< Numbers 7 >
1 When Moses/I had finished setting up the Sacred Tent, he/I dedicated [MTY] it to Yahweh. He/I also dedicated the things that are inside the tent, and the altar [for burning sacrifices], and all the things that would be used at the altar.
१ज्या दिवशी मोशेने निवासमंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला. त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून पवित्र केली. त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले.
2 Then the leaders of the [twelve] Israeli tribes, the same men who had [helped Aaron and Moses/me to] count the men [who could fight in battles],
२त्यादिवशी, जे इस्राएलांचे अधिपती, त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे अर्पिली; हीच माणसे जमातीचे नेतृत्व करणारे होते. याच लोकांनी शिरगणतीचे काम पाहिले होते.
3 came to the tent, bringing gifts to Yahweh. They brought six sturdy/large carts and twelve oxen, one ox from each of the leaders and a cart from each of the two leaders.
३त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली. त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या व बारा बैल आणले. त्यांनी प्रत्येक दोन अधिपतीसाठी एक गाडी व प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला. त्यांनी या वस्तू निवासमंडपासमोर सादर केल्या.
4 Then Yahweh said to Moses/me,
४मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
5 “Accept these gifts, in order that the descendants of Levi can use them for carrying the sacred items that are here at the Sacred Tent.”
५“त्यांच्यापासून अर्पणे स्विकार आणि दर्शनमंडपाच्या कामासाठी अर्पणांचा उपयोग कर. प्रत्येक लेवीला ज्याच्या त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार अर्पण दे.”
6 So Moses/I took the carts and oxen and gave them to the descendants of Levi.
६मोशेने गाड्या व बैल घेतले आणि ते लेवींना दिले.
7 He/I gave two carts and four oxen to the descendants of Gershon for their work,
७त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाना दिले कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
8 and he/I gave four carts and eight oxen to the descendants of Merari for their work. Aaron’s son Ithamar was the supervisor of all their work.
८त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाना दिले, ते अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या देखरेखीखाली होते. त्याने हे अशासाठी केले की त्यांना त्याची गरज होती.
9 But he/I did not give any carts or oxen to the descendants of Kohath, because they took care of the sacred items that were to be carried on their shoulders, [not on carts].
९परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते.
10 On the day that the altar was dedicated [MTY], the [twelve] leaders brought other gifts to be dedicated and put them in front of the altar.
१०मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली.
11 Yahweh said to Moses/me, “Each of the next twelve days one leader should bring his gifts for the dedication of the altar.”
११परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतःच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.”
12 These are the gifts that each of the leaders brought: —a silver dish that weighed (more than three pounds/1.5 kg.), and a silver bowl that weighed (almost two pounds/800 grams), both of which were full of good flour and mixed with [olive] oil to be offerings of grain; they both were weighed using the standard scales; —a small gold dish that weighed (four ounces/14 grams), filled with incense; —a young bull, a [full-grown] ram, and a one-year-old ram, to be sacrifices to be completely burned on the altar; —a goat to be sacrificed to [enable me to forgive the people] the sins they have committed; —and two bulls, five full-grown rams, five male goats, and five rams that were one-year-old, to be sacrifices to maintain the people’s fellowship with Yahweh. This was the order in which the leaders brought their gifts: on the first day, Nahshon, son of Amminadab from the tribe of Judah brought his gifts; on the next/second day, Nethanel, son of Zuar, from the tribe of Issachar; on the next/third day, Eliab, son of Helon, from the tribe of Zebulun; on the next/fourth day, Elizur, son of Shedeur, from the tribe of Reuben; on the next/fifth day, Shelumiel, son of Jurishhaddai, from the tribe of Simeon; on the next/sixth day, Eliasaph, son of Deuel, from the tribe of Gad; on the next/seventh day, Elishama, son of Ammihud, from the tribe of Ephraim; on the next/eighth day, Gamaliel, son of Pedahzur, from the tribe of Manasseh; on the next/ninth day, Abidan, son of Gideoni, from the tribe of Benjamin; on the next/tenth day, Ahiezer, son of Ammishaddai, from the tribe of Dan; on the next/eleventh day, Pagiel, son of Acran, from the tribe of Asher; on the next/twelfth day, Ahira, son of Enam, from the tribe of Naphtali.
१२पहिल्या दिवशी, यहूदा वंशाचा अधिपती अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
१३त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी आणली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
१४त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे, एक सोन्याचे पात्र आणले.
१५त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
१६त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
१७त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यासाठी दिली. हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन याची भेट होती.
१८दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा, अधिपती सूवाराचा मुलगा नथनेल, ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
१९त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी अर्पिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
२०त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
२१त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरु ही होमार्पणासाठी दिली.
२२त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
२३त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सूवाराचा मुलगा नथनेल याची भेट होती.
२४तिसऱ्या दिवशी, जबुलून वंशाचा अधिपती हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
२५त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी दिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
२६त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
२७त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
२८त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
२९त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याचे अर्पण होते.
३०चौथ्या दिवशी, रऊबेन वंशाचा अधिपती शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
३१त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
३२त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
३३त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिले.
३४त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
३५त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते.
३६पांचव्या दिवशी, शिमोन वंशाचा अधिपती सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
३७त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होते. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
३८त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
३९त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
४०त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
४१त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल यांचे अर्पण होते.
४२सहाव्या दिवशी, गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
४३त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेल्या होत्या.
४४त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
४५त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
४६त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
४७त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे ही अर्पिण्यास दिली, हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते.
४८सातव्या दिवशी, एफ्राईम वंशाचा अधिपती अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
४९त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
५०त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
५१त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
५२त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
५३त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा यांचे अर्पण होते.
५४आठव्या दिवशी, मनश्शे वंशाचा अधिपती पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
५५त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
५६त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
५७त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
५८त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
५९त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल याचे अर्पण होते.
६०नवव्या दिवशी, बन्यामीन वंशाचा अधिपती गीदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
६१त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
६२त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
६३त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
६४त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
६५त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.
६६दहाव्या दिवशी, दान वंशाचा अधिपती अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
६७त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
६८त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
६९त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
७०त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
७१त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिले. हे अम्मीशाद्दै याचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते.
७२अकराव्या दिवशी, आशेर वंशाचा अधिकारी आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
७३त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
७४त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
७५त्याने होमार्पणासाठी एक गोऱ्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नर कोकरू दिले.
७६त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
७७त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे आक्रानाचा मुलगा पगीयेल याचे अर्पण होते.
७८बाराव्या दिवशी, नफताली वंशाचा अधिपती एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
७९त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा होता. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
८०त्याने धूपाने भरलेले, दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
८१त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
८२त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
८३त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे एनानाचा मुलगा अहीरा याचे अर्पण होते.
84 When the altar was dedicated to Yahweh, those [twelve] leaders brought these gifts: —twelve silver plates and twelve silver bowls, weighing a total of about (60 pounds/27.6 kg.), each of them being weighed on the scales kept in the Sacred Tent; —twelve gold dishes filled with incense, weighing a total of about (three pounds/1.4 kg.), each being weighed on those same scales; —twelve bulls, twelve [full-grown] rams, and twelve one-year-old rams, to be sacrifices that were completely burned, along with the grain offerings; —twelve goats to be sacrificed [to forgive the people] for the sins [they have committed]; —and 24 bulls, 60 full-grown rams, 60 goats, and 60 rams that were one-year-old, to be sacrifices to maintain the people’s fellowship with Yahweh.
८४मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी इस्राएलांच्या अधिपतींनी या सर्व वस्तू समर्पित केल्या. त्यांनी चांदीची बारा ताटे, चांदीच्या बारा वाट्या आणि सोन्याची बारा पात्रे समर्पित केली.
८५प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या वाट्यांचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीच्या वाट्या मिळून त्यांचे एकूण वजन दोन हजार चारशे शेकेल होते.
८६धूपाने भरलेले सोन्याची बारा पात्रे, प्रत्येकी पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे दहा शेकेल वजन होते.
८७त्यांनी होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक वर्षाची बारा नर कोंकरे समर्पित केली. त्यांनी आपले अन्नार्पण दिले. त्यांनी पापार्पणासाठी बारा बकरे दिले.
८८शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी त्यांनी आपल्या सर्व गुराढोरातून चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे व एक वर्षाची साठ नर कोंकरे दिली. जेव्हा अभिषेक झाला होता, तेव्हा त्यांनी ही वेदीला अर्पणे केली.
89 Whenever Moses/I entered the Sacred Tent to talk with Yahweh, he/I heard Yahweh’s voice speaking between the two [images of] creatures with wings that were above the lid of the sacred chest.
८९जेव्हा मोशे परमेश्वराबरोबर बोलण्यासाठी दर्शनमंडपामध्ये गेला, त्यावेळी त्याने देवाची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. देव साक्षीकोशावर जे दयासन होते त्यावरून म्हणजे दोन करुबांच्या मधून आपणाशी बोलणारी वाणी ऐकली. परमेश्वर त्याच्याशी बोलला.