< Acts 3 >

1 And Petre and Joon wenten vp in to the temple, at the nynthe our of preiyng.
पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या तीन वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते.
2 And a man that was lame fro the wombe of his modir, was borun, and was leid ech dai at the yate of the temple, that is seid feir, to axe almes of men that entriden in to the temple.
आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या सुंदर नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत.
3 This, whanne he say Petre and Joon bigynnynge to entre in to the temple, preyede that he schulde take almes.
पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली.
4 And Petre with Joon bihelde on hym, and seide, Biholde thou in to vs.
तेव्हा पेत्र, योहानाबरोबर त्यास निरखून पाहत, म्हणाला, “आमच्याकडे पाह.”
5 And he biheelde in to hem, and hopide, that he schulde take sumwhat of hem.
तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल, अशी आशा धरून त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले.
6 But Petre seide, Y haue nether siluer ne gold; but that that Y haue, Y yiue to thee. In the name of Jhesu Crist of Nazareth, rise thou vp, and go.
आणि पेत्र म्हणाला, “रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही; पण जे माझ्याजवळ आहे. ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.”
7 And he took hym bi the riythoond, and heuede hym vp; and anoon hise leggis and hise feet weren sowdid togidere;
आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले.
8 and he lippide, and stood, and wandride. And he entride with hem in to the temple, and wandride, and lippide, and heriede God.
आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला.
9 And al the puple sai hym walkinge, and heriynge God.
आणि सर्व लोकांनी त्यास चालताना व देवाची स्तुती करताना पाहिल.
10 And thei knewen hym, that he it was that sat at almes at the feire yate of the temple. And thei weren fillid with wondryng, and stoniynge, in that thing that byfelde to hym.
१०आणि जो भवनाच्या सुंदर दाराजवळ भीक मागण्यासाठी बसत असे; तो हाच आहे असे त्यांनी त्यास ओळखले तेव्हा त्यास जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले.
11 But whanne thei sien Petre and Joon, al the puple ran to hem at the porche that was clepid of Salomon, and wondriden greetli.
११तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाचा द्वारमंडप म्हटलेल्या ठिकाणी, त्याच्याकडे धावत आले.
12 And Petre siy, and answeride to the puple, Men of Israel, what wondren ye in this thing? ether what biholden ye vs, as by oure vertue ethir power we maden this man for to walke?
१२हे पाहून पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, तो म्हणाला, “अहो इस्राएल मनुष्यांनो, यावरुन तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?
13 God of Abraham, and God of Ysaac, and God of Jacob, God of oure fadris, hath glorified his sone Jhesu, whom ye bitraieden, and denyeden bifor the face of Pilat, whanne he demede hym to be delyuered.
१३अब्राहामाचा, इसहाकाचा, व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्यास तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्यास सोडून देण्याचे ठरवले असताही त्यास तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
14 But ye denyeden the hooli and the riytful, and axiden a mansleer to be youun to you.
१४तुम्ही तर जो पवित्र व नीतिमान त्यास नाकारले, आणि घातक मनुष्य आम्हास द्यावा असे मागितले.
15 And ye slowen the maker of lijf, whom God reiside fro deth, of whom we ben witnessis.
१५आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्यास देवाने मरण पावलेल्यामधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत.
16 And in the feith of his name he hath confermyd this man, whom ye seen and knowen; the name of hym, and the feith that is bi him, yaf to this man ful heelthe in the siyt of alle you.
१६आणि त्याच्या नावाने त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता, व ओळखता त्या या मनुष्यास शक्तीमान केले आहे. आणि, त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.
17 And now, britheren, Y woot that bi vnwityng ye diden, as also youre princis.
१७तर आता भावांनो, मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले आहे,
18 But God that bifor telde bi the mouth of alle profetis, that his Crist schulde suffre, hath fillid so.
१८परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी, म्हणून देवाने आपल्या सर्व संदेष्ट्याच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते, ते याप्रमाणे पूर्ण केले आहे.
19 Therfor be ye repentaunt, and be ye conuertid, that youre synnes be don awei, that whanne the tymes of refresching schulen come from the siyt of the Lord,
१९तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;
20 and he schal sende thilke Jhesu Crist, that is now prechid to you.
२०आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला, ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.
21 Whom it bihoueth heuene to resseyue, in to the tymes of restitucioun of alle thingis, which the Lord spak bi the mouth of hise hooli prophetis fro the world. (aiōn g165)
२१सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यंत स्वर्गात त्यास राहणे अवश्य आहे, त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्ट्याच्या तोंडून सांगितले आहे. (aiōn g165)
22 For Moises seide, For the Lord youre God schal reise to you a profete, of youre britheren; as me, ye schulen here hym bi alle thingis, what euer he schal speke to you.
२२मोशेने तर सांगितले की, ‘प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावांमधून उठवील. तो जे काही तुम्हास सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’
23 And it schal be, that euery man that schal not here the ilke profete, schal be distried fro the puple.
२३आणि असे होईल की जो कोणी जीव त्या संदेष्ट्याचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल.
24 And alle prophetis fro Samuel and aftirward, that spaken, telden these daies.
२४आणखी, शमुवेलापासून जे संदेष्ट्याच्या परंपरेने झाले, जितके बोलत आले, त्या सर्वानी या दिवसाविषयी कळवले.
25 But ye ben the sones of prophetis, and of the testament, that God ordeynede to oure fadris, and seide to Abraham, In thi seed alle the meynes of erthe schulen be blessid.
२५तुम्ही संदेष्ट्याचे मुले आहात आणि तुझ्या संततीद्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून, ‘देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला त्या कराराची तुम्ही मुले आहा.’
26 God reiside his sone first to you, and sente hym blessynge you, that ech man conuerte hym from his wickidnesse.
२६देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, यासाठी की, त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा.”

< Acts 3 >