< 1 Corinthians 4 >
1 As for us Apostles, let any one take this view of us--we are Christ's officers, and stewards of God's secret truths.
१आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
2 This being so, it follows that fidelity is what is required in stewards.
२या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.
3 I however am very little concerned at undergoing your scrutiny, or that of other men; in fact I do not even scrutinize myself.
३पण तुम्हाकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा ही मला लहान गोष्ट वाटत आहे, मी माझा स्वतःचा देखील न्याय करीत नाही.
4 Though I am not conscious of having been in any way unfaithful, yet I do not for that reason stand acquitted; but He whose scrutiny I must undergo is the Lord.
४कारण जरी माझा विवेक मला दोष देत नाही तरी त्यामुळे मी निर्दोष ठरतो असे नाही. प्रभू हाच माझा न्यायनिवाडा करणारा आहे.
5 Therefore form no premature judgements, but wait until the Lord returns. He will both bring to light the secrets of darkness and will openly disclose the motives that have been in people's hearts; and then the praise which each man deserves will come to him from God.
५म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
6 In writing this much, brethren, with special reference to Apollos and myself, I have done so for your sakes, in order to teach you by our example what those words mean, which say, "Nothing beyond what is written!" --so that you may cease to take sides in boastful rivalry, for one teacher against another.
६आता, बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरिता व अपुल्लोसाकरीता उदाहरणाने लागू केल्या आहेत. यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी स्वतःला न मानावे हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावे म्हणजे तुम्हापैकी कोणीही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करू नये.
7 Why, who gives you your superiority, my brother? Or what have you that you did not receive? And if you really did receive it, why boast as if this were not so?
७कारण तुझ्यात व दुसऱ्यात फरक पाहतो तो कोण आहे? आणि तुला मिळाले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
8 Every one of you already has all that heart can desire; already you have grown rich; without waiting for us, you have ascended your thrones! Yes indeed, would to God that you had ascended your thrones, that we also might reign with you!
८तुम्हास ज्याची गरज आहे ते सर्व आधीच तुमच्याकडे आहे. तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हास असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.
9 God, it seems to me, has exhibited us Apostles last of all, as men condemned to death; for we have come to be a spectacle to all creation--alike to angels and to men.
९कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत.
10 We, for Christ's sake, are labeled as "foolish"; you, as Christians, are men of shrewd intelligence. We are mere weaklings: you are strong. You are in high repute: we are outcasts.
१०आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!
11 To this very moment we endure both hunger and thirst, with scanty clothing and many a blow.
११अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.
12 Homes we have none. Wearily we toil, working with our own hands. When reviled, we bless; when persecuted, we bear it patiently;
१२आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो.
13 when slandered, we try to conciliate. We have come to be regarded as the mere dirt and filth of the world--the refuse of the universe, even to this hour.
१३जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.
14 I am not writing all this to shame you, but I am offering you advice as my dearly-loved children.
१४मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे.
15 For even if you were to have ten thousand spiritual instructors--for all that you could not have several fathers. It is I who in Christ Jesus became your father through the Good News.
१५कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे.
16 I entreat you therefore to become like me.
१६यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.
17 For this reason I have sent Timothy to you. Spiritually he is my dearly-loved and faithful child. He will remind you of my habits as a Christian teacher--the manner in which I teach everywhere in every Church.
१७यासाठीच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवतो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणुकीची आठवण करून देईल.
18 But some of you have been puffed up through getting the idea that I am not coming to Corinth.
१८पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काहीजण गर्वाने फुगले आहेत.
19 But, if the Lord is willing, I shall come to you without delay; and then I shall know not the fine speeches of these conceited people, but their power.
१९तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले आहेत हे पाहण्यासाठी नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत हे मी पाहीन.
20 For Apostolic authority is not a thing of words, but of power.
२०कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते.
21 Which shall it be? Shall I come to you with a rod, or in a loving and tender spirit?
२१तुम्हास काय पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हास शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे, की प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?