< Nehemiah 7 >
1 When the wall was finished and I had set up the doors in place, and the gatekeepers and singers and Levites had been appointed,
१तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. आणि द्वारपाल व गायक आणि लेवी यांची नेमणूक करण्यात आली.
2 I gave my brother Hanani charge over Jerusalem, along with Hananiah who had oversight of the fortress, for he was a faithful man and feared God more than many.
२यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरूशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.
3 I said to them, “Do not open the gates of Jerusalem until the sun is hot. While the gatekeepers are on guard, you may shut the doors and bar them. Appoint guards from those who live in Jerusalem, some at the place of their guard station, and some in front of their own homes.”
३आणि मी त्यांना म्हणालो, “सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना, दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरूशलेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा, त्यापैकी काहीजणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
4 Now the city was wide and large, but there were few people within it, and no houses had yet been rebuilt.
४आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.
5 My God put into my heart to gather together the nobles, the officials, and the people to enroll them by their families. I found the book of the genealogy of those who returned at the first and found the following written in it.
५माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळयांची नावनिशी मला सापडली, आणि त्यामध्ये जे लिहिले होते ते हे.
6 “These are the people of the province who went up out of the captivity of those exiles whom Nebuchadnezzar the king of Babylon took into exile. They returned to Jerusalem and to Judah, each to his city.
६बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने या लोकांस बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरूशलेम आणि यहूदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.
7 They came with Zerubbabel, Jeshua, Nehemiah, Azariah, Raamiah, Nahamani, Mordecai, Bilshan, Mispereth, Bigvai, Nehum, and Baanah. The number of the men of the people of Israel included the following.
७जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:
8 The descendants of Parosh, 2,172.
८परोशाचे वंशज दोन हजार एकशे बहात्तर,
9 The descendants of Shephatiah, 372.
९शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर,
10 The descendants of Arah, 652.
१०आरहचे वंशज सहाशें बावन्न.
11 The descendants of Pahath-Moab, through the descendants of Jeshua and Joab, 2,818.
११येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशें अठरा,
12 The descendants of Elam, 1,254.
१२एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न,
13 The descendants of Zattu, 845.
१३जत्तूचे वंशज आठशे पंचेचाळीस,
14 The descendants of Zakkai, 760.
१४जक्काईचे वंशज सातशे साठ.
15 The descendants of Binnui, 648.
१५बिन्नुईचे वंशज सहाशें अठ्ठेचाळीस,
16 The descendants of Bebai, 628.
१६बेबाईचे वंशज सहाशें अठ्ठावीस
17 The descendants of Azgad, 2,322.
१७अजगादचे वंशज दोन हजार तीनशे बावीस,
18 The descendants of Adonikam, 667.
१८अदोनीकामचे वंशज सहाशें सदुसष्ट.
19 The descendants of Bigvai, 2,067.
१९बिग्वईचे वंशज दोन हजार सदुसष्ट,
20 The descendants of Adin, 655.
२०आदीनाचे वंशज सहाशें पंचावन्न,
21 The descendants of Ater, of Hezekiah, 98.
२१हिज्कीयाच्या कुटुंबातील आटेराचे वंशज अठ्याण्णव,
22 The descendants of Hashum, 328.
२२हाशूमाचे वंशज तीनशे अठ्ठावीस.
23 The descendants of Bezai, 324.
२३बेसाईचे वंशज तीनशे चोवीस,
24 The descendants of Hariph, 112.
२४हारिफाचे वंशज एकशे बारा,
25 The descendants of Gibeon, 95.
२५गिबोनाचे वंशज पंचाण्णव,
26 The men from Bethlehem and Netophah, 188.
२६बेथलहेम आणि नटोफा येथील माणसे एकशे अठ्याऐंशी.
27 The men from Anathoth, 128.
२७अनाथोथाची माणसे एकशे अठ्ठावीस,
28 The men of Beth Azmaveth, 42.
२८बेथ-अजमावेथाची माणसे बेचाळीस,
29 The men of Kiriath Jearim, Kephirah, and Beeroth, 743.
२९किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथयातली माणसे सातशे त्रेचाळीस,
30 The men of Ramah and Geba, 621.
३०रामा आणि गिबातली माणसे सहाशे एकवीस.
31 The men of Michmas, 122.
३१मिखमाशाची माणसे एकशे बावीस,
32 The men of Bethel and Ai, 123.
३२बेथेल आणि आय येथली माणसे एकशे तेवीस,
33 The men of the other Nebo, 52.
३३दुसऱ्या नबोची माणसे बावन्न,
34 The people of the other Elam, 1,254.
३४दुसऱ्या एलामाची माणसे एक हजार दोनशे चौपन्न.
35 The men of Harim, 320.
३५हारीमाचे वंशज तीनशे वीस,
36 The men of Jericho, 345.
३६यरीहोचे वंशज तीनशे पंचेचाळीस,
37 The men of Lod, Hadid, and Ono, 721.
३७लोद, हादीद व ओनो याचे वंशज सातशे एकवीस,
38 The men of Senaah, 3,930.
३८सनाहाचे वंशज तीन हजार नऊशें तीस.
39 The priests: The descendants of Jedaiah (of the house of Jeshua), 973.
३९याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातली यदया याचे वंशज नऊशें त्र्याहत्तर
40 The descendants of Immer, 1,052.
४०इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न,
41 The descendants of Pashhur, 1,247.
४१पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस,
42 The descendants of Harim, 1,017.
४२हारीमाचे वंशज एक हजार सतरा.
43 The Levites: The descendants of Jeshua, of Kadmiel, of Binnui, and of Hodevah, 74.
४३लेवी: होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज चौऱ्याहत्तर
44 The singers: The descendants of Asaph, 148.
४४गाणारे: आसाफाचे वंशज एकशे अठ्ठेचाळीस,
45 The gatekeepers of the descendants of Shallum, the descendants of Ater, the descendants of Talmon, the descendants of Akkub, the descendants of Hatita, the descendants of Shobai, 138.
४५द्वारपाल: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबाचे वंशज एकशे अडतीस.
46 The temple servants: The descendants of Ziha, the descendants of Hasupha, the descendants of Tabbaoth,
४६हे मंदिराचे विशेष सेवेकरी: सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज,
47 the descendants of Keros, the descendants of Sia, the descendants of Padon,
४७केरोस, सीया, पादोन
48 the descendants of Lebana, the descendants of Hagaba, the descendants of Shalmai,
४८लबाना, हगाबा, सल्माई
49 the descendants of Hanan, the descendants of Giddel, the descendants of Gahar.
४९हानान, गिद्देल, गहार.
50 The descendants of Reaiah, the descendants of Rezin, the descendants of Nekoda,
५०राया, रसीन, नकोदा
51 the descendants of Gazzam, the descendants of Uzza, the descendants of Paseah,
५१गज्जाम, उज्जा. पासेहा
52 the descendants of Besai, the descendants of Meunim, the descendants of Nephushesim.
५२बेसई, मऊनीम, नफूशेसीम.
53 The descendants of Bakbuk, the descendants of Hakupha, the descendants of Harhur,
५३बकबूक, हकूफ, हर्हूराचे
54 the descendants of Bazluth, the descendants of Mehida, the descendants of Harsha,
५४बसलीथ, महीद, हर्शा
55 the descendants of Barkos, the descendants of Sisera, the descendants of Temah,
५५बार्कोस, सीसरा, तामह
56 the descendants of Neziah, the descendants of Hatipha.
५६नसीहा आणि हतीफा
57 The descendants of Solomon's servants: the descendants of Sotai, the descendants of Sophereth, the descendants of Perida,
५७शलमोनच्या सेवकांचे वंशज: सोताई, सोफेरेथ, परीदा
58 the descendants of Jaala, the descendants of Darkon, the descendants of Giddel,
५८याला, दार्कोन, गिद्देल
59 the descendants of Shephatiah, the descendants of Hattil, the descendants of Pochereth Hazzebaim, the descendants of Amon.
५९शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम आणि आमोन.
60 All the temple servants, and the descendants of Solomon's servants, were 392.
६०मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनाच्या सेवकांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते.
61 These were the people who went up from Tel Melah, Tel Harsha, Kerub, Addon, and Immer. But they could not prove that they or their ancestors' families were descendants from Israel:
६१तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरूशलेमेला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलामधलीच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असेः
62 the descendants of Delaiah, the descendants of Tobiah, and the descendants of Nekoda, 642.
६२दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज सहाशे बेचाळीस.
63 Those who were from the priests: the descendants of Habaiah, Hakkoz, and Barzillai (who took his wife from the daughters of Barzillai of Gilead and was called by their name).
६३आणि याजकांपैकीः हबाया, हक्कोस, बर्जिल्ल्या (गिलादाच्या बर्जिल्याच्या कन्येशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई).
64 These sought their records among those enrolled by their genealogy, but they could not be found, so they were excluded from the priesthood as unclean.
६४काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकांच्या यादीतून काढून टाकले.
65 Then the governor said to them that they should not be allowed to eat the priests' share of food from the sacrifices until there rose up a priest with Urim and Thummim.
६५अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने याबाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते.
66 The whole assembly together was 42,360,
६६सर्व मंडळीतले मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ लोक होते.
67 besides their male servants and their female servants, of whom there were 7,337. They had 245 singing men and women.
६७यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस स्त्री-पुरुष सेवक व दोनशे पंचेचाळीस गायक व गायिका होत्या.
68 Their horses were 736 in number, their mules, 245,
६८त्यांच्याजवळ सातशे छत्तीस घोडे, दोनशे पंचेचाळीस खेचरे,
69 their camels, 435, and their donkeys, 6,720.
६९चारशे पस्तीस उंट आणि सहा हजार सातशे वीस गाढवे होती.
70 Some from among the heads of ancestors' families gave gifts for the work. The governor gave to the treasury one thousand darics of gold, 50 basins, and 530 priestly garments.
७०घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने एक हजार दारिक सोने, पन्नास वाट्या, याजकांसाठी पाचशे तीस वस्त्रे दिली.
71 Some of the heads of ancestors' families gave into the treasury for the work twenty thousand darics of gold and 2,200 minas of silver.
७१काही घराण्याच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला वीस हजार दारिक सोने आणि दोन हजार दोनशे माने रुपे देखील दिले.
72 The rest of the people gave twenty thousand darics of gold, and two thousand minas of silver, and sixty-seven priestly garments.
७२इतर सर्व लोकांनी मिळून वीस हजार दारिक सोने, दोन हजार माने रुपे आणि याजकांसाठी सदुसष्ट वस्त्रे दिली.
73 So the priests, the Levites, the gatekeepers, the singers, some of the people, the temple servants, and all Israel lived in their cities. By the seventh month the people of Israel were settled in their cities.”
७३अशाप्रकारे याजक, लेवीच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत: च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.