< Ezra 10 >
1 Therfor while Esdras preiede so, and bisouyte God, and wepte, and lai bifor the temple of God, a ful greet cumpenye of Israel, of men, and of wymmen, and of children, was gaderid to him; and the puple wepte bi myche weping.
१एज्रा प्रार्थना करत असतांना आणि पापांची कबुली देत असतांना देवाच्या मंदिरापुढे पडून रडत व आक्रोश करत होता त्यावेळी इस्राएली बायका-पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता ते लोक मोठ्याने रडत होते
2 And Sechenye, the sone of Jehiel, of the sones of Helam, answeride, and seide to Esdras, We han trespasside ayens oure God, and han weddid wyues, alien wymmen, of `the puplis of the lond. And now, for penaunce is in Israel on this thing,
२त्यावेळी एलाम वंशातल्या यहीएलाचा मुलगा शखन्या एज्राला म्हणाला, “आपण देवाविरूद्ध अपराध केला आहे आणि दुसऱ्या देशातील परक्या स्त्रियांसोबत राहत आहो. तरी आता याविषयी इस्राएलाला अजून आशा आहे.
3 smyte we boond of pees with `oure Lord God, and caste we awei alle `wyues aliens, and hem that ben borun of tho wyues, bi the wille of the Lord; and of hem that dreden the comaundement of oure God, `be it don bi the lawe.
३तर आता, प्रभूच्या मसलतीप्रमाणे आणि आमच्या देवाच्या आज्ञेवरून थरथर कापतात त्यांच्या मताप्रमाणे सर्व त्या स्त्रिया आणि त्यांची संतती यांना देशाबाहेर घालवून देण्याची आपल्या देवाशी करार करावा. हे नियमशास्त्राप्रमाणे करावे.
4 Rise thou, it `is thin office to deme, and we schulen be with thee; be thou coumfortid, and do.
४आता ऊठ ही तुझी जबाबदारी आहे. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. धैर्य धर आणि हे कर.”
5 Therfor Esdras roos, and chargide greetli the princes of prestis, and of dekenes, and of al Israel, to do after this word; and thei sworen.
५तेव्हा एज्रा उठला, प्रमुख यजाक, लेवी आणि सर्व इस्राएली लोक यांच्याकडून त्यांनी त्या वचनाप्रमाणे वागावे अशी शपथ घेतली. त्यांनी वचन दिले.
6 And Esdras roos bifor the hows of God, and he yede to the bed of Johannan, sone of Eliasiph, and entride thidur; he eet not breed, and drank not watir; for he biweilide the trespassing of hem, that weren comun fro the caitifte.
६मग एज्रा देवाच्या मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशीबाचा मुलगा यहोहानान याच्या खोलीत गेला. यहोहानाने एज्रा समोर अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. कारण तो बंदीवासातून आलेल्या अविश्वासणाऱ्यासाठी शोक करीत होता.
7 And a vois of hem was sent in to Juda and Jerusalem, to alle the sones of transmygracioun, that thei schulden be gaderid in to Jerusalem;
७मग त्याने यहूदा आणि यरूशलेमेच्या प्रत्येक ठिकाणी बोलावणे पाठवले. बंदिवासातून आलेल्या समस्त यहूदी लोकांस त्याने यरूशलेमेमध्ये जमायला सांगितले.
8 and ech man that cometh not in thre daies, bi the counsel of the princes and of eldre men, al his catel schal be takun awey fro him, and he schal be cast awei fro the cumpeny of transmygracioun.
८आणि जो कोणी अधिकाऱ्यांच्या आणि वडीलांच्या मसलतीप्रमाणे तीन दिवसाच्या आत यरूशलेमेला येणार नाही त्याची सर्व मालमत्ता जप्त होईल आणि पकडून नेलेल्या अशा मोठ्या मंडळीतून त्या लोकांस हद्दपार करावे.
9 Therfor alle the men of Juda and of Beniamyn camen togidere in to Jerusalem in thre daies; thilke is the nynthe monethe, in the twentithe dai of the monethe; and al the puple sat in `the street of Goddis hows, and trembliden for synne and reyn.
९त्यानुसार यहूदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुषमंडळी तीन दिवसाच्या आत यरूशलेमात जमली. तो नवव्या महिन्याचा विसावा दिवस होता. हे सर्व लोक देवाच्या घराच्या चौकातील प्रचंड पाऊसामुळे आणि देवाच्या वचनामुळे थरथर कापत उभे होते.
10 And Esdras, the preest, roos, and seide to hem, Ye han trespassid, and han weddid wyues, alien wymmen, that ye schulden `leie to on the trespas of Israel.
१०एज्रा याजक त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्राएलाच्या अपराधात तुम्ही भर टाकली आहे.
11 And now yyue ye knowlechyng to the Lord God of oure fadris, and do ye his pleasaunce, and be ye departid fro the puplis of the lond, and fro `wyues aliens.
११तर आता तुम्ही परमेश्वर आपल्या पूर्वजांचा देव याच्याजवळ पाप कबूल करून त्यास इच्छेप्रमाणे ते करा. देशातल्या लोकांपासून आणि परक्या स्त्रिया यांच्यापासून वेगळे व्हा.”
12 And al the multitude answeride, and seide with greet vois, Bi thi word to vs, so be it doon.
१२यावर त्या जमावाने मोठ्या आवाजात उत्तर दिले की, “तू जसे सांगितले तसे आम्ही करू.
13 Netheles for the puple is myche, and the tyme of reyn is, and we suffren not to stonde withoutforth, and it is not werk of o dai, nether of tweyne; for we han synned greetli in this word;
१३पण आम्ही पुष्कळजण आहोत शिवाय हा पावसाळा आहे त्यामुळे आम्हास बाहेर थांबण्याची शक्ती नाही. हे काम एकदोन दिवसाचे नाही. कारण या प्रकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात मर्यादेचे उल्लंघन केले आहे.
14 `princes be ordeyned in al the multitude, and alle men in oure citees, that han weddid `wyues aliens, come in tymes ordeyned, and with hem come the eldere men, bi citee and citee, and the iugis therof, til the ire of oure God be turned awei fro vs on this synne.
१४या समुदायाच्यावतीने आमच्यातूनच काहींना अधिकारी नेमावे. प्रत्येक नगरात ज्यांनी परक्या बायकांशी लग्ने केली आहेत त्यांनी यरूशलेमेला नेमलेल्या वेळी यावे त्या नगरातील न्यायाधीश आणि वडील मंडळी यांनीही त्यांच्याबरोबर यावे. असे झाले की मग देवाचा आमच्यावरचा क्रोध जाईल.”
15 Therfor Jonathan, the sone of Asahel, and Jaazie, the sone of Thecue, stoden on this thing; and Mosollam, and Sebethai, dekenes, helpiden hem.
१५असाएलाचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या या गोष्टी विरूद्ध उभे राहिले आणि तसेच मशुल्लाम व शब्बथई लेव्यांनी त्यांना पाठिंबा दिला.
16 And the sones of transmygracioun diden so. And Esdras, the prest, and men, princes of meynees, yeden into the howsis of her fadris, and alle men bi her names; and thei saten in the firste dai of the tenthe monethe, for to seke the thing.
१६बंदीवासातून आलेल्या लोकांनी हे केले. एज्राने प्रत्येक घराण्यातून एकेका प्रमुख व्यक्तीची नेमणूक केली. त्या प्रत्येकाच्या नावाने निवडले गेली. हे नियुक्त केलेले सर्वजण दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार करायला बसले
17 And alle men weren endid, that hadden weddid `wyues aliens, `til to the firste dai of the firste monethe.
१७आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिश्रविवाहांची चौकशी समाप्त झाली.
18 And there weren foundun of the sones of preestis, that weddiden `wyues aliens; of the sones of Josue, the sone of Josedech, and hise britheren, Maasie, and Eliezer, and Jarib, and Godolie.
१८याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियांशी विवाह केले त्यांची नावे पुढीलप्रमाणे, योसादाकाचा मुलगा येशूवा याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब, गदल्या.
19 And thei yauen her hondis, that thei schulden caste out her wyues, and offre for her trespas a ram of the scheep.
१९यासर्वांनी आपापल्या बायकांना पाठवून द्यायचे कबूल केले आणि दोषाबद्दल कळपातला एडका अर्पण केला.
20 And of the sones of Semmer; Anam, and Zebedie.
२०इम्मेरच्या वंशातले हनानी व जबद्या,
21 And of the sones of Serym; Maasie, and Helie, and Semeie, and Jehiel, and Ozie.
२१हारीमच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया,
22 And of the sones of Phessur; Helioneai, Maasie, Hismael, Nathanael, and Jozabet, and Elasa.
२२पशूहरच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद, एलासा.
23 And of the sones of dekenes; Josabeth, and Semey, and Elaie; he is Calithaphataie; Juda, and Elezer.
२३लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ कलीता, पथह्या, यहूदा आणि अलियेजर.
24 And of syngeris, Eliazub; and of porteris, Sellum, and Thellem, and Vry.
२४गायकांपैकी एल्याशीब, द्वारपालांमधले, शल्लूम, तेलेम, ऊरी.
25 And of Israel, of the sones of Pharos; Remea, and Ezia, and Melchia, and Vnanym, and Eliezer, and Melchia, and Banea.
२५इस्राएलामधले परोशाच्या वंशातले रम्या व यिज्जीया, मल्कीया, मियानीन, एलाजार, मल्कीया, बनाया.
26 And of the sones of Elam; Mathanye, and Zacharie, and Jehil, and Abdi, and Rymoth, and Helia.
२६एलामच्या वंशातले मत्तन्या, जखऱ्या, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीया,
27 And of the sones of Zechua; Helioneay, Heliasib, Mathanye, and Jerymuth, and Zaeth, and Aziza.
२७जत्तूच्या वंशातले एल्योवेनय, एल्याशीब, मत्तन्या, यरेमोथ, जाबाद, अजीजा,
28 And of the sones of Bebai; Johannan, Ananye, Zabbai, Athalia.
२८बेबाईच्या वंशातील यहोहानान, हनन्या, जब्बइ, अथलइ
29 And of the sones of Beny; Mosallam, and Melue, and Azaie, Jasub, and Saal, and Ramoth.
२९बानीच्या वंशातील मशुल्लाम, मल्लूख, अदाया, याशूब, शाल आणि रामोथ.
30 And of the sones of Phaeth; Moab, Edua, and Calal, Banaie, and Massie, Mathanye, Beseleel, and Bennun, and Manasse.
३०पहथ-मवाबच्या वंशातील अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसालेल, बिन्नुई, मनश्शे,
31 And of the sones of Erem; Elieer, Jesue, Melchie, Semeye, Symeon,
३१आणि हारीमच्या वंशातील अलियेजर, इश्शीया, मल्कीया, शमाया, शिमोन,
32 Beniamyn, Maloth, Samarie.
३२बन्यामीन, मल्लूख, शमऱ्या.
33 And of the sones of Asom; Mathanai, Mathetha, Zabeth, Eliphelech, Jermai, Manasse, Semei.
३३हाशूमच्या वंशातील मत्तनई, मत्तथा, जाबाद, अलीफलेट, यरेमई, मनश्शे, शिमी,
34 Of the sones of Bany; Maddi, Amram, and Huel,
३४बानीच्या वंशातले मादइ, अम्राम, ऊएल
35 Baneas, and Badaie, Cheilian,
३५बनाया, बेदया, कलूही,
36 Biamna, Marymuth, and Eliasiph,
३६वन्या, मरेमोथ, एल्याशीब.
३७मत्तन्या, मत्तनई, व यासू
38 and Bany, and Bennan, and Semei,
३८बानी व बिन्नइ, शिमी,
39 and Salymas, and Nathan, and Daias,
३९शलेम्या, नाथान, अदाया,
40 Metuedabai, Sisai, Sarai,
४०मखनदबइ, शाशइ, शारइ.
41 Ezrel, and Seloman, Semerie,
४१अजरएल, शेलेम्या, शमऱ्या
42 Sellum, Amarie, Joseph.
४२शल्लूम, अमऱ्या, योसेफ,
43 Of the sones of Nebny; Aiel, Mathatie, Zabed, Zabina, Jebdu, and Johel, Banai.
४३नबोच्या वंशातील ईयेल, मत्तिथ्या, जाबाद, जबिना, इद्दो, योएल, बनाया.
44 Alle these hadden take `wyues aliens, and of hem weren wymmen, that hadden bore children.
४४वरील सर्वांनी परराष्ट्रीय बायकांशी लग्ने केली होती. त्यापैकी काहींना आपल्या बायकांकडून संतती झाली होती.