< Psalms 90 >
1 Lord, you have always (been [like] a home for us/protected us) [MET].
१मोशेचे स्तोत्र हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
2 Before you created the mountains, before you formed the earth and everything that is in it, you were eternally God, and you will be God forever.
२पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
3 [When people die], you cause their corpses to become soil again; you change their corpses to become dirt like [the first man] was created from.
३तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.”
4 When you (consider/think about) time, 1,000 years are [as short as] [SIM] one day which passes; [you consider that] [HYP] they are as short as a few hours in the night.
४कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
5 You cause people suddenly to die [MET]; they [live only a short time], like a dream lasts only a short time. They are like grass/weeds [SIM] that grow up.
५पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.
6 In the morning [DOU] the grass sprouts and grows well, but in the evening it dries up and (completely withers/dies).
६सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
7 [Similarly], [because of the sins that we have committed], you become angry with us; you terrify us and then you destroy us.
७खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
8 [It is as though] you place our sins in front of you, you spread out even our secret sins where you can see them.
८तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.
9 Because you are angry with us, you cause our lives to end; the years that we live pass as quickly as a sigh does.
९तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.
10 People live for only 70 years; but if they are strong, some of them live for 80 years. But even during good years we have much pain and troubles; our lives soon end, and we die [EUP].
१०आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु: ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
11 No one [RHQ] has fully experienced the powerful things you can do to them when you are angry with them, and people are not afraid that you will greatly punish them because of your being angry with them.
११तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?
12 So teach/help us to realize that we live for only a short time in order that we may [use our time] wisely.
१२म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
13 Yahweh, how long [will you be angry with us]? Pity us who serve you.
१३हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर.
14 Each morning show us that your faithfully loving us is enough for us in order that we may shout joyfully and be happy for the rest of our lives.
१४तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.
15 Cause us to now be as happy for as many years as you (afflicted us/caused us to be sad) and we experienced troubles.
१५जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.
16 Enable us to see the [great] things that you do and enable our descendants to [also] see your glorious power.
१६तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे.
17 Lord, our God, give us your blessings and enable us to be successful; yes, cause us to be successful in [everything] that we do [DOU]!
१७प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.