< Acts 6 >
1 AND in those days the disciples being many, the Javnoyee disciples murmured against the Ebroyee because their widows were slighted in the daily ministration.
१त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता, ग्रीक बोलणारे यहूदी लोक आणि इब्री बोलणारे यहूदी लोक यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्याच्या विधवांची उपेक्षा होत असे.
2 And the twelve apostles called all the assembly of the disciples and said to them, It is not fit that we should leave the word of Aloha, and serve tables.
२तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून भोजनाची सेवा करावी हे ठीक नाही.
3 Look out therefore, brethren, and choose seven men from you who have testimony concerning them, and are full of the Spirit of the Lord and wisdom, and we will appoint them over this matter.
३तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात, प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा, त्यांना आम्ही या कामावर नेमू.
4 And we will be constant in prayer, and in the ministration of the word.
४म्हणजे, आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
5 And this saying was pleasing before all the people; and they chose Estephanos, a man who was full of faith and the Spirit of Holiness; and Philipos, and Prokoros, and Nicanor, and Timon, and Parmena, and Nikolos, a proselyte of Antiokia.
५ही गोष्ट सर्व लोकांस पसंत पडली. आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकलाव तीमोन, पार्मिना व यहूदी मतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.
6 And these they set before the apostles: and while praying they laid upon them the hand.
६त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले, आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.
7 And the word of Aloha increased, and the number of the disciples increased in Urishlem greatly: and much people of the Jihudoyee were obedient to the faith.
७मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला यरूशलेम शहरात शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासास मान्यता दिली.
8 But Estephanos was filled with grace and power, and wrought signs and miracles among the people.
८स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन, लोकात मोठी अद्भूते व चिन्हे करत असे.
9 And men arose from the congregation which was called Libertinu, Kyrainoyee, and Aleksandroyee, and from Cilicia, and from Asia, and disputed with Estephanos,
९तेव्हा सिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर व आलेक्सांद्रिये नगरातील काही लोक, आणि किलिकिया व आशिया. प्रांतातील काही लोक उठले आणि स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.
10 and were not able to stand against the wisdom and the spirit which spake in him.
१०पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.
11 Then they sent men and instructed them to say, We have heard him speak words of blasphemy against Musha and against Aloha.
११तेव्हा त्यांनी काही लोकांची गुप्तपणे मने वळवली, “आम्ही स्तेफनाला मोशेविरूद्ध व देवाविरूद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पढविले.”
12 And they stirred up the people and the elders and the sophree, and came and rose upon him, and carried him away and brought him into the midst of the assembly.
१२आणि लोकांस, वडिलांस व नियमशास्त्राच्या शिक्षकांस चिथवले, त्यांनी स्तेफनावर चाल करून त्यास धरून न्यायसभेपुढे नेले.
13 AND witnesses of falsehood arose, and said, This man ceases not from speaking words contrary to the law and against this holy place.
१३आणि त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले, ते म्हणाले, “हा मनुष्य या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरूद्ध दुर्भाषण करण्याचे सोडत नाही.
14 For we have heard him say that this Jeshu Natsroya shall destroy this place, and shall change the customs which Musha delivered unto us.
१४कारण आम्ही त्यास असे बोलताना ऐकले, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आम्हास लावून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.”
15 And all they who sat in the assembly looked upon him, and saw his face as the face of an angel.
१५तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.