< Mark 13 >

1 As He was leaving the Temple, one of His disciples exclaimed, "Look, Rabbi, what wonderful stones! what wonderful buildings!"
मग येशू परमेश्वराच्या भवनातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एकजण त्यास म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे अद्भूत धोंडे व बांधलेली इमारत आहे.”
2 "You see all these great buildings?" Jesus replied; "not one stone will be left here upon another--not thrown down."
येशू त्यास म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल.”
3 He was sitting on the Mount of Olives opposite to the Temple, when Peter, James, John, and Andrew, apart from the others asked Him,
येशू परमेश्वराच्या भवनासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्यास एकांतात विचारले,
4 "Tell us, When will these things be? and what will be the sign when all these predictions are on the point of being fulfilled?"
“या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हास सांगा आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?”
5 So Jesus began to say to them: "Take care that no one misleads you.
नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.
6 Many will come assuming my name and saying, 'I am He;' and they will mislead many.
पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील.
7 But when you hear of wars and rumours of wars, do not be alarmed: come they must, but the End is not yet.
जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या अफवाविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही.
8 For nation will rise in arms against nation, and kingdom against kingdom. There will be earthquakes in various places; there will be famines. These miseries are but like the early pains of childbirth.
एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील. पण या गोष्टी म्हणजे केवळ नाशाची सुरूवात आहे.
9 "You yourselves must be on your guard. They will deliver you up to Sanhedrins; you will be brought into synagogues and cruelly beaten; and you will stand before governors and kings for my sake, to be witnesses to them for me.
तुम्ही सावध असा. ते तुम्हास न्यायसभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हास मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हास राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे रहावे लागेल.
10 But the proclamation of the Good News must be carried to all the Gentiles before the End comes.
१०या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे.
11 When however they are marching you along under arrest, do not be anxious beforehand about what you are to say, but speak what is given you when the time comes; for it will not be you who speak, but the Holy Spirit.
११ते तुम्हास अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल.
12 "Brother will betray brother to be killed, and fathers will betray children; and children will rise against their parents and have them put to death.
१२भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील.
13 You will be objects of universal hatred because you are called by my name, but those who stand firm to the End will be saved.
१३आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.
14 "As soon, however, as you see the Abomination of Desolation standing where he ought not" --let the reader observe these words--"then let those in Judaea escape to the hills;
१४जेव्हा तुम्ही नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट, दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जो जिथे नको तेथे पाहाल. (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) तेव्हा जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.
15 let him who is on the roof not come down and enter the house to fetch anything out of it;
१५जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये.
16 and let not him who is in the field turn back to pick up his outer garment.
१६आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये.
17 And alas for the women who at that time are with child or have infants!
१७त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल.
18 "But pray that it may not come in the winter.
१८हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा.
19 For those will be times of suffering the like of which has never been from the first creation of God's world until now, and assuredly never will be again;
१९कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल.
20 and but for the fact that the Lord has cut short those days, no one would escape; but for the sake of His own People whom He has chosen for Himself He has cut short the days.
२०परमेश्वराने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या मनुष्यांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.
21 "At that time if any one says to you, 'See, here is the Christ!' or 'See, He is there!' do not believe it.
२१आणि जर कोणी तुम्हास म्हणेल की ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे,’ तर त्यावर विश्वास ठेवू नका.
22 For there will rise up false Christs and false prophets, displaying signs and prodigies with a view to lead astray--if indeed that were possible--even God's own People.
२२कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांस फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील.
23 But as for yourselves, be on your guard: I have forewarned you of everything.
२३पहा, तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हास सर्वकाही सांगून ठेवले आहे.
24 "At that time, however, after that distress, the sun will be darkened and the moon will not shed her light;
२४परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही.’
25 the stars will be seen falling from the firmament, and the forces which are in the heavens will be disordered and disturbed.
२५‘आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’
26 And then will they see the Son of Man coming in clouds with great power and glory.
२६आणि लोक मनुष्याचा पुत्राला मेघांरूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील.
27 Then He will send forth the angels and gather together His chosen People from north, south, east and west, from the remotest parts of the earth and the sky.
२७नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशातून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.
28 "Learn from the fig-tree the lesson it teaches. As soon as its branch has become soft and it is bursting into leaf, you know that summer is near.
२८अंजिराच्या झाडापासून शिका. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हास उन्हाळा जवळ आला हे समजते.
29 So also do you, when you see these things happening, be sure that He is near, at your very door.
२९त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हास समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे.
30 I tell you in solemn truth that the present generation will certainly not pass away without all these things having first taken place.
३०मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.
31 Earth and sky will pass away, but it is certain that my words will not pass away.
३१स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
32 "But as to that day or the exact time no one knows--not even the angels in Heaven, nor the Son, but the Father alone.
३२त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे.
33 Take care, be on the alert, and pray; for you do not know when it will happen.
३३सावध असा, प्रार्थनेत जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही.
34 It is like a man living abroad who has left his house, and given the management to his servants--to each one his special duty--and has ordered the porter to keep awake.
३४ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासास निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. तसे हे आहे.
35 Be wakeful therefore, for you know not when the master of the house is coming--in the evening, at midnight, at cock-crow, or at dawn.
३५म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही.
36 Beware lest He should arrive unexpectedly and find you asleep.
३६जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील.
37 Moreover, what I say to you I say to all--Be wakeful!"
३७मी तुम्हास सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा.”

< Mark 13 >