< 2 Chronicles 15 >
1 Forsothe Azarie, the sone of Obeth, whanne the spirit of the Lord was comyn in to hym,
१ओदेदाचा पुत्र अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला.
2 yede out in to the metyng of Asa; and seide to hym, Asa and al Juda and Beniamyn, here ye me; the Lord is with you, for ye weren with hym; if ye seken hym, ye schulen fynde hym; sotheli if ye forsaken hym, he schal forsake you.
२अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामीन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हास भेटेल. पण तुम्ही त्यास सोडलेत तर तो ही तुम्हास सोडेल.
3 Forsothe many daies schulen passe in Israel with outen veri God, and without preest, and without techere, and without lawe.
३इस्राएलाला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते
4 And whanne thei turnen ayen in her angwisch, and crien to the Lord God of Israel, and seken hym, thei schulen fynde hym.
४पण अडचणीत सापडल्यावर इस्राएल लोक पुन्हा इस्राएलाचा परमेश्वर याच्याकडे वळाले. त्यांनी देवाचा शोध घेतला आणि त्यांना तो सापडला.
5 In that tyme schal not be pees to go out and to go in, but dredis on al side on alle the dwelleris of londis.
५त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती.
6 For a folk schal fiyte ayens folk, and a citee ayens a citee, for the Lord schal disturble hem in al anguysch;
६देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटानी त्यांना त्रस्त केले होते.
7 but be ye coumfortid, and youre hondis be not slakid; for mede schal be to youre werk.
७पण आसा, तू व इस्राएल लोकहो तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहूदाने बन्यामिनांनो हिंमतीने वागा. तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हास मिळेल.”
8 And whanne Asa hadde herd this thing, that is, the wordis and profesye of Asarie, the sone of Obed, the profete, he was coumfortid, and he dide a wei alle the idols fro al the lond of Juda and of Beniamyn, and fro the citees whiche he hadde take of the hil of Effraym. And he halewide the auter of the Lord, that was bifor the porche of the hows of the Lord.
८आसास या शब्दांनी आणि ओदेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामीन येथील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मूर्ती पूर्णपणे काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.
9 And he gaderide togidere al Juda and Beniamyn, and with hem the comelyngis of Effraym, and of Manasses, and of Symeon; for manye of Israel, seynge that his Lord God was with hym, fledden ouer to hym.
९मग त्याने यहूदा आणि बन्यामीन येथील सर्व लोक तसेच एफ्राइम, मनश्शे व शिमोन वंशातील जे लोक इस्राएल राष्ट्रातून यहूदात आले होते त्यांना एकत्र बोलावले. आसाचा देव परमेश्वर त्याच्या सोबत आहे हे पाहून लोक मोठ्या संख्येने आले.
10 And whanne thei hadden comun in to Jerusalem, in the thridde monethe, in the fiftenthe yeer of the rewme of Asa,
१०आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरूशलेमामध्ये एकत्र जमले.
11 thei offriden `to the Lord in that dai, bothe of the spuylis and of the prey, which thei hadden brouyt, seuene hundrid oxis, and seuene thousynde wetheris.
११त्यांनी सातशे गुरे, सात हजार मेंढरे व बकरे यांचे बली परमेश्वरास अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रू कडून आणली होती.
12 And Asa entride bi custom to make strong the boond of pees, that thei schulden seke the Lord God of her fadris in al her herte, and in al her soule.
१२तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.
13 Sotheli he seide, If ony man sekith not the Lord God of Israel, die he, fro the leeste `til to the mooste, fro man `til to womman.
१३जो इस्राएलाचा देव परमेश्वर याची सेवा करणार नाही त्यास ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष
14 And alle that weren in Juda sworen with cursyng to the Lord, with greet vois, in hertli song, and in sown of trumpe, and in sown of clariouns;
१४आसा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला.
15 for thei sworen in al her herte, and in al the wille thei souyten hym, and founden hym; and the Lord yaf to hem reste bi cumpas.
१५मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहूदा लोकांस मनापासून आनंद झाला. एकचित्ताने ते परमेश्वरास शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूनी स्वास्थ्य दिले.
16 But also he puttide doun Maacha, the modir of `Asa the kyng, fro the streit empire, for sche hadde made in a wode the symylacre, `ether licnesse, of a mannus yerde; and he al to-brak al `that symylacre, and pownede it in to gobetis, and `brente it in the stronde of Cedron.
१६आसा राजाने आपली आजी माका हिलाही राजमाता पदावरुन दूर केले. कारण तिने अमंगळ अशा अशेरा देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्याने ती मूर्ती मोडून तोडून किद्रोन खोऱ्यात जाळून टाकली.
17 But hiy places weren left in Israel; netheles the herte of Asa was riytful in alle hise daies.
१७त्याने इस्राएलातील उच्चस्थाने काढून टाकली नाहीत तरीही आसा आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
18 And he brouyte in to the hows of the Lord tho thingis that his fadir avowide, siluer and gold, and dyuerse purtenaunce of vessels;
१८मग त्याने व त्याच्या पित्याने परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या.
19 sotheli batel was not `til to the threttithe yeer of the rewme of Asa.
१९आसाच्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मग पुन्हा युध्द झाले नाही.