< 1 Chronicles 24 >
1 Forsothe to the sones of Aaron these porciouns schulen be; the sones of Aaron weren Nadab, and Abyud, Eleazar, and Ythamar;
१अहरोनाच्या वंशजांची वर्गवारी नादाब, अबीहू एलाजार व इथामार.
2 but Nadab and Abyud weren deed with out fre children bifor her fadir, and Eleazar and Ythamar weren set in presthod.
२पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या पित्याच्या आधीच मरण पावले. त्यांना अपत्य ही नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
3 And Dauith departide hem, that is, Sadoch, of the sones of Eleazar, and Achymelech, of the sones of Ithamar, by her whiles and seruyce;
३दावीद व एलाजाराच्या वंशातला सादोक आणि इथामार यांच्या वंशातला अहीमलेख यांनी त्यांच्या नेमणुकीप्रमाणे त्यांच्या सेवेसाठी त्यांची वाटणी केली.
4 and the sones of Eleazar weren founden many mo in the men princes, than the sones of Ythamar. Forsothe he departide to hem, that is, to the sones of Eleazar, sixtene prynces bi meynees; and to the sones of Ythamar eiyte prynces bi her meynees and howsis.
४इथामारापेक्षा एलाजाराच्या वंशजात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजाराच्या वंशजात सोळा जण तर इथामारच्या वंशजात आठ जण प्रमुख होते.
5 Sotheli he departide euer eithir meynees among hem silf bi lottis; for there weren princes of the seyntuarye, and princes of the hows of God, as wel of the sones of Eleazar as of the sones of Ithamar.
५दोन्ही वंशजातील पुरुषांची निवड चिठ्ठ्या टाकून केली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे अधिकारी आणि देवाकडचे अधिकारी असे केले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या वंशजातलेच होते.
6 And Semeye, the sone of Nathanael, a scribe of the lynage of Leuy, discriuede hem bifore the king and pryncis, and bifor Sadoch, the preest, and Achymelech, the sone of Abiathar, and to the prynces of meynees of the preestis and of the dekenes; he discriuyde oon hows of Eleazar, that was souereyn to othere, and `the tother hows of Ithamar, that hadde othere vndir hym.
६आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.
7 Forsothe the firste lot yede out to Joiarib, the secounde to Jedeie,
७पहिली चिठ्ठी यहोयारीबाची निघाली. दुसरी यदायाची,
8 the thridde to Aharym, the fourthe to Seorym,
८तिसरी हारीमाची, चौथी सोरीमाची,
9 the fyuethe to Melchie,
९पाचवी मल्कीयाची, सहावी मयामिनाची,
10 the sixte to Maynan, the seuenthe to Accos,
१०सातवी हक्कोसाची, आठवी अबीयाची.
11 the eiythe to Abia, the nynthe to Hieusu, the tenthe to Sechema, the elleuenthe to Eliasib,
११नववी येशूवाची, दहावी शकन्याची,
12 the tweluethe to Jacyn,
१२अकरावी एल्याशिबाची, बारावी याकीमाची
13 the thrittenthe to Opha, the fourtenthe to Isbaal,
१३तेरावी हुप्पाची, चवदावी येशेबाबाची,
14 the fiftenthe to Abelga, the sixtenthe to Emmer,
१४पंधरावी बिल्गाची, सोळावी इम्मेराची.
15 the seuententhe to Ezir, the eiytenthe to Ahapses, the nyntenthe to Pheseye,
१५सतरावी हेजीराची, अठरावी हप्पिसेसाची,
16 the twentithe to Jezechel,
१६एकोणीसावी पथह्याची, विसावी यहेजकेलाची,
17 the oon and twentithe to Jachym, the two and twentithe to Gamul, the thre and twentithe to Dalayam,
१७एकविसावी याखीनाची, बाविसावी गामूलची,
18 the foure and twentithe to Mazzian.
१८तेविसावी दलायाची आणि चोविसावी माज्याची.
19 These weren the whilis of hem bi her mynysteries, that thei entre in to the hows of God, and bi her custom vndur the hond of Aaron, her fadir, as the Lord God of Israel comaundide.
१९परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनाला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
20 Forsothe Sebahel was prince of the sones of Leuy that weren resydue, of the sones of Amram; and the sone of Sebahel was Jedeie;
२०लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील शूबाएल; शूबाएलचे वंशज: यहदाया.
21 also Jesie was prince of the sones of Roobie.
२१रहब्याचे वंशज: रहब्याच्या वंशात इश्शिया मुख्य.
22 Sotheli Salomoth was prince of Isaaris; and the sone of Salamoth was Janadiath;
२२इसहार वंशजापैकी: शलोमोथ. शलोमोथाच्या वंशजातून: यहथ.
23 and his firste sone was Jeriuans, `Amarie the secounde, Azihel the thridde, `Jethmoan the fourthe.
२३हेब्रोनचा थोरला पुत्र यरीया, हेब्रोनचा दुसरा पुत्र अमऱ्या, यहजिएल तिसरा आणि चौथा यकमाम.
24 The sone of Ozihel was Mycha; the sone of Mycha was Samyr;
२४उज्जियेलाच्या वंशातला मीखा. मीखाच्या वंशातला शामीर.
25 the brother of Mycha was Jesia; and the sone of Jesia was Zacharie.
२५मीखाचा भाऊ इश्शिया, इश्शियाचा पुत्र जखऱ्या.
26 The sones of Merary weren Mooli and Musi; the sone of Josyan was Bennon;
२६मरारीचे वंशज: महली आणि मूशी. याजीयाचा वंशज बनो.
27 and the sone of Merarie was Ozian, and Soen, and Zaccur, and Hebri.
२७मरारीचे वंशज: याजीयापासून बनो व शोहम व जक्कूर व इब्री.
28 Sotheli the sone of Mooli was Eleazar, that hadde not fre sones; forsothe the sone of Cys was Jeremyhel;
२८महलीपासून: एलाजार हा महलीचा पुत्र. याला अपत्य नव्हते.
29 the sones of Musy weren Mooli,
२९कीशाचे वंशज: यरहमेल.
30 Eder, Jerymuth. These weren the sones of Leuy, bi the housis of her meynees.
३०महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे पुत्र. हे लेवी होते, त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांची यादी करण्यात आली.
31 Also and thei senten lottis ayens her britheren, the sones of Aaron, bifor Dauid the kyng, and bifor Sadoch, and Achymelech, and the princes of meynees of preestis and of dekenes; lot departide euenli alle, bothe the gretter and the lesse.
३१राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.