< 1 Samuel 29 >

1 Now the Philistines collected all their armies to Aphek: and the Israelites encamped by a fountain which [is] in Jezreel.
मग पलिष्ट्यांनी आपली सर्व सैन्ये अफेक येथे एकत्र जमवली आणि इस्राएली मनुष्यांनी इज्रेलात एका झऱ्याजवळ छावणी दिली.
2 And the lords of the Philistines passed on by hundreds, and by thousands: but David and his men passed on in the rear with Achish.
पलिष्ट्यांचे सरदार आपापल्या शंभरासोबत व हजांरासोबत पुढे चालले आणि त्यांच्या पिछाडीस दावीद व त्याची माणसे आखीशाबरोबर चालली.
3 Then said the princes of the Philistines, What [do] these Hebrews [here]? And Achish said to the princes of the Philistines, [Is] not this David, the servant of Saul the king of Israel, who hath been with me these days, or these years, and I have found no fault in him since he fell [to me] to this day?
तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार बोलले, “हे इब्री येथे काय करतात?” मग आखीश पलिष्ट्यांच्या सरदाराना म्हणाला, “इस्राएलाचा राजा शौल याचा चाकर दावीद तो हाच आहे की नाही? तो माझ्याजवळ काही दिवस किंवा काही वर्षे राहिला आहे. आणि तो माझ्याकडे आला त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्याकडे मला काही अपराध सापडला नाही.”
4 And the princes of the Philistines were wroth with him; and the princes of the Philistines said to him, Make this man return, that he may go again to his place which thou hast appointed him, and let him not go down with us to battle, lest in the battle he should be an adversary to us: for with what would he reconcile himself to his master? [would it] not [be] with the heads of these men?
मग पलिष्ट्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले; आणि पलिष्ट्यांचे सरदार त्यास म्हणाले, “जे ठिकाण तू या मनुष्यास नेमून दिले येथे त्याच्या ठिकाणी त्याने जावे म्हणून त्यास परत जाण्यास सांग; त्याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये; तो आला तर कदाचित तो लढाईत आमचा विरोधी होईल; कारण हा आपल्या प्रभूशी कशावरून समेट करणार नाही बरे? या आपल्या मनुष्यांच्या शिरांनीच की नाही?
5 [Is] not this David, of whom they sung one to another in dances, saying, Saul slew his thousands, and David his ten thousands?
शौलाने हजारांना मारले व दावीदाने दहा हजारांना मारले, असे ते नाचत व गात ज्याच्याविषयी एकमेकांना म्हणाले, तोच हा दावीद आहे की नाही?”
6 Then Achish called David, and said to him, Surely, [as] the LORD liveth, thou hast been upright, and thy going out and thy coming in with me in the host [is] good in my sight: for I have not found evil in thee from the day of thy coming to me to this day: nevertheless the lords favor thee not.
मग आखीशाने दावीदाला बोलावून त्यास म्हटले, “परमेश्वर जिवंत आहे; तू सरळपणाने वागला आहेस व माझ्याबरोबर सैन्यात तुझे बाहेर जाणे व तुझे आत येणे माझ्या दृष्टीने बरे आहे. आणि तू माझ्याजवळ आला त्या दिवसापासून आजपर्यंत तुझ्याठायी काही वाईट मला सापडले नाही. तथापि तू सरदारांच्या मनास येत नाहीस.
7 Therefore now return, and go in peace, that thou displease not the lords of the Philistines.
तर तू पलिष्ट्यांच्या सरदारांना असंतूष्ट करू नये. म्हणून आता शांतीने निघून परत जा.”
8 And David said to Achish, But what have I done? and what hast thou found in thy servant, so long as I have been with thee to this day, that I may not go and fight against the enemies of my lord the king.
तेव्हा दावीद आखीशाला म्हणाला, “मी आपला धनी राजा याच्या शत्रूशी लढायला येऊ नये असे मी काय केले आहे? मी तुमच्या पुढे आलो त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हास आपल्या दासाच्याठायी काय सापडले आहे?”
9 And Achish answered and said to David, I know that thou [art] good in my sight, as an angel of God: notwithstanding, the princes of the Philistines have said, He shall not go up with us to the battle.
तेव्हा आखीशाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा चांगला आहेस असे मी जाणतो. परंतु याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये असे पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले आहेत.
10 Wherefore now rise early in the morning with thy master's servants that are come with thee: and as soon as ye shall have risen early in the morning, and have light, depart.
१०तर आता तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासहीत तू पहाटेस ऊठ आणि उजेड झाला म्हणजे परत माघारे जा.”
11 So David and his men rose early to depart in the morning, to return into the land of the Philistines. And the Philistines went up to Jezreel.
११मग पलिष्ट्यांच्या देशात परत जाण्यास दावीद व त्याची माणसे मोठ्या पहाटेस उठली; पलिष्टी वर इज्रेल येथे गेले.

< 1 Samuel 29 >