< John 2 >
1 AND on the third day there was a feast in Kotna, a city of Galila; and the mother of Jeshu was there:
१नंतर तिसर्या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती.
2 and Jeshu and his disciples were called to the feast.
२येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते.
3 And the wine failed, and his mother saith to him, to Jeshu, They have no wine.
३मग द्राक्षरस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही.”
4 Jeshu saith to her, What (is it) to me and to thee, woman? Not yet hath come mine hour.
४येशू तिला म्हणाला, “मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.”
5 His mother saith to the servitors, Whatever he telleth you, do.
५त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.”
6 Now there were six waterpots of stone set there, unto the purification of the Jihudoyee, which contained each two quarantals or three.
६तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते.
7 Jeshu saith to them, Fill these water-pots with waters; and they filled them to the top.
७येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले.
8 He saith to them, Draw now, and carry to the chief of the guests. And they carried.
८मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले.
9 And when that chief of the guests had tasted those waters which were made wine, and knew not whence it was, (but the servitors knew, who had filled them with waters, ) the chief of the guests called the bridegroom,
९द्राक्षरस बनलेले पाणी? भोजनकारभार्याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून,
10 and said to him, Every man at first the good wine produceth, and when they are satisfied, then that which is inferior; but thou hast kept the good wine until now.
१०त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस.”
11 This is the first sign that Jeshu wrought in Kotna of Galila, and manifested his glory; and his disciples believed in him.
११येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
12 AFTER this he went to Kapher-nachum, he and his mother and his brethren and his disciples. And they were there a few days.
१२त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत.
13 And the petscha of the Jihudoyee was nigh, and Jeshu went up to Urishlem.
१३मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरूशलेम शहरास वर गेला.
14 And he found in the temple those who sold oxen and sheep and doves, and the money-changers sitting.
१४आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले.
15 And he made him a scourge of cord, and drove them all from the temple, and the sheep and the oxen and the money-changers; and he shed their money, and their tables he overturned.
१५तेव्हा त्याने दोर्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सराफांचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालथे केले.
16 And to those who sold doves he said, Take these hence; make not the house of my Father a house of merchandise.
१६व त्याने कबुतरे विकणार्यांना म्हटले, “ह्यांना येथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
17 And his disciples remembered that it was written, The zeal of thy house hath devoured me.
१७तेव्हा ‘तुझ्या भवनाविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.
18 The Jihudoyee answered and said to him, What sign showest thou to us, as these things thou doest?
१८त्यावरून यहूदी त्यास म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हास तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?”
19 Jeshu answered, Destroy this temple, and in three days I will raise it.
१९येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही हे परमेश्वराचे भवन मोडून टाका आणि मी तीन ते दिवसात उभारीन.”
20 The Jihudoyee say to him, Forty-and six years was this temple being built, and wilt thou in three days raise it?
२०यावरुन यहूदी अधिकारी म्हणाले, “परमेश्वराचे हे भवन बांधण्यास शेहचाळीस वर्षे लागली आणि आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?”
21 But he spake of the temple of his body.
२१तो तर आपल्या शरीररूपी भवनाविषयी बोलला होता.
22 But when he was risen from the house of the dead, his disciples remembered that this he had said; and they believed the scriptures, and the word which Jeshu had spoken.
२२म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.
23 WHILE Jeshu was in Jerusalem at the petscha, at the feast, Many believed in him who saw the signs which he wrought.
२३आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरूशलेम शहरात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
24 But he, Jeshu, did not confide himself to them, because he knew every man,
२४असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्यास स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता.
25 and needed not that any should testify to him concerning any man, because he knew what is in man.
२५शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्यास गरज नव्हती; कारण मनुष्यात काय आहे हे तो ओळखीत होता.