< Ecclesiastes 10 >

1 Dead flies cause the oil of the perfumer to produce an evil odor; so does a little folly outweigh wisdom and honor.
जसे मरण पावलेल्या माशा गंध्याचे सुगंधी तेल दुर्गंधीत करतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो.
2 A wise man’s heart is at his right hand, but a fool’s heart at his left.
शहाण्याचे मन त्याच्या उजवीकडे आहे. पण मूर्खाचे मन त्याच्या डावीकडे असते.
3 Yes also when the fool walks by the way, his understanding fails him, and he says to everyone that he is a fool.
जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो त्याचे विचार अर्धवट असतात. तो मूर्ख आहे हे प्रत्येकाला दिसते.
4 If the spirit of the ruler rises up against you, don’t leave your place; for gentleness lays great offenses to rest.
तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची कामे सोडू नका. शांत राहिल्याने मोठा असह्य संताप शांत होतो.
5 There is an evil which I have seen under the sun, the sort of error which proceeds from the ruler.
एक अनर्थ तो मी पृथ्वीवर पाहिला आहे, अधिकाऱ्याच्या चुकीने येतो ते मी पाहिले आहे.
6 Folly is set in great dignity, and the rich sit in a low place.
मूर्खांना नेतेपदाची जागा दिली जाते, आणि यशस्वी मनुष्यांना खालची जागा दिली जाते.
7 I have seen servants on horses, and princes walking like servants on the earth.
मी दासास घोड्यावरून जाताना पाहिले, आणि जे यशस्वी लोक होते त्यांना दासाप्रमाणे जमिनीवरून चालताना पाहिले.
8 He who digs a pit may fall into it; and whoever breaks through a wall may be bitten by a snake.
जो कोणी खड्डा खणतो, तोच त्यामध्ये पडू शकतो आणि जो कोणी भिंत तोडून टाकतो त्यास साप चावण्याची शक्यता असते.
9 Whoever carves out stones may be injured by them. Whoever splits wood may be endangered by it.
जो कोणी दगड फोडतो त्यास त्यामुळे इजा होऊ शकते. आणि जो लाकडे तोडतो तो संकटात असतो.
10 If the ax is blunt, and one doesn’t sharpen the edge, then he must use more strength; but skill brings success.
१०लोखंडी हत्यार बोथटले व त्यास धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगाचे आहे.
11 If the snake bites before it is charmed, then is there no profit for the charmer’s tongue.
११जर सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकाचा काही उपयोग नाही.
12 The words of a wise man’s mouth are gracious; but a fool is swallowed by his own lips.
१२शहाण्याच्या तोंडची वचने कृपामय असतात. परंतु मूर्खाचे ओठ त्यालाच गिळून टाकतील.
13 The beginning of the words of his mouth is foolishness; and the end of his talk is mischievous madness.
१३त्याच्या मुखाच्या वचनांचा प्रारंभ मूर्खपणा असतो. आणि त्याच्या भाषणाचा शेवट अपाय करणारे वेडेपण असते.
14 A fool also multiplies words. Man doesn’t know what will be; and that which will be after him, who can tell him?
१४मूर्ख वचने वाढवून सांगतो, पण पुढे काय येणार आहे हे कोणाला माहित नाही. त्याच्यामागे काय होईल ते त्यास कोण सांगेल?
15 The labor of fools wearies every one of them; for he doesn’t know how to go to the city.
१५मूर्ख श्रम करून थकतो, कारण नगराला जाण्याचा मार्ग तो जाणत नाही.
16 Woe to you, land, when your king is a child, and your princes eat in the morning!
१६हे देशा, तुझा राजा जर बालकासारखा असला, आणि तुझे अधिपती सकाळी मेजवाणीला सुरवात करतात तर तुझी केवढी दुर्दशा!
17 Happy are you, land, when your king is the son of nobles, and your princes eat in due season, for strength, and not for drunkenness!
१७पण जेव्हा तुझा राजा उच्चकुलीनांचा मुलगा आहे, आणि तुझे अधिपती नशेसाठी नाहीतर शक्तीसाठी सुसमयी जेवतात तेव्हा तुझा देश आनंदीत आहे.
18 By slothfulness the roof sinks in; and through idleness of the hands the house leaks.
१८जर एखादा मनुष्य कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.
19 A feast is made for laughter, and wine makes the life glad; and money is the answer for all things.
१९लोक हसण्याकरता मेजवाणी तयार करतात, द्राक्षरस जीवन आनंदीत करतो. आणि पैसा प्रत्येकगोष्टीची गरज पुरवतो.
20 Don’t curse the king, no, not in your thoughts; and don’t curse the rich in your bedroom, for a bird of the sky may carry your voice, and that which has wings may tell the matter.
२०तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नको. आणि श्रीमंताला आपल्या झोपण्याच्या खोलीतही शाप देऊ नको. कारण आकाशातले पाखरू तुझे शब्द घेऊन जाईल, आणि जे काही पक्षी आहेत ते गोष्टी पसरवतील.

< Ecclesiastes 10 >