< Mark 11 >

1 And whanne Jhesus cam nyy to Jerusalem and to Betanye, to the mount of Olyues, he sendith tweyne of hise disciplis, and seith to hem,
जेव्हा ते यरूशलेम शहराजवळ जैतुनांच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की,
2 Go ye in to the castel that is ayens you; and anoon as ye entren there ye schulen fynde a colt tied, on which no man hath sete yit; vntie ye, and brynge hym.
“समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.
3 And if ony man seye ony thing to you, What doen ye? seie ye, that he is nedeful to the Lord, and anoon he schal leeue hym hidir.
आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
4 And thei yeden forth, and founden a colt tied bifor the yate with out forth, in the metyng of twei weies; and thei vntieden hym.
मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर, दाराशी एक शिंगरु बांधलेले आढळले मग त्यांनी ते सोडले.
5 And summe of hem that stoden there seiden to hem, What doen ye, vntiynge the colt?
तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काहीजण त्यांना म्हणाले, “हे शिंगरु सोडून तुम्ही काय करीत आहात?”
6 And thei seiden to hem, as Jhesus comaundide hem; and thei leften it to hem.
त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते त्यांना सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरु नेऊ दिले.
7 And thei brouyten the colt to Jhesu, and thei leiden on hym her clothis, and Jhesus sat on hym.
त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला.
8 And many strewiden her clothis in the weie, othere men kittiden braunchis fro trees, and strewiden in the weie.
पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.
9 And thei that wenten bifor, and that sueden, crieden, and seiden, Osanna,
पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.
10 blissid is he that cometh in the name of the Lord; blessid be the kyngdom of oure fadir Dauid that is come; Osanna in hiyest thingis.
१०आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
11 And he entride in to Jerusalem, in to the temple; and whanne he `hadde seyn al thing aboute, whanne it was eue, he wente out in to Betanye, with the twelue.
११नंतर येशूने यरूशलेम शहरात प्रवेश केल्यावर तो परमेश्वराच्या भवनात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला.
12 And anothir daye, whanne he wente out of Betanye, he hungride.
१२दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली.
13 And whanne he hadde seyn a fige tree afer hauynge leeues, he cam, if happili he schulde fynde ony thing theron; and whanne he cam to it, he foonde no thing, out takun leeues; for it was not tyme of figis.
१३त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता.
14 And Jhesus answeride and seide to it, Now neuer ete ony man fruyt of thee more. And hise disciplis herden; (aiōn g165)
१४नंतर तो त्यास म्हणाला, “यापुढे सर्वकाळ तुझे फळ कोणीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले. (aiōn g165)
15 and thei camen to Jerusalem. And whanne he was entrid in to the temple, he bigan to caste out silleris and biggeris in the temple; and he turnede vpsodoun the bordis of chaungeris, and the chayeris of men that selden culueris;
१५नंतर ते यरूशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलथून टाकली.
16 and he suffride not, that ony man schulde bere a vessel thorou the temple.
१६त्याने कोणालाही कसल्याच वस्तूंची परमेश्वराच्या भवनामधून नेआण करू दिली नाही.
17 And he tauyte hem, and seide, Whether it is not writun, That myn hous schal be clepid the hous of preyng to alle folkis? but ye han maad it a denne of theues.
१७मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाभवन म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्यास लुटारूंची गुहा बनवली आहे.”
18 And whanne this thing was herd, the princis of prestis and scribis souyten hou thei schulden leese hym; for thei dredden hym, for al the puple wondride on his techyng.
१८मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्यास ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्यास भीत होते.
19 And whanne euenyng was come, he wente out of the citee.
१९त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
20 And as thei passiden forth eerli, thei sayn the fige tree maad drye fro the rootis.
२०सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले.
21 And Petir bithouyte hym, and seide to hym, Maister, lo! the fige tree, whom thou cursidist, is dried vp.
२१पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “रब्बी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
22 And Jhesus answeride and seide to hem, Haue ye the feith of God;
२२येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
23 treuli Y seie to you, that who euer seith to this hil, Be thou takun, and cast in to the see; and doute not in his herte, but bileueth, that what euer he seie, schal be don, it schal be don to hym.
२३मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.
24 Therfor Y seie to you, alle thingis what euer thingis ye preynge schulen axe, bileue ye that ye schulen take, and thei schulen come to you.
२४म्हणून मी तुम्हास सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल.
25 And whanne ye schulen stonde to preye, foryyue ye, if ye han ony thing ayens ony man, that youre fadir that is in heuenes, foryyue to you youre synnes.
२५जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी.
26 And if ye foryyuen not, nether youre fadir that is in heuenes, schal foryyue to you youre synnes.
२६परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
27 And eftsoone thei camen to Jerusalem. And whanne he walkide in the temple, the hiyeste prestis, and scribis, and the elder men camen to hym,
२७ते परत यरूशलेम शहरास आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले.
28 and seyn to hym, In what power doist thou these thingis? or who yaf to thee this power, that thou do these thingis?
२८आणि त्यास म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?”
29 Jhesus answeride and seide to hem, And Y schal axe you o word, and answere ye to me, and Y schal seie to you in what power Y do these thingis.
२९येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हास एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हास सांगेन.
30 Whether was the baptym of Joon of heuene, or of men? answere ye to me.
३०योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.”
31 And thei thouyten with ynne hem silf, seiynge, If we seien of heuene, he schal seie to vs, Whi thanne bileuen ye not to him;
३१त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?
32 if we seien of men, we dreden the puple; for alle men hadden Joon, that he was verili a prophete.
३२परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागवतील.” त्या लोकांची भीती वाटत होती कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
33 And thei answeryden, and seien to Jhesu, We witen neuer. And Jhesu answerde, and seide to hem, Nether Y seie to you, in what power Y do these thingis.
३३मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हास सांगत नाही.”

< Mark 11 >