< Numbers 3 >

1 Now this is the history of the descendants of Aaron and Moses when Yahweh spoke with Moses on Mount Sinai.
जेव्हा परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळचा अहरोन व मोशे ह्याच्या वंशावळीचा इतिहास आता हा असाः
2 The names of Aaron's sons were Nadab the firstborn, and Abihu, Eleazar, and Ithamar.
अहरोनाच्या मुलांची नावे हीः नादाब हा प्रथम जन्मलेला, व अबीहू, एलाजार व इथामार.
3 These are the names of the sons of Aaron, the priests who were anointed and who were ordained to serve as priests.
अहरोनाचे हे पुत्र जे अभिषेक केलेले याजक होते, ज्यांना त्याने याजकपदात सेवा करण्यासाठी समर्पित केले, त्यांची नावे ही आहेत
4 But Nadab and Abihu fell dead before Yahweh when they offered to him unacceptable fire in the wilderness of Sinai. Nadab and Abihu had no children, so just Eleazar and Ithamar served as priests with Aaron their father.
परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात परमेश्वरापुढे अस्विकारनीय अग्नी अर्पिला तेव्हा ते परमेश्वरापुढे मरण पावले. त्यांना पुत्र नव्हते म्हणून एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.
5 Yahweh spoke to Moses. He said,
परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
6 “Bring the tribe of Levi and present them to Aaron the priest for them to help him.
लेवीच्या वंशाला आण आणि त्यांना अहरोन याजकासमोर त्यास मदत करण्यास हजर कर.
7 They must perform the duties on behalf of Aaron and the whole community before the tent of meeting. They must serve in the tabernacle.
अहरोन व सर्व मंडळी दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असता लेवी लोक त्यांना मदत करतील. त्यांनी निवासमंडपात सेवा करावी.
8 They must care for all the furnishings in the tent of meeting, and they must help the tribes of Israel to carry out the tabernacle service.
त्यांनी दर्शनमंडपामधील सर्व वस्तूंची काळजी घ्यावी आणि इस्राएल वंशांना निवासमंडपाच्या सेवेत त्यांना सामान वाहण्यास मदत करावी.
9 You must give the Levites to Aaron and his sons. They are wholly given to help him serve the people of Israel.
अहरोन व त्याच्या मुलांना तू लेवींच्या हाती दे. इस्राएल लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्णपणे मदतीसाठी देण्यात आले आहे.
10 You must appoint Aaron and his sons as priests, but any foreigner who comes near must be put to death.”
१०“अहरोन व त्याचे पुत्र यांची याजक म्हणून नेमणूक कर. त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे. कोणी परका जवळ आल्यास त्यास जिवे मारावे.”
11 Yahweh spoke to Moses. He said,
११परमेश्वर मोशेशी बोलला तो म्हणाला,
12 “Look, I have taken the Levites from among the people of Israel. I have done this instead of taking each firstborn male who is born among the people of Israel. The Levites belong to me.
१२पाहा, मी इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांस निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील.
13 All the firstborn belong to me. On the day that I attacked all the firstborn in the land of Egypt, I set apart for myself all the firstborn in Israel, both people and animals. They belong to me. I am Yahweh.”
१३“सर्व प्रथम जन्मलेले माझेच आहेत. मी मिसर देशात सर्व प्रथम जन्मलेल्यांना मारून टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरुषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले. ते माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.”
14 Yahweh spoke to Moses in the wilderness of Sinai. He said,
१४परमेश्वर सीनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
15 “Count the descendants of Levi in each family, in their clans. Count every male who is one month old and older.”
१५“लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.”
16 Moses counted them, following the word of Yahweh, just as he was commanded to do.
१६मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास झालेल्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली.
17 The names of Levi's sons were Gershon, Kohath, and Merari.
१७लेवींच्या मुलांची नावे गेर्षोन, कहाथ व मरारी होते.
18 The clans coming from Gershon's sons were Libni and Shimei.
१८गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळावरून ही आहेत. लिब्नी व शिमी.
19 The clans coming from Kohath's sons were Amram, Izhar, Hebron, and Uzziel.
१९कहाथाचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल.
20 The clans coming from Merari's sons were Mahli and Mushi. These are the clans of the Levites, listed clan by clan.
२०मरारीचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: महली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.
21 The clans of the Libnites and the Shimeites come from Gershon. These are the clans of the Gershonites.
२१गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली ही गेर्षोनी कुळे.
22 All the males from a month old and older were counted, totaling 7,500.
२२या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते.
23 The clans of the Gershonites must camp on the west side of the tabernacle.
२३गेर्षोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासमंडपाच्या मागे आपले डेरे दिले.
24 Eliasaph son of Lael must lead the clans of the descendants of the Gershonites.
२४लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता.
25 The family of Gershon must care for the tent of meeting including the tabernacle. They must care for the tent, its covering, and the curtain used as the entrance to the tent of meeting.
२५दर्शनमंडपामधील निवासमंडप, तंबू आणि त्यावरील आच्छादन, दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले.
26 They must care for the courtyard hangings, the curtain at the courtyard entrance—the courtyard that surrounds the sanctuary and the altar. They must care for the ropes of the tent of meeting and for everything in it.
२६पवित्र निवासमंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
27 These clans come from Kohath: the clan of the Amramites, the clan of the Izharites, the clan of the Hebronites, and the clan of the Uzzielites. These clans belong to the Kohathites.
२७कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
28 8,600 males have been counted aged one month old and older to take care of the things that belong to Yahweh.
२८या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.
29 The Kohath clans must camp on the south side of the tabernacle.
२९कहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेस आपली छावणी उभारली.
30 Elizaphan son of Uzziel must lead the clans of the Kohathites.
३०उज्जियेलाचा मुलगा अलीसापान हा कहाथी घराण्याचा पुढारी होता.
31 They must care for the ark, the table, the lampstand, the altars, the holy things that are used in their service, the curtain, and all the work around it.
३१पवित्र कराराचा कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाची सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
32 Eleazar son of Aaron the priest must lead the men who lead the Levites. He must supervise the men who care for the holy place.
३२अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.
33 Two clans have come from Merari: the clan of the Mahlites and the clan of the Mushites. These clans have come from Merari.
३३मरारीपासून महली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे.
34 6,200 males have been counted aged one month old and older.
३४या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष सहा हजार दोनशे होते.
35 Zuriel son of Abihail must lead the clans of Merari. They must camp on the north side of the tabernacle.
३५अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. या कुळांना पवित्र निवासमंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपली छावणी ठोकली.
36 The descendants of Merari must care for the framing of the tabernacle, the crossbars, posts, bases, all the hardware, and everything related to them, including
३६मरारी वंशातील लोकांस पवित्र निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवासमंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व वस्तूंची निगा राखण्याचे काम देण्यात आले;
37 the pillars and posts of the courtyard that surround the tabernacle, with their sockets, pegs, and ropes.
३७तसेच पवित्र निवासमंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका, उथळ्या, मेखा आणि तणाव्याचे दोर यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले.
38 Moses and Aaron and his sons must camp on the east side of the tabernacle, in front of the tent of meeting, toward the sunrise. They are responsible for the fulfillment of the duties of the sanctuary and the duties of the people of Israel. Any foreigner who approaches the sanctuary must be put to death.
३८मोशे, अहरोन व त्याचे पुत्र यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवासमंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्यास जिवे मारावे असा त्यांना आदेश होता.
39 Moses and Aaron counted all the males in the clans of Levi who were aged one month old and older, just as Yahweh commanded. They counted twenty-two thousand men.
३९लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्याना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीची एकूण संख्या बावीस हजार भरली.
40 Yahweh said to Moses, “Count all the firstborn males of the people of Israel who are aged one month old and older. List their names.
४०परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर;
41 You must take the Levites for me—I am Yahweh—instead of all the firstborn of the people of Israel, and the livestock of the Levites instead of the firstborn of the livestock of the descendants of Israel.”
४१आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले पुत्र व पुरुष घेणार नाही, त्याऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”
42 Moses counted all the firstborn people of Israel as Yahweh had commanded him to do.
४२तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, त्याने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वाची गणती केली.
43 He counted all the firstborn males by name, aged one month old and older. He counted 22,273 men.
४३मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल पुत्र व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती.
44 Again, Yahweh spoke to Moses. He said,
४४परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,
45 “Take the Levites instead of all the firstborn among the people of Israel, and take the Levites' livestock instead of the people's livestock. The Levites belong to me—I am Yahweh.
४५इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी लेवी लोकांचे पशू घे, कारण लेवी माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.
46 You must collect five shekels for the redemption of each of the 273 firstborn people of Israel who exceed the number of the Levites.
४६लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर पुत्र अधिक शिल्लक राहतात.
47 You must use the shekel of the sanctuary as your standard weight. The shekel equals twenty gerahs.
४७त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येकाकडून पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच पाच शेकेल घे. एक शेकेल म्हणजे वीस गेरा.
48 You must give the price of redemption that you paid to Aaron and his sons.”
४८प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे जे अधिक पैसे येतील तो पैसा अहरोन व त्याच्या मुलांना दे.
49 So Moses collected the payment of redemption from those who exceeded the number of those redeemed by the Levites.
४९आणि लेव्यांकडून ज्यांची खंडणी झाली त्यांच्याहून जे अधिक होते त्यांच्यापासून त्यांच्या खंडणीचा पैसा मोशेने घेतला.
50 Moses collected the money from the firstborn of the people of Israel. He collected 1,365 shekels, weighing with the shekel of the sanctuary.
५०इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्याकडून त्याने जे पैसे घेतले अधिकृत पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण एक हजार तीनशे पासष्ट शेकेल भरले.
51 Moses gave the redemption money to Aaron and to his sons. Moses did everything he was told to do by Yahweh's word, as Yahweh had commanded him.
५१मोशेने खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या मुलांना दिले. जशी परमेश्वराने त्यास आज्ञा केली होती ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या वचनानुसार मोशेने केली.

< Numbers 3 >