< Song of Solomon 7 >
1 what? be beautiful beat your in/on/with sandal daughter noble curve thigh your like ornament deed: work hand artisan
१(त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो) हे राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात. कुशल कारागिराच्या हातच्या दागिन्यासारखा तुझ्या माड्यांचा बांक आहे.
2 navel your vessel [the] roundness not to lack [the] mixture belly: abdomen your heap wheat to fence in/on/with lily
२तुझी बेंबी गोल कपासारखी आहे, त्यामध्ये मिश्र द्राक्षरसातील उणीव कधीही नसावी. तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
3 two breast your like/as two fawn twin gazelle
३तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत.
4 neck your like/as tower [the] tooth: ivory eye your pool in/on/with Heshbon upon gate Bath-rabbim Bath-rabbim face: nose your like/as tower [the] Lebanon to watch face: before Damascus
४तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ-रब्बीमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दिमिष्काकडे बघणाऱ्या लबानोनाच्या मनोऱ्यासारखे आहे.
5 head your upon you like/as Carmel and hair head your like/as purple king to bind in/on/with lock
५तुझे मस्तक कर्मेलासारखे आहे; आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
6 what? be beautiful and what? be pleasant love in/on/with luxury
६अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस व किती गोड आहेस.
7 this height your to resemble to/for palm and breast your to/for cluster
७तुझी उंची खजुरीच्या झाडासारखी आणि तुझे वक्ष त्याच्या फळांच्या घोसासारखे आहेत.
8 to say to ascend: rise in/on/with palm to grasp in/on/with fruit-stalk his and to be please breast your like/as cluster [the] vine (and aroma *L(b)*) face: nose your like/as apple
८मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेन, त्याच्या फांद्यांना धरीन. तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.
9 and palate your like/as wine [the] pleasant to go: went to/for beloved my to/for uprightness to glide lips sleeping
९तुझे चुंबन सर्वात उंची द्राक्षरसाप्रमाणे आहे. तो घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या ओठांवरून सहज गळतो.
10 I to/for beloved my and upon me desire his
१०(ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे.
11 to go: come! [emph?] beloved my to come out: come [the] land: country to lodge in/on/with village
११माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ. आपण खेड्यात रात्र घालवू.
12 to rise to/for vineyard to see: see if to sprout [the] vine to open [the] blossom to bud [the] pomegranate there to give: give [obj] beloved: love my to/for you
१२आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.
13 [the] mandrake to give: give aroma and upon entrance our all excellence new also old beloved my to treasure to/for you
१३पुत्रदात्रीचा सुवास सुटला आहे, आणि आपल्या दाराजवळ नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आली आहेत. माझ्या प्राणप्रिया ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.