्तला आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.