< Psalms 124 >
1 song [the] step to/for David unless LORD which/that to be to/for us to say please Israel
१दाविदाचे स्तोत्र आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता,
2 unless LORD which/that to be to/for us in/on/with to arise: attack upon us man
२जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,
3 in that case alive to swallow up us in/on/with to be incensed face: anger their in/on/with us
३जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते.
4 in that case [the] water to overflow us torrent: river [to] to pass upon soul: myself our
४जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
5 in that case to pass upon soul: myself our [the] water [the] raging
५मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
6 to bless LORD which/that not to give: give us prey to/for tooth their
६परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
7 soul: myself our like/as bird to escape from snare to snare [the] snare to break and we to escape
७पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
8 helper our in/on/with name LORD to make heaven and land: country/planet
८पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.