< Revelation 9 >

1 The fifth angel blew his trumpet. Then I saw [an evil angel. He was like] a star that had fallen from the sky to the earth. He was given {[Someone] gave him} the key to the shaft [that descended] ([to] the underworld/[to] the deep dark pit). (Abyssos g12)
मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची किल्ली दिली होती. (Abyssos g12)
2 When he opened that shaft, smoke arose from it like smoke from a huge burning furnace. The smoke prevented [anyone from seeing] the sky and the light of the sun. (Abyssos g12)
त्याने अगाधकूप उघडला, तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कूपातून निघून वर चढला; आणि कूपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली. (Abyssos g12)
3 Locusts came out of the smoke onto the earth. [They were given] {[God] gave them} power [to sting people], like scorpions [sting people].
त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती.
4 [God] told the locusts that they should not harm grass, nor any plants, nor any tree. [God said that they should harm only] those people who did not have a mark on the forehead [to show that they belonged to God].
यांना असे सांगितले होते की, पृथ्वीवरील गवत व कोणतीही हिरवळ व झाडे यांना हानी करू नका; परंतु ज्या मनुष्यांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र इजा करा.
5 [God] did not allow the locusts to kill those people. Instead, [he] allowed them to continue torturing people for five months. When they tortured people, the pain those people felt was like the pain a scorpion causes when it stings someone.
त्या लोकांस जिवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त पाच महिने यातना देण्यास सांगितले. विंचू मनुष्यास नांगी मारतो तेव्हा त्यास जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती.
6 During the time [when the locusts torture rebellious people, the pain will be so bad that] people will want to find a way to die, but they will not be able to [PRS].
त्या दिवसात माणसे मरण शोधतील, परंतु ते त्यांना मिळणार नाही, ते मरणासाठी अती उत्सुक होतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल.
7 The locusts looked like horses that are ready for battle. They had on their heads what looked like golden crowns. Their faces were like the faces of people.
टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यांसारखे होते; त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे होते.
8 They had [long] hair like the [long] hair of women. Their teeth were [strong], like lions’ teeth.
त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते.
9 They wore metal breastplates. [When they were flying], their wings made a noise like the roar when many horses [pull chariots as they are] rushing into battle.
त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता;
10 They had tails like scorpions have. With their tails they stung [people] for five months.
१०त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यांस पाच महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे.
11 The king who ruled over them was the angel of the underworld. His name in the Hebrew language is Abaddon. In the Greek language it is Apollyon. [Both of] those names [mean ‘Destroyer’]. (Abyssos g12)
११अगाधकूपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे; त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपल्लूओन आहे. (Abyssos g12)
12 That was the end of the first terrible event. [Be aware that] two tragic events are still to come.
१२पहिला अनर्थ होऊन गेला; पाहा, यापुढे आणखी दोन अनर्थ येणार आहेत.
13 The sixth angel blew his trumpet. Then I heard a voice from the four corners of the golden altar that is in God’s presence.
१३मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीच्या चार कोपऱ्यांच्या शिंगांमधून आलेली एक वाणी मी ऐकली.
14 It was saying to the sixth angel, the one who had the trumpet, “Release the four angels whom [I] have bound at the great river Euphrates!”
१४ज्या सहाव्या देवदूताजवळ कर्णा होता त्यास ती वाणी म्हणाली, मोठ्या फरात नदीजवळ बांधून ठेवलेले जे चार दूत त्यांना मोकळे सोड.
15 The four angels were released, those who had been {[He] released the four angels, whom [God] had} kept ready for that [exact] hour of that day, of that month, of that year. They were released {[He] released them} in order that they might enable [their soldiers to] kill a third of the [rebellious] people.
१५तेव्हा मनुष्यांपैकी तिसरा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे चार दूत तयार केलेले होते ते सोडण्यात आले.
16 The number of the soldiers riding on horses who did that was 200 million. I heard [someone say] how many there were.
१६घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली.
17 In the vision I saw what the horses and the [beings] that rode them looked like. They [wore] breastplates that were [red] like fire, [dusky blue] like smoke, and [yellow] like sulfur. The heads of the horses were like the heads of lions. From their mouths came fire, smoke, and [fumes of burning] sulfur.
१७त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे; त्यांना अग्नी व नीळ व गंधक यासारखी उरस्राणे होती आणि त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.
18 Those three things—the fire, the smoke, and the [burning] sulfur from [the horses’] mouths—killed a third of the [rebellious] people.
१८त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर, अग्नी व गंधक या तीन पीडांनी मनुष्यांचा तिसरा हिस्सा जिवे मारला गेला,
19 The horses had power with their mouths and with their tails. Their tails have heads like snakes by which they harm people.
१९कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे; त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांनी ते मनुष्यांना जखमा करून पीडा देतात.
20 The rest of the [rebellious] people, those who were not killed by these plagues of [fire and smoke and burning sulfur], did not turn from their sinful behavior. [They did not stop worshipping] the idols that they had made with their own hands. They did not stop worshipping demons and idols [that were made] of gold, of silver, of bronze, of stone, and of wood, [even though they are idols] that can neither see nor hear nor walk.
२०त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, भूतांची व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही
21 They did not stop murdering people, or practicing sorcery, or acting in sexually immoral ways, or stealing [things].
२१आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी जादूटोणा, व्यभिचार व चोऱ्या ह्यांबद्दलहि पश्चात्ताप केला नाही.

< Revelation 9 >