< 1 John 1 >
1 That thing that was fro the bigynnyng, which we herden, which we sayn with oure iyen, which we bihelden, and oure hondis touchiden, of the word of lijf;
१जे आरंभापासून होते, ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हातांनी हाताळले त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.
2 and the lijf is schewid. And we sayn, and we witnessen, and tellen to you the euerlastynge lijf, that was anentis the fadir, and apperide to vs. (aiōnios )
२ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले. (aiōnios )
3 Therfor `we tellen to you that thing, that we seyn, and herden, that also ye haue felowschipe with vs, and oure felowschip be with the fadir, and with his sone Jhesu Crist.
३आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हांलाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.
4 And we writen this thing to you, that ye haue ioye, and that youre ioye be ful.
४तुमचा-आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही या गोष्टी तुम्हास लिहितो.
5 And this is the tellyng, that we herden of hym, and tellen to you, that God is liyt, and ther ben no derknessis in him.
५जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही.
6 If we seien, that we han felawschip with hym, and we wandren in derknessis, we lien, and don not treuthe.
६जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही.
7 But if we walken in liyt, as also he is in liyt, we han felawschip togidere; and the blood of Jhesu Crist, his sone, clensith vs fro al synne.
७पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
8 If we seien, that we han no synne, we disseyuen vs silf, and treuthe is not in vs.
८जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही.
9 If we knowlechen oure synnes, he is feithful and iust, that he foryyue to vs oure synnes, and clense vs from al wickidnesse.
९जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
10 And if we seien, we han not synned, we maken hym a liere, and his word is not in vs.
१०जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्यास लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.