< Jeremiah 52 >
1 son: aged twenty and one year Zedekiah in/on/with to reign he and one ten year to reign in/on/with Jerusalem and name mother his (Hamutal *Q(K)*) daughter Jeremiah from Libnah
१सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षाचा होता; अकरा वर्षे त्याने यरूशलेमेवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्नाकर यिर्मयाची मुलगी होती.
2 and to make: do [the] bad: evil in/on/with eye: seeing LORD like/as all which to make: do Jehoiakim
२यहोयाकीम याने जी प्रत्येकगोष्ट केली होती त्याप्रमाणे यानेही, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते केले.
3 for upon face: anger LORD to be in/on/with Jerusalem and Judah till to throw he [obj] them from upon face his and to rebel Zedekiah in/on/with king Babylon
३आपल्या दृष्टीसमोरून त्यांना काढून टाकेपर्यंत, परमेश्वराच्या कोपाद्वारे यरूशलेम व यहूदामध्ये सर्व या घटना घडल्या. मग सिद्कीयाने बाबेलाच्या राजाच्या विरोधात बंड केले.
4 and to be in/on/with year [the] ninth to/for to reign him in/on/with month [the] tenth in/on/with ten to/for month to come (in): come Nebuchadnezzar king Babylon he/she/it and all strength: soldiers his upon Jerusalem and to camp upon her and to build upon her siegework around
४मग असे झाले की, त्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात दहाव्या दिवशी बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने आपल्या सर्व सैन्याबरोबर यरूशलेमेविरूद्ध चाल करून आला. त्याने त्याच्यापुढे तळ ठोकला आणि त्यांच्याभोवती वेढ्याची भिंत बांधली
5 and to come (in): besiege [the] city in/on/with siege till eleven ten year to/for king Zedekiah
५म्हणून सिद्कीया राजाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्या नगराला वेढा पडला होता.
6 in/on/with month [the] fourth in/on/with nine to/for month and to strengthen: strengthen [the] famine in/on/with city and not to be food to/for people [the] land: country/planet
६चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, नगरात भयंकर दुष्काळ पडला, तो इतका की, देशातल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता.
7 and to break up/open [the] city and all human [the] battle to flee and to come out: come from [the] city night way: direction gate between [the] wall which upon garden [the] king and Chaldea upon [the] city around and to go: went way: direction [the] Arabah
७मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खास्दी लोक नगराच्यासभोवती होते, म्हणून ते अराब्याच्या वाटेने निघून गेले.
8 and to pursue strength: soldiers Chaldea after [the] king and to overtake [obj] Zedekiah in/on/with plain Jericho and all strength: soldiers his to scatter from upon him
८पण खास्द्यांच्या सैन्याने राजाच्या पाठीस लागून यरीहोच्या मैदानात सिद्कीयाला गाठले. त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले.
9 and to capture [obj] [the] king and to ascend: rise [obj] him to(wards) king Babylon Riblah [to] in/on/with land: country/planet Hamath and to speak: promise with him justice: judgement
९त्यांनी राजाला पकडले व त्यास हमाथ देशातील रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे वर नेले. तेथे त्याने त्यास शिक्षा ठरवली.
10 and to slaughter king Babylon [obj] son: child Zedekiah to/for eye his and also [obj] all ruler Judah to slaughter in/on/with Riblah [to]
१०बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे मारले आणि यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांचीही त्याने रिब्ला येथे हत्या केली.
11 and [obj] eye Zedekiah to blind and to bind him in/on/with bronze and to come (in): bring him king Babylon Babylon [to] and to give: put him (house: home *Q(K)*) [the] punishment till day death his
११मग बाबेलाच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले, त्यास पितळी बेड्या घालून बाबेलास नेले. त्याने त्यास त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तुरुंगातच ठेवले.
12 and in/on/with month [the] fifth in/on/with ten to/for month he/she/it year nine ten year to/for king Nebuchadnezzar king Babylon to come (in): come Nebuzaradan chief guard to stand: appoint to/for face: before king Babylon in/on/with Jerusalem
१२आता बाबेलाच्या राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, नबूजरदान यरूशलेमेस आला. तो बाबेलामधील राजाचा सेवक व राजाच्या अंगरक्षकांचा नायक होता.
13 and to burn [obj] house: temple LORD and [obj] house: home [the] king and [obj] all house: home Jerusalem and [obj] all house: home [the] great: large to burn in/on/with fire
१३त्याने परमेश्वराचे घर जाळले, राजवाडा व यरूशलेमेमधील सर्व घरेही जाळली. नगरातील प्रत्येक महत्वाची इमारतसुद्धा त्याने जाळून टाकली.
14 and [obj] all wall Jerusalem around to tear all strength: soldiers Chaldea which with chief guard
१४राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाबरोबर असलेल्या सर्व खास्दी सैन्याने यरूशलेमेभोवती असलेली तटबंदी मोडून तोडून टाकली.
15 and from poor [the] people and [obj] remainder [the] people [the] to remain in/on/with city and [obj] [the] to fall: deserting which to fall: deserting to(wards) king Babylon and [obj] remainder [the] artisan to reveal: remove Nebuzaradan chief guard
१५सेनापती नबूजरदानाने यरूशलेम नगरामध्ये अजूनही राहत असलेल्या सर्व लोकांस कैदी म्हणून नेले. बाबेलाच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरूशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले.
16 and from poor [the] land: country/planet to remain Nebuzaradan chief guard to/for to tend vineyards and to/for to till
१६पण राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने देशातील काही अगदी गरीब त्यांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.
17 and [obj] pillar [the] bronze which to/for house: temple LORD and [obj] [the] base and [obj] sea [the] bronze which in/on/with house: temple LORD to break Chaldea and to lift: bear [obj] all bronze their Babylon [to]
१७परमेश्वराच्या घरातील असलेले पितळी खांब, परमेश्वराच्या घरातील पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्द्यांनी तोडून तुकडे तुकडे केले आणि सर्व पितळ परत बाबेलाला घेऊन गेले.
18 and [obj] [the] pot and [obj] [the] shovel and [obj] [the] snuffer and [obj] [the] bowl and [obj] [the] palm: dish and [obj] all article/utensil [the] bronze which to minister in/on/with them to take: take
१८पात्रे, फावडी, दिव्याची कात्री, वाट्या, आणि मंदिरातील सेवा ज्या पितळी उपकरणाने याजक करीत ती सर्व खास्द्यांनी नेली.
19 and [obj] [the] basin and [obj] [the] censer and [obj] [the] bowl and [obj] [the] pot and [obj] [the] lampstand and [obj] [the] palm: dish and [obj] [the] bowl which gold gold and which silver: money silver: money to take: take chief guard
१९पेले व धूपपात्रे, वाट्या, बहुगुणी, दीपस्तंभ, चमचे, कटोरे जी सोन्याची आणि रुप्याचे बनवली होती ती राजाचा अंगरक्षकांचा नायक तीदेखील घेऊन गेला.
20 [the] pillar two [the] sea one and [the] cattle two ten bronze which underneath: under [the] base which to make [the] king Solomon to/for house: temple LORD not to be weight to/for bronze their all [the] article/utensil [the] these
२०दोन खांब, गंगाळसागर, व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल शलमोन राजाने परमेश्वराच्या घरासाठी बनविले होते, या वस्तूतील अधिक पितळ वजनात मावणे शक्य नव्हते.
21 and [the] pillar eight ten cubit (height *Q(K)*) [the] pillar [the] one and thread two ten cubit to turn: surround him and thickness his four finger be hollow
२१प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती.
22 and capital upon him bronze and height [the] capital [the] one five cubit and latticework and pomegranate upon [the] capital around [the] all bronze and like/as these to/for pillar [the] second and pomegranate
२२त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती.
23 and to be [the] pomegranate ninety and six spirit: side [to] all [the] pomegranate hundred upon [the] latticework around
२३असे तेथे कळसाच्या चाऱ्ही बाजूंना शहाण्णव डाळिंबे होती आणि जाळीकामावर सभोवती सर्व डाळिंबे शंभर होती.
24 and to take: take chief guard [obj] Seraiah priest [the] head: leader and [obj] Zephaniah priest [the] second and [obj] three to keep: guard [the] threshold
२४अंगरक्षकांच्या नायकाने बंदिवान प्रमुख याजक सराया व दुसरा याजक सफन्या यांच्याबरोबर आणि तीन द्वारपालांनाही एकत्रित नेले.
25 and from [the] city to take: take eunuch one which to be overseer upon human [the] battle and seven human from to see: approach face [the] king which to find in/on/with city and [obj] secretary ruler [the] army [the] to serve [obj] people [the] land: country/planet and sixty man from people [the] land: country/planet [the] to find in/on/with midst [the] city
२५सैनिकांवर जो अधिकारी नेमला होता त्यास आणि जे सात माणसे राजाला सल्ला देत, ते अजूनपर्यंत नगरातच होते. त्याप्रमाणेच मनुष्यांची सैन्यात भरती करणारा जबाबदार सेनापतीचा चिटणीस, त्यांच्याबरोबर देशातील नगरात असलेले साठ महत्वाची माणसे यांना नगरातून पकडून नेले.
26 and to take: take [obj] them Nebuzaradan chief guard and to go: take [obj] them to(wards) king Babylon Riblah [to]
२६नंतर अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने त्यांना घेऊन रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे आणले.
27 and to smite [obj] them king Babylon and to die them in/on/with Riblah in/on/with land: country/planet Hamath and to reveal: remove Judah from upon land: soil his
२७रिब्लामध्ये बाबेलाच्या राजाने त्यांना हमाथ देशात रिब्ला येथे मार देऊन ठार केले. अशा तऱ्हेने यहूदा आपल्या देशातून हद्दपार झाला.
28 this [the] people which to reveal: remove Nebuchadnezzar in/on/with year seven Jew three thousand and twenty and three
२८नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले.
29 in/on/with year eight ten to/for Nebuchadnezzar from Jerusalem soul: person eight hundred thirty and two
२९नबुखद्नेस्सराच्या अठराव्या वर्षी त्याने आठशे बत्तीस लोकांस यरूशलेमेमधून नेले.
30 in/on/with year three and twenty to/for Nebuchadnezzar to reveal: remove Nebuzaradan chief guard Jew soul: person seven hundred forty and five all soul: person four thousand and six hundred
३०नबुखद्नेस्सराच्या राजाच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा अंगरक्षक नबूजरदान याने यहूदातले सातशे पंचेचाळीस लोक हद्दपार केले. सर्व हद्दपार लोक मिळून चार हजार सहाशे होते.
31 and to be in/on/with thirty and seven year to/for captivity Jehoiachin king Judah in/on/with two ten month in/on/with twenty and five to/for month to lift: kindness Evil-merodach Evil-merodach king Babylon in/on/with year royalty his [obj] head: leader Jehoiachin king Judah and to come out: send [obj] him from house: home ([the] prison *Q(K)*)
३१मग असे झाले की, यहूदाचा राजा यहोयाखीन याच्या हद्दपारीच्या सदतिसाव्या वर्षी, बाराव्या महिन्यात, महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी, बाबेलाचा राजा अवील-मरोदख याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्यास बंदिवासातून मुक्त केले. ज्यावर्षी अवील-मरोदख राज्य करू लागला त्यावर्षी हे घडले.
32 and to speak: speak with him welfare and to give: give [obj] throne: seat his from above to/for throne: seat ([the] king *Q(K)*) which with him in/on/with Babylon
३२तो त्यांच्याशी प्रेमळपणे बोलला आणि जे दुसरे राजे त्याच्याबरोबर बाबेलात होते त्यांच्यापेक्षा त्यास सन्मानाचे आसन दिले.
33 and to change [obj] garment prison his and to eat food: allowance to/for face his continually all day life his
३३अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले.
34 and ration his ration continually to give: give to/for him from with king Babylon word: portion day: daily in/on/with day: daily his till day death his all day life his
३४आणि त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात त्याच्या मृत्यूपर्यंत त्यास प्रत्येक दिवशी बाबेलाचा राजा नियमीत भोजनाचा भत्ता देत असे.