< Genesis 41 >

1 At the end of two full years, Pharaoh dreamt, and behold, he stood by the river.
साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की, पाहा तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता.
2 Behold, seven cattle came up out of the river. They were sleek and fat, and they fed in the marsh grass.
तेव्हा पाहा, त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवतात चरत होत्या.
3 Behold, seven other cattle came up after them out of the river, ugly and thin, and stood by the other cattle on the brink of the river.
त्यानंतर आणखी सात दुबळ्या व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व नदीच्या किनारी त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईंच्या बाजूला उभ्या राहिल्या.
4 The ugly and thin cattle ate up the seven sleek and fat cattle. So Pharaoh awoke.
आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईंनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो राजा जागा झाला.
5 He slept and dreamt a second time; and behold, seven heads of grain came up on one stalk, healthy and good.
मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्यास दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यामध्ये त्याने पाहिले की, एकाच ताटाला सात भरदार कणसे आली.
6 Behold, seven heads of grain, thin and blasted with the east wind, sprung up after them.
त्यानंतर पाहा, त्या ताटाला सात खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी सात कणसे आली.
7 The thin heads of grain swallowed up the seven healthy and full ears. Pharaoh awoke, and behold, it was a dream.
नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली. तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्यास समजले.
8 In the morning, his spirit was troubled, and he sent and called for all of Egypt’s magicians and wise men. Pharaoh told them his dreams, but there was no one who could interpret them to Pharaoh.
दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नांमुळे चिंतेत पडून बेचैन झाला. त्याने मिसर देशातील जादूगार व ज्ञान्यांना बोलावले. फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाच त्या स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.
9 Then the chief cup bearer spoke to Pharaoh, saying, “I remember my faults today.
तेव्हा प्यालेबरदार फारोस म्हणाला, “आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे.
10 Pharaoh was angry with his servants, and put me in custody in the house of the captain of the guard, with the chief baker.
१०फारो, आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस पहारेकऱ्यांच्या सरदाराच्या वाड्यातील तुरुंगात टाकले होते.
11 We dreamt a dream in one night, he and I. Each man dreamt according to the interpretation of his dream.
११तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री मला व त्याला, आम्हा दोघांना स्वप्ने पडली. आम्हांला लागू होतील अशी निरनिराळी स्वप्ने आम्हांला पडली.
12 There was with us there a young man, a Hebrew, servant to the captain of the guard, and we told him, and he interpreted to us our dreams. He interpreted to each man according to his dream.
१२तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्यास आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला.
13 As he interpreted to us, so it was. He restored me to my office, and he hanged him.”
१३आणि त्याने सांगितलेल्या अर्थाप्रमाणे तसे ते घडले. तो म्हणाला, फारो तुला पूर्वीप्रमाणे कामावर पुन्हा घेईल आणि परंतु दुसऱ्याला फाशी देईल.”
14 Then Pharaoh sent and called Joseph, and they brought him hastily out of the dungeon. He shaved himself, changed his clothing, and came in to Pharaoh.
१४मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला.
15 Pharaoh said to Joseph, “I have dreamt a dream, and there is no one who can interpret it. I have heard it said of you, that when you hear a dream you can interpret it.”
१५मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, जेव्हा कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू स्वप्नांचा अर्थ सांगतोस.”
16 Joseph answered Pharaoh, saying, “It isn’t in me. God will give Pharaoh an answer of peace.”
१६योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.”
17 Pharaoh spoke to Joseph, “In my dream, behold, I stood on the brink of the river;
१७मग फारो योसेफाला म्हणाला, “माझ्या स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो.
18 and behold, seven fat and sleek cattle came up out of the river. They fed in the marsh grass;
१८तेव्हा पाहा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले.
19 and behold, seven other cattle came up after them, poor and very ugly and thin, such as I never saw in all the land of Egypt for ugliness.
१९त्यानंतर पाहा, सात दुबळ्या व कुरुप गाई वर आल्या. मी सबंध मिसर देशात त्यांच्यासारख्या बेढब गाई कधीच पाहिल्या नव्हत्या.
20 The thin and ugly cattle ate up the first seven fat cattle;
२०त्या दुबळ्या व कुरुप गाईंनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या.
21 and when they had eaten them up, it couldn’t be known that they had eaten them, but they were still ugly, as at the beginning. So I awoke.
२१तरीही त्या दुबळ्या व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते, त्या पूर्वीप्रमानेच कुरुप व दुबळ्या दिसत होत्या मग मी जागा झालो.
22 I saw in my dream, and behold, seven heads of grain came up on one stalk, full and good;
२२त्यानंतर माझ्या दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली,
23 and behold, seven heads of grain, withered, thin, and blasted with the east wind, sprung up after them.
२३मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी वाळलेली, बारीक व पूर्वेच्या गरम वाऱ्याच्या झळांमुळे करपलेली सात कणसे आली.
24 The thin heads of grain swallowed up the seven good heads of grain. I told it to the magicians, but there was no one who could explain it to me.”
२४बारीक कणसांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आले नाही.”
25 Joseph said to Pharaoh, “The dream of Pharaoh is one. What God is about to do he has declared to Pharaoh.
२५मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे.
26 The seven good cattle are seven years; and the seven good heads of grain are seven years. The dream is one.
२६त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत.
27 The seven thin and ugly cattle that came up after them are seven years, and also the seven empty heads of grain blasted with the east wind; they will be seven years of famine.
२७त्या दुसऱ्या सात दुबळ्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत.
28 That is the thing which I have spoken to Pharaoh. God has shown Pharaoh what he is about to do.
२८जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे.
29 Behold, seven years of great plenty throughout all the land of Egypt are coming.
२९पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल.
30 Seven years of famine will arise after them, and all the plenty will be forgotten in the land of Egypt. The famine will consume the land,
३०परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील.
31 and the plenty will not be known in the land by reason of that famine which follows; for it will be very grievous.
३१आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल.
32 The dream was doubled to Pharaoh, because the thing is established by God, and God will shortly bring it to pass.
३२तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे.
33 “Now therefore let Pharaoh look for a discreet and wise man, and set him over the land of Egypt.
३३तेव्हा, फारोने एखाद्या समंजस व शहाण्या मनुष्याची निवड करून त्यास सर्व मिसर देशावर नेमावे.
34 Let Pharaoh do this, and let him appoint overseers over the land, and take up the fifth part of the land of Egypt’s produce in the seven plenteous years.
३४फारोने हे करावे: देशावर देखरेख करणारे नेमावे. त्यांनी येत्या सात वर्षांच्या सुकाळात मिसरातल्या पिकाचा पाचवा हिस्सा गोळा करून घ्यावा.
35 Let them gather all the food of these good years that come, and store grain under the hand of Pharaoh for food in the cities, and let them keep it.
३५अशा रीतीने ही जी येणारी चांगली वर्षे, त्यामध्ये सर्व अन्नधान्य गोळा करावे. फारोच्या अधिकाराखाली ते धान्य नगरांमध्ये साठवून ठेवावे. त्यांनी त्याची राखण करावी.
36 The food will be to supply the land against the seven years of famine, which will be in the land of Egypt; so that the land will not perish through the famine.”
३६येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा पुरवठा मिसर देशाला करावा. अशा प्रकारे मग दुष्काळाच्या सात वर्षात देशाचा नाश होणार नाही.”
37 The thing was good in the eyes of Pharaoh, and in the eyes of all his servants.
३७हा सल्ला फारो राजाच्या दृष्टीने व त्याच्या सर्व सेवकांच्या दृष्टीने चांगला वाटला.
38 Pharaoh said to his servants, “Can we find such a one as this, a man in whom is the Spirit of God?”
३८फारो त्याच्या सेवकांना म्हणाला, “देवाचा आत्मा ज्याच्यात आहे असा, ह्याच्यापेक्षा अधिक चांगला व योग्य असा दुसरा कोणी मनुष्य सापडेल काय?”
39 Pharaoh said to Joseph, “Because God has shown you all of this, there is no one so discreet and wise as you.
३९तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा समंजस व शहाणा दुसरा कोणी नाही.
40 You shall be over my house. All my people will be ruled according to your word. Only in the throne I will be greater than you.”
४०तू माझ्या घराचा अधिकारी हो आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझे सर्व लोक चालतील. या देशात केवळ राजासनापुरता म्हणून काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
41 Pharaoh said to Joseph, “Behold, I have set you over all the land of Egypt.”
४१मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला सर्व मिसर देशावर नेमले आहे.”
42 Pharaoh took off his signet ring from his hand, and put it on Joseph’s hand, and arrayed him in robes of fine linen, and put a gold chain about his neck.
४२मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्यास घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली.
43 He made him ride in the second chariot which he had. They cried before him, “Bow the knee!” He set him over all the land of Egypt.
४३नंतर त्याने त्यास आपल्या दुसऱ्या रथात बसवले. लोक त्याच्यापुढे आरोळी देत चालले “गुडघे टेका.” फारोने त्यास सर्व देशावर नेमले.
44 Pharaoh said to Joseph, “I am Pharaoh. Without you, no man shall lift up his hand or his foot in all the land of Egypt.”
४४फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो आहे, आणि सर्व मिसर देशात तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाही.”
45 Pharaoh called Joseph’s name Zaphenath-Paneah. He gave him Asenath, the daughter of Potiphera priest of On as a wife. Joseph went out over the land of Egypt.
४५फारो राजाने योसेफाला “सापनाथ-पानेह” असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ ही योसेफाला पत्नी करून दिली. योसेफ सर्व मिसर देशावर अधिकारी झाला.
46 Joseph was thirty years old when he stood before Pharaoh king of Egypt. Joseph went out from the presence of Pharaoh, and went throughout all the land of Egypt.
४६योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. योसेफाने मिसर देशभर दौरा करून देशाची पाहणी केली.
47 In the seven plenteous years the earth produced abundantly.
४७सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले.
48 He gathered up all the food of the seven years which were in the land of Egypt, and laid up the food in the cities. He stored food in each city from the fields around that city.
४८योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्नधान्य गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवले. त्याने प्रत्येक नगराभोवतालच्या शेतातले अन्नधान्य त्यामध्येच साठवून ठेवले.
49 Joseph laid up grain as the sand of the sea, very much, until he stopped counting, for it was without number.
४९योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळूप्रमाणे अन्नधान्य गोळा करून साठवून ठेवले. ते इतके होते की, त्याने मोजणे सोडले कारण ते मोजमाप करता येत नव्हते.
50 To Joseph were born two sons before the year of famine came, whom Asenath, the daughter of Potiphera priest of On, bore to him.
५०दुष्काळ येण्यापूर्वी योसेफाला, आसनथ जी ओनचा याजक पोटीफर याची मुलगी तिच्या पोटी दोन पुत्र झाले.
51 Joseph called the name of the firstborn Manasseh, “For”, he said, “God has made me forget all my toil, and all my father’s house.”
५१योसेफाने पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे ठेवले. कारण तो म्हणाला, “देवाने, मला झालेल्या सर्व कष्टांचा व तसेच माझ्या वडिलाच्या घराचा विसर पडू दिला.”
52 The name of the second, he called Ephraim: “For God has made me fruitful in the land of my affliction.”
५२त्याने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले, कारण तो म्हणाला, “माझ्या दुःखाच्या भूमीमध्ये देवाने मला सर्व बाबतींत सफल केले.”
53 The seven years of plenty, that were in the land of Egypt, came to an end.
५३मिसरमध्ये असलेली भरपुरीची, सुबत्तेची सात वर्षे संपली.
54 The seven years of famine began to come, just as Joseph had said. There was famine in all lands, but in all the land of Egypt there was bread.
५४सात वर्षांनंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली. सर्व देशांमध्ये दुष्काळ पडला होता, परंतु मिसरमध्ये मात्र अन्न होते.
55 When all the land of Egypt was famished, the people cried to Pharaoh for bread, and Pharaoh said to all the Egyptians, “Go to Joseph. What he says to you, do.”
५५दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी अन्नासाठी फारोकडे ओरड केली. तेव्हा फारो मिसरच्या सर्व लोकांस म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.”
56 The famine was over all the surface of the earth. Joseph opened all the store houses, and sold to the Egyptians. The famine was severe in the land of Egypt.
५६संपूर्ण देशामध्ये दुष्काळ पडला होता. योसेफाने सर्व गोदामे उघडली आणि मिसरच्या लोकांस धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार कडक दुष्काळ पडला होता.
57 All countries came into Egypt, to Joseph, to buy grain, because the famine was severe in all the earth.
५७सर्व पृथ्वीवरील देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे येऊ लागले, कारण त्या वेळी पृथ्वीच्या सर्व भागांत दुष्काळ पडला होता.

< Genesis 41 >