< Ezekiel 12 >

1 The word of the LORD also came to me, saying,
परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला,
2 Son of man, thou dwellest in the midst of a rebellious house, who have eyes to see, and see not; they have ears to hear, and hear not: for they [are] a rebellious house.
“मानवाच्या मुला, तू या बंडखोर घराण्याच्या लोकात राहतो, जेथे त्यांच्याकडे बघण्याचे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत, आणि त्यांच्याकडे कान आहेत पण ते ऐकू शकत नाही, कारण ते बंडखोर घराणे आहेत.
3 Therefore, thou son of man, prepare thee stuff for removing, and remove by day in their sight; and thou shalt remove from thy place to another place in their sight; it may be they will consider, though they [are] a rebellious house.
तथापि मानवाच्या मुला तुझ्यासाठी सर्व काही हद्दपार करण्याची तयारी कर, आणि त्यांच्या डोळ्यांदेखत बाहेर निघून जा, मी तुला तुझ्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर हद्दपार करीन. कदाचित त्यांना कळून येईल ते फितुर घराण्यातले आहेत.
4 Then shalt thou bring forth thy stuff by day in their sight, as stuff for removing: and thou shalt go forth at evening in their sight, as they that go forth into captivity.
आणि तू बाहेर हद्दपार जातांना आपल्या वस्तू दिवसा ढवळ्या त्यांच्या डोळ्यांदेखत घेऊन जाशील; बाहेर हद्दपार होतांना सायंकाळी त्यांच्या नजरे देखत निघून जा.
5 Dig thou through the wall in their sight, and carry out thereby.
त्यांच्या नजरे देखत भिंतीला (वेशीला) एक भगदड पाड, आणि त्यातून बाहेर निघ.
6 In their sight shalt thou bear [it] upon [thy] shoulders, [and] carry [it] forth in the twilight: thou shalt cover thy face, that thou mayest not see the ground: for I have set thee [for] a sign to the house of Israel.
त्यांच्या डोळ्यादेखत आपले सामान वस्तू आपल्या खांद्यावर घे, आणि त्यांना अंधारात घेऊन जा, आणि तोंड झाकून घे म्हणजे तुला जमीन दिसणार नाही, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी हे चिन्ह ठेवले आहे.”
7 And I did so as I was commanded: I brought forth my stuff by day, as stuff for captivity, and in the evening I digged through the wall with my hand; I brought [it] forth in the twilight, [and] I bore [it] upon [my] shoulder in their sight.
म्हणून मी हे केले, जसे तू मला बजावले, दिवसा ढवळ्या मी सर्व वस्तू बाहेर हद्दपार आणल्या, आणि सायंकाळी आपल्या हातांनी वेशीला भगदड पाडले. मी माझ्या सर्व वस्तू अंधारात बाहेर काढल्या आणि त्यांच्या डोळ्यांदेखत सर्व आपल्या खांद्यावर घेऊन आलो.
8 And in the morning came the word of the LORD to me, saying,
मग परमेश्वर देवाचे शब्द मला प्रभात समयी आले,
9 Son of man, hath not the house of Israel, the rebellious house, said to thee, What doest thou?
“मानवाच्या मुला, हे इस्राएलाच्या घराण्या तू काय करतोस, बंडखोर पणा तू केला नाहीस काय?”
10 Say thou to them, Thus saith the Lord GOD, This burden [concerneth] the prince in Jerusalem, and all the house of Israel that [are] among them.
१०त्यांना सांग, परमेश्वर प्रभू देव हे सांगतो ही भविष्यात्मक कृती यरूशलेमेच्या राजपुत्रांना, आणि सर्व येथे जमलेल्या इस्राएलाच्या घराण्यासाठी आहे.
11 Say, I [am] your sign: as I have done, so shall it be done to them: they shall remove [and] go into captivity.
११असे सांग, मी तुम्हासाठी खुण देतो की, जे मी केले ते सर्वांसाठी होईल; ते सर्वजण सरहद्दपार गुलामगिरीत जातील.
12 And the prince that [is] among them shall bear upon [his] shoulder in the twilight, and shall go forth: they shall dig through the wall to carry out thereby: he shall cover his face, that he may not see the ground with [his] eyes.
१२त्यांच्यातला राजा अंधारात सामान आपल्या खांद्यावर घेऊन जाईल आणि तो वेशीच्या बाहेर निघून जाईल. तो वेशीला भगदड पाडून आपले सामान घेऊन जाईल, तो आपले तोंड झाकील, त्यामुळे आपल्या डोळ्यांनी जमीन बघणार नाही.
13 My net also will I spread upon him, and he shall be taken in my snare: and I will bring him to Babylon [to] the land of the Chaldeans, yet shall he not see it, though he shall die there.
१३मी आपली जाळी त्यांच्यावर टाकीन आणि तो माझ्या फंद्यात पकडला जाईल; मग मी त्यांना बाबेलात खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन, पण ती भूमी ते बघणार नाही त्यामध्ये त्यांचा अंत होईल.
14 And I will scatter towards every wind all that [are] about him to help him, and all his bands; and I will draw out the sword after them.
१४मी त्यांना सगळ्या अवतीभोवती असलेल्या त्यांच्या मदत करणाऱ्यांना व त्यांच्या सेनेची पांगापांग करेन, आणि त्यांचा पाठलाग तलवारीने करेन.
15 And they shall know that I [am] the LORD, when I shall scatter them among the nations, and disperse them in the countries.
१५मग त्यांना कळेल मी परमेश्वर देव आहे, जेव्हा मी त्यांना देशातून संपूर्ण भूमीतून पांगवेन.
16 But I will leave a few men of them from the sword, from the famine, and from the pestilence; that they may declare all their abominations among the heathen whither they come; and they shall know that I [am] the LORD.
१६पण त्यांच्यातील काही लोकांस तलवारीने, दुष्काळाने, आणि साथीच्या रोगाने पांगवेन, ज्या भूमीत मी त्यांना घेऊन गेलो तेथे त्यांनी त्यांच्या घृणास्पद गोष्टीची नोंद केलेली असेल, म्हणून त्यांना कळेल मी परमेश्वर देव आहे.
17 Moreover the word of the LORD came to me, saying,
१७परमेश्वराचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
18 Son of man, eat thy bread with quaking, and drink thy water with trembling and with solicitude.
१८मानवाच्या मुला आपली भाकर थरथरत खाऊन टाक, आणि आपले पाणी थरकापत आणि चिंतातुर होऊन पिवून घे.
19 And say to the people of the land, Thus saith the Lord GOD of the inhabitants of Jerusalem, [and] of the land of Israel; They shall eat their bread with solicitude, and drink their water with astonishment, that her land may be desolate from all that is therein, because of the violence of all them that dwell therein.
१९मग त्या भूमीतील लोकांस सांग, प्रभू परमेश्वर हे यरूशलेम रहिवाशासंबंधी सांगतोय; इस्राएल निवासी तुम्ही आपली भाकर थरथर कापत खाल व पाणी प्याल आजपावोत तुमची भूमी लुटली जाईल कारण जे त्या ठिकाणी राहतात, त्यांच्या हिंसेमुळे हे घडेल.
20 And the cities that are inhabited shall be laid waste, and the land shall be desolate; and ye shall know that I [am] the LORD.
२०म्हणून त्यांच्या राहत्या नगराला उध्वस्त केले जाईल, आणि भूमी ओसाड नापीक होईल; मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे.
21 And the word of the LORD came to me, saying,
२१पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
22 Son of man, what [is] that proverb [that] ye have in the land of Israel, saying, The days are prolonged, and every vision faileth?
२२मानवाच्या मुला, इस्राएलाच्या भूमीत जी तुझी प्रसिध्द म्हण आहे, प्रदीर्घ दिवसात सर्व दृष्टांत वायफळ ठरतील.
23 Tell them therefore, Thus saith the Lord GOD: I will make this proverb to cease, and they shall no more use it as a proverb in Israel; but say to them, The days are at hand, and the effect of every vision.
२३यास्तव त्यांना सांग परमेश्वर प्रभू देव असे म्हणतो, मी या म्हणीला संपुष्टात आणिन यासाठी की इस्राएलात याचा पुन्हा कोणी वापर करणार नाही. “मग त्यांना जाहीर कर, दिवस जवळ येत आहेत सर्व बोलके होतील”
24 For there shall no more be any vain vision nor flattering divination within the house of Israel.
२४आता येथून पुढे कोणतेही पाखंडी दृष्टांत नसणार किंवा अनूकुल भविष्य कथन इस्राएलात होणार नाही.
25 For I [am] the LORD: I will speak, and the word that I shall speak shall come to pass; it shall no more be prolonged: for in your days, O rebellious house, will I say the word, and will perform it, saith the Lord GOD.
२५मी परमेश्वर देव आहे आणि मी बोलत आहे. मी बोललेले शब्द पूर्ण करेन. आता येथे उशिर होणार नाही. हे परमेश्वर देव बंडखोर घराण्याला जाहीर करतो की, मी बोललेले शब्द पूर्ण करतो.
26 Again the word of the LORD came to me, saying,
२६पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला,
27 Son of man, behold, [they of] the house of Israel say, The vision that he seeth [is] for many days [to come], and he prophesieth of the times [that are] distant.
२७मानवाच्या मुला पहा! इस्राएलाचे घराणे म्हणेल जो दृष्टांत अनेक दिवसा पासून पाहिला आणि पुढच्या काळासाठी भाकीत पूर्ण येत आहे.
28 Therefore say to them, Thus saith the Lord GOD; There shall none of my words be further deferred, but the word which I have spoken shall be done, saith the Lord GOD.
२८यास्तव त्यांना सांग परमेश्वर देव असे म्हणतो; माझ्या शब्दाला उशीर होणार नाही, जो शब्द मी बोललो तो पूर्ण करणार आहे, हे परमेश्वर देव जाहीर करत आहे.

< Ezekiel 12 >