< Proverbs 14 >

1 wise woman to build house: home her and folly in/on/with hand her to overthrow him
सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते.
2 to go: walk in/on/with uprightness his afraid LORD and be devious way: conduct his to despise him
जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो.
3 in/on/with lip fool(ish) branch pride and lips wise to keep: guard them
मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.
4 in/on/with nothing cattle crib pure and abundance produce in/on/with strength cattle
गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते.
5 witness faithful not to lie and to breathe lie witness deception
विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो.
6 to seek to mock wisdom and nothing and knowledge to/for to understand to lighten
निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे.
7 to go: went from before to/for man fool and not to know lip: words knowledge
मूर्ख मनुष्यापासून दूर जा, कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही.
8 wisdom prudent to understand way: conduct his and folly fool deceit
शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे.
9 fool(ish) to mock guilt (offering) and between upright acceptance
मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते.
10 heart to know bitterness soul: myself his and in/on/with joy his not to pledge be a stranger
१०हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही.
11 house: household wicked to destroy and tent upright to sprout
११दुष्टाच्या घराचा नाश होईल, पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल.
12 there way: conduct upright to/for face of man and end her way: conduct death
१२मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो.
13 also in/on/with laughter to pain heart and end her joy grief
१३हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, आणि आनंदाचा शेवट शोकात होतो.
14 from way: conduct his to satisfy to turn heart and from upon him man pleasant
१४जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल.
15 simple be faithful to/for all word: thing and prudent to understand to/for step his
१५भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो.
16 wise afraid and to turn aside: depart from bad: evil and fool be arrogant and to trust
१६शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो, पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही.
17 short face: anger to make: do folly and man plot to hate
१७शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो.
18 to inherit simple folly and prudent to surround knowledge
१८भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते, पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात.
19 to bow bad: evil to/for face: before pleasant and wicked upon gate righteous
१९दुर्जन सज्जनापुढे नमतात, आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील.
20 also to/for neighbor his to hate be poor and to love: friend rich many
२०गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, पण श्रीमंताला खूप मित्र असतात.
21 to despise to/for neighbor his to sin and be gracious (poor *Q(K)*) blessed he
२१जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे.
22 not to go astray to plow/plot bad: evil and kindness and truth: faithful to plow/plot good
२२जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो.
23 in/on/with all toil to be advantage and word: because lip: words surely to/for need
२३सर्व कष्टात फायदा आहे, पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल.
24 crown wise riches their folly fool folly
२४शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते.
25 to rescue soul: life witness truth: true and to breathe lie deceit
२५खरा साक्षी जीव वाचवतो, पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे.
26 in/on/with fear LORD confidence strength and to/for son: child his to be refuge
२६परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत.
27 fear LORD fountain life to/for to turn aside: depart from snare death
२७परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे.
28 in/on/with abundance people adornment king and in/on/with end people terror prince
२८प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे.
29 slow face: anger many understanding and short spirit: temper to exalt folly
२९सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.
30 life flesh heart healing and rottenness bone jealousy
३०शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
31 to oppress poor to taunt to make him and to honor: honour him be gracious needy
३१जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
32 in/on/with distress: evil his to thrust wicked and to seek refuge in/on/with death his righteous
३२दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो.
33 in/on/with heart to understand to rest wisdom and in/on/with entrails: among fool to know
३३बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते.
34 righteousness to exalt nation and shame people sin
३४योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, पण पाप लोकांस कलंक आहे.
35 acceptance king to/for servant/slave be prudent and fury his to be be ashamed
३५शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे.

< Proverbs 14 >