< Jeremiah 47 >
1 This is the word of Yahweh that came to Jeremiah the prophet concerning the Philistines. This word came to him before Pharaoh attacked Gaza.
१यिर्मया संदेष्ट्याला परमेश्वराकडून पलिष्ट्यांबाबत जे वचन आले ते हे आहे. फारोने गज्जावर हल्ला करण्यापूर्वी हे वचन त्याच्याकडे आले.
2 “Yahweh says this: See, floods of water are rising in the north. They will be like an overflowing river! Then they will overflow the land and everything in it, its cities and its inhabitants! So everyone will shout for help, and all the inhabitants of the land will lament.
२परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, उत्तरेला पुराचे पाणी चढत आहे. ते तुडूंब भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे होत आहे! मग देश व त्यातील सर्वकाही, नगरे आणि त्यातील रहिवासी यांना ते बुडवून टाकतील. म्हणून प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करतील, आणि त्या देशात राहणारे सर्व विलाप करतील.
3 At the sound of the stamping of their strong horses' hooves, at the roar of their chariots and the noise of their wheels, fathers will not help their children because of their own weakness.
३त्यांच्या बलवान घोड्यांच्या टापांच्या आवाजामुळे, त्यांच्या रथांचा गडगडाट व त्यांच्या चाकांचा खडखडाट, आपल्या स्वतःच्या अशक्तपणामुळे वडील आपल्या मुलांना ते मदत करु शकणार नाहीत.
4 For the day is coming that will devastate all of the Philistines, to cut off from Tyre and Sidon every survivor who wants to help them. For Yahweh is devastating the Philistines, those who remain from the island of Caphtor.
४कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे, सोर आणि सीदोन यांतून वाचलेला प्रत्येक जो कोणी त्यांचे सहाय्य करणारा त्याचा नाश होईल. कारण परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोराच्या द्विपातील वाचलेल्यांचाही नाश करणार आहे.
5 Baldness will come upon Gaza. As for Ashkelon, the people who are left in their valley will be made silent. How long will you cut yourself in mourning?
५गज्जाला टक्कल पडले आहे. त्यांच्या खोऱ्यातील उरलेले अष्कलोनाचे लोक शांत झाले आहेत. तुम्ही कोठवर शोकाने आपल्या स्वत: ला जखमा करून घेणार?
6 Woe, sword of Yahweh! How long will it be until you become silent? Go back to your scabbard! Stop and be silent.
६हे परमेश्वराच्या तलवारी, तू किती वेळपर्यंत शांत राहणार? तू परत आपल्या म्यानात जा. थांब आणि शांत रहा.
7 How can it rest when Yahweh has commanded it, when he has ordered it to attack Ashkelon and the coastlands along the sea?”
७तू शांत कशी राहू शकशील, कारण परमेश्वराने तुला आज्ञा दिली आहे. त्याने अष्कलोनाविरूद्ध व समुद्रकिनाऱ्याविरूद्ध हल्ला करण्यास तिला नेमले आहे.”