< Lamentations 1 >
1 how? to dwell isolation [the] city many people to be like/as widow (many *L(abh)*) in/on/with nation princess in/on/with province to be to/for taskworker
१यरूशलेम नगरी जी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे. जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे. राष्ट्रांमध्ये जी राजकुमारी होती, पण आता तिला दासी केले गेले आहे.
2 to weep to weep in/on/with night and tears her upon jaw her nothing to/for her to be sorry: comfort from all to love: lover her all neighbor her to act treacherously in/on/with her to be to/for her to/for enemy
२ती रात्री फार रडते व तिचे अश्रू तिच्या गालांवर असतात. तिच्या सर्व प्रियकरांमध्ये तिला दिलासा देणारा कोणी नव्हता. तिच्या सर्व मित्रांनी तिच्याशी विश्वासघात केला. ते तिचे शत्रू झाले आहेत.
3 to reveal: remove Judah from affliction and from abundance service he/she/it to dwell in/on/with nation not to find resting all to pursue her to overtake her between: among [the] terror
३दारिद्र्य आणि जुलमामुळे यहूदा दास्यपनात बंदिवान झाली आहे. ती राष्ट्रंमध्ये राहत आहे, पण तिला आराम मिळत नाही. तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला तिच्या अत्यंत निराशेच्या मनस्थितीत तिला संकटावस्थेत गाठले आहे.
4 way: road Zion mourning from without to come (in): come meeting: festival all gate her be desolate: destroyed priest her to sigh virgin her to suffer and he/she/it to provoke to/for her
४सियोनेचे मार्ग शोक करतात, कारण नेमलेल्या पवित्र सणाला कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी ओसाड झाल्या आहेत व तिचे याजक कण्हत आहेत. तिच्या कुमारी दु: खात आहेत, व ती स्वत: निराशेत आहेत.
5 to be enemy her to/for head: leader enemy her to prosper for LORD to suffer her upon abundance transgression her infant her to go: went captivity to/for face: before enemy
५तिचे शत्रू तिचे धनी झाले आहेत; तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे. परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दु: ख दिले आहे. तिची मुले वैऱ्यांच्यापुढे पाडावपणांत गेली आहेत.
6 and to come out: come (from from daughter *Q(K)*) Zion all glory her to be ruler her like/as deer not to find pasture and to go: went in/on/with not strength to/for face: before to pursue
६सियोनकन्येचे सौंदर्य सरले आहे. तिचे राजपुत्र चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरीणासारखे ते झाले आहेत, आणि पाठलाग करणाऱ्यांसमोर ते हतबल झाले आहेत.
7 to remember Jerusalem day affliction her and wandering her all desirable her which to be from day front: old in/on/with to fall: fall people her in/on/with hand: power enemy and nothing to help to/for her to see: see her enemy to laugh upon annihilation her
७यरूशलेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात, पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टीं आठवते. तिच्या लोकांस वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणीही नव्हते. तिच्या शत्रूंनी तिला पाहिले व तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले.
8 sin to sin Jerusalem upon so to/for filth to be all to honor: honour her to lavish/despise her for to see: see nakedness her also he/she/it to sigh and to return: repent back
८यरूशलेमेने फार पाप केले आहेत; म्हणून ती अशुद्ध झाली आहे. सर्व जे तिचा आदर करत असत, त्यांनी तिला आता तुच्छ मानले आहे. कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती कण्हत आहे व ती तोंड फिरविते आहे.
9 uncleanness her in/on/with hem her not to remember end her and to go down wonder nothing to be sorry: comfort to/for her to see: see LORD [obj] affliction my for to magnify enemy
९तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्राला लागला आहे, तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही. ती खूपच अधोगतीस गेली आहे. तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझे दु: ख पाहा! कारण शत्रू त्याच्या मोठेपणाचा तोरा मिरवितो आहे ते पाहा.”
10 hand his to spread enemy upon all desire her for to see: see nation to come (in): come sanctuary her which to command not to come (in): come in/on/with assembly to/for you
१०तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूंनी आपला हात ठेवला आहे. परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभास्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरीही, तिने त्यांना तिच्या पवित्रस्थानात जाताना पाहिले आहे.
11 all people her to sigh to seek food: bread to give: give (desire their *Q(K)*) in/on/with food to/for to return: rescue soul: life to see: see LORD and to look [emph?] for to be be vile
११यरूशलेमेमधील सर्व लोक कण्हत आहेत, ते अन्न शोधत आहेत. त्यांनी आपला जीव वाचावा म्हणून अन्नासाठी त्यांच्या जवळच्या मनोरम वस्तू दिल्या आहेत. “परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी कशी कवडीमोलाची झाली आहे.”
12 not to(wards) you all to pass way: journey to look and to see: see if there pain like/as pain my which to abuse to/for me which to suffer LORD in/on/with day burning anger face: anger his
१२“जे तुम्ही जवळून जाता, तुम्हास काहीच वाटत नाही काय? पण जरा माझ्याकडे निरखून पाहा. परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु: ख दिले, या माझ्या दु: खा सारखे दुसरे कोणतेही दु: ख आहे काय, हे लक्ष देऊन पाहा.
13 from height to send: depart fire in/on/with bone my and to rule her to spread net to/for foot my to return: return me back to give: make me devastated all [the] day sick
१३त्याने वरून माझ्या हाडात अग्नी पाठवला आहे, आणि तो त्याजवर प्रबल होतो. त्याने माझ्या पायांसाठी जाळे पसरवीले आहे आणि मला मागे वळवले आहे. त्याने मला सतत ओसाड व दुर्बल केले आहे.
14 to bind yoke transgression my in/on/with hand his to intertwine to ascend: establish upon neck my to stumble strength my to give: give me Lord in/on/with hand: power not be able to arise: establish
१४माझ्या पुष्कळ अपराधांचे जू त्याने आपल्या हाताने जखडले आहे. ते एकत्र गुंफले आहेत, आणि ते माझ्या मानेवर आले आहेत; त्यांनी माझी शक्ती निकामी केली आहे. ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही, अशांच्या हाती परमेश्वराने मला दिले आहे.
15 to reject all mighty: strong my Lord in/on/with entrails: among my to call: call to upon me meeting to/for to break youth my wine press to tread Lord to/for virgin daughter Judah
१५माझ्या शूर सैनिकांना जे माझे रक्षण करतात, त्यांना परमेश्वराने दूर फेकले आहे. त्याने माझ्या तरुण सैनिकांना चिरडण्यासाठी भारी सभा बोलावली आहे. जसे द्राक्षकुंडात द्राक्षे तुडविली जातात तसे प्रभूने यहूदाच्या कुमारी कन्येला तुडवले आहे.
16 upon these I to weep eye my eye my to go down water for to remove from me to be sorry: comfort to return: rescue soul my to be son: child my be desolate: destroyed for to prevail enemy
१६या सगळयाबद्दल मी आक्रोश करते; माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत. कारण माझे सांत्वन करणारा माझ्यापासून दूर आहे. माझी मुले खिन्न झाली आहेत, कारण शत्रूचा विजय झाला आहे.”
17 to spread Zion in/on/with hand her nothing to be sorry: comfort to/for her to command LORD to/for Jacob around: neighours him enemy his to be Jerusalem to/for impurity between them
१७सियोनने तिचे हात पसरवले, पण तिचे सांत्वन करायला कोणी नाही. परमेश्वराने याकोबाच्या शत्रूंना हुकूम केला आहे. परमेश्वराने याकोबासंबधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैऱ्यांनी त्यास घेरले. यरूशलेम त्यांच्याकरिता एका फाटलेल्या मासिकपाळीच्या अशुद्ध कपड्याप्रमाणे आहे
18 righteous he/she/it LORD for lip: word his to rebel to hear: hear please all ([the] people *Q(K)*) and to see: see pain my virgin my and youth my to go: went in/on/with captivity
१८“परमेश्वर न्यायीच आहे, कारण मी त्याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले आहे. सर्व लोकांनो, ऐका! आणि माझे दु: ख पाहा! माझ्या कुमारी व माझे तरुण पाडावपणांत गेले आहेत.
19 to call: call to to/for to love: lover me they(masc.) to deceive me priest my and old: elder my in/on/with city to die for to seek food to/for them and to return: rescue [obj] soul: life their
१९मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या, पण त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला. माझे याजक आणि वडील आपला जीव वाचावा म्हणून, स्वत: साठी अन्न शोधीत असता नगरात प्राण सोडले.
20 to see: see LORD for distress to/for me belly my to aggitate to overturn heart my in/on/with entrails: among my for to rebel to rebel from outside be bereaved sword in/on/with house: home like/as death
२०हे परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! कारण मी दु: खी झाले आहे. माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे. माझे मन माझ्यामध्ये उलटले आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. बाहेर तलवार निर्वंश करते, तर घरांत मृत्यू आहे.
21 to hear: hear for to sigh I nothing to be sorry: comfort to/for me all enemy my to hear: hear distress: harm my to rejoice for you(m. s.) to make: do to come (in): bring day to call: call out and to be like me
२१मी कण्हत आहे हे त्यांनी ऐकले आहे. माझे सांत्वन करायला कोणी नाही. माझ्या सर्व शत्रूंनी माझे अनिष्ट ऐकले आहे. तू असे केल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. जो दिवस तू नेमला आहे तो तू आणशील तेव्हा ते माझ्यासारखे होतील.
22 to come (in): come all distress: evil their to/for face: before your and to abuse to/for them like/as as which to abuse to/for me upon all transgression my for many sighing my and heart my faint
२२त्यांची सर्व दुष्टाई तुझ्यासमोर येवो, माझ्या पापांमुळे तू माझ्याशी जसा वागलास तसाच तू त्यांच्याशी वाग. कारण माझे कण्हणे पुष्कळ आहे आणि माझे हृदय दुर्बल झाले आहे.”