< Ezekiel 1 >

1 and to be in/on/with thirty year in/on/with fourth in/on/with five to/for month and I in/on/with midst [the] captivity upon river Chebar to open [the] heaven and to see: see vision God
माझ्या आयुष्याच्या तिसाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, मी खबार नदीच्या तीरी दास्यात गेलेल्या लोकांसोबत राहत होतो. तेव्हा स्वर्ग उघडला आणि मी देवाचा दृष्टांत पाहिला.
2 in/on/with five to/for month he/she/it [the] year [the] fifth to/for captivity [the] king Jehoiachin
तो त्या महिन्याच्या पाचवा दिवस होता, आणि ते यहोयाखीन राजाच्या बंदिवासाचे पाचवे वर्ष होते.
3 to be to be word LORD to(wards) Ezekiel son: child Buzi [the] priest in/on/with land: country/planet Chaldea upon river Chebar and to be upon him there hand: power LORD
खबार नदिच्या जवळ, खास्द्यांच्या देशात बूजीचा मुलगा यहेज्केल याजकाकडे परमेश्वर देवाचे वचन सामर्थ्याने आले व परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर आला.
4 and to see: see and behold spirit: breath tempest to come (in): come from [the] north cloud great: large and fire to take: fire and brightness to/for him around and from midst her like/as eye: appearance [the] amber from midst [the] fire
तेव्हा मी पाहिले उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तो एक अग्नीने धुमसणारा, मध्य भागात विजांचा पिवळसर प्रकाश मध्यभागी चमकत असलेला विशाल मेघ होता.
5 and from midst her likeness four living thing and this appearance their likeness man to/for them
मध्यभागी चार जिवंत प्राण्याच्या आकाराचे काही नजरेस पडले; ते माणसासारखे दिसत होते,
6 and four face to/for one and four wing to/for one to/for them
पण त्यांना चार तोंडे होती, आणि प्रत्येक प्राण्याला चार पंख होते.
7 and foot their foot upright and palm: sole foot their like/as palm: sole foot calf and to shine like/as eye: appearance bronze burnished
त्यांचे पाय सरळ होते पण तळवे वासरांच्या तळव्यासारखे आणि पितळेसारखे चकाकणारे होते.
8 (and hand *Q(K)*) man from underneath: under wing their upon four fourth their and face their and wing their to/for four their
त्यांच्या चोहोबाजूंना पंखाखाली त्यांना मनुष्याचे हात होते. त्या चौघांना त्यांचे मुखे व पंख याप्रमाणे होतेः
9 to unite woman: another to(wards) sister her wing their not to turn: turn in/on/with to go: went they man: anyone to(wards) side: beyond face: before his to go: went
त्यांचे पंख त्यांच्या बाजूच्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत आणि पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते; त्याऐवजी त्यांच्यापैकी प्रत्येक आपल्यापुढे नीट सरळ चालत असे.
10 and likeness face their face man and face lion to(wards) [the] right to/for four their and face cattle from [the] left to/for four their and face eagle to/for four their
१०त्या चौघांच्या मुखापैकी एकाचे मुख मनुष्याच्या तोंडासारखे दिसत होते, दुसऱ्याचे मुख सिंहाच्या तोंडासारखे, तिसऱ्याचे मुख बैलासारखे आणि चौथ्याचे मुख गरुडाच्या तोंडासारखे होते.
11 and face their and wing their to separate from to/for above [to] to/for man: anyone two to unite man: anyone and two to cover [obj] body their
११त्यांची मुखे अशाप्रकारची होती आणि त्यांचे पंख एकमेकापासून वेगळे होते, प्रत्येक प्राण्याचे पंख दुसऱ्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करत होते.
12 and man: anyone to(wards) side: beyond face: before his to go: went to(wards) which to be there [to] [the] spirit to/for to go: went to go: went not to turn: turn in/on/with to go: went they
१२प्रत्येक जण सरळ जात होता, जसा आत्मा त्यांना जाण्यासाठी सांगत तसे ते न वळता, सरळ पुढे जात.
13 and likeness [the] living thing appearance their like/as coal fire to burn: burn like/as appearance [the] torch he/she/it to go: walk between: among [the] living thing and brightness to/for fire and from [the] fire to come out: come lightning
१३ते जिवंत प्राणी जळत्या कोलीतासमान किंवा मशालीसमान दिसत होते; त्यांच्यातून प्रखर अग्नी निघत होता व विजा चकाकत होत्या.
14 and [the] living thing to run and to return: return like/as appearance [the] lightning
१४हे जिवंत प्राणी चपळतेने पुढे मागे हालचाल करीत होते आणि ते विजेसारखे दिसत होते!
15 and to see: see [the] living thing and behold wheel one in/on/with land: country/planet beside [the] living thing to/for four face his
१५मग मी त्या प्राण्यांकडे पाहिले त्या जिवंत प्राण्यांच्या बाजूला भूमीवर एक एक चाक होते.
16 appearance [the] wheel and deed: work their like/as eye: appearance jasper and likeness one to/for four their and appearance their and deed: work their like/as as which to be [the] wheel in/on/with midst [the] wheel
१६त्या चाकांचे स्वरूप असे दिसत होतेः चारही चाके एक समान व वैडूर्य मण्यांसारखी होती; आणि जणूकाही चाकात चाक घातलेले असून त्यांना एकमेकांस छेदलेले असावे असा त्यांचा आकार होता.
17 upon four fourth their in/on/with to go: went they to go: went not to turn: turn in/on/with to go: went they
१७जेव्हा चाक चालत तेव्हा ते कोणत्याही दिशेने वळण न घेता चालत.
18 and back/rim/brow their and height to/for them and fear to/for them and back/rim/brow their full eye around to/for four their
१८त्यांच्या धावा या भयावह व उंच होत्या, कारण त्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते!
19 and in/on/with to go: went [the] living thing to go: went [the] wheel beside them and in/on/with to lift: raise [the] living thing from upon [the] land: country/planet to lift: raise [the] wheel
१९जेव्हा ते जिवंत प्राणी चालत तेव्हा त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती.
20 upon which to be there [the] spirit to/for to go: went to go: went there [to] [the] spirit to/for to go: went and [the] wheel to lift: raise to/for close them for spirit [the] living thing in/on/with wheel
२०जेथे जिवंत प्राण्यांचा आत्मा त्यांना नेऊ इच्छित होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता.
21 in/on/with to go: went they to go: went and in/on/with to stand: stand they to stand: stand and in/on/with to lift: raise they from upon [the] land: country/planet to lift: raise [the] wheel to/for close them for spirit [the] living thing in/on/with wheel
२१जेव्हा केव्हा ते प्राणी चालत चाकेही हालचाल करीत, जेव्हा ते थांबत चाकेही थांबत, जेव्हा ते उंच उडत त्यांच्या सोबत चाकेही उंच उडत होती कारण त्यांचा आत्मा त्यांच्या चाकांत वास करीत होता.
22 and likeness upon head [the] living thing expanse like/as eye: appearance [the] ice [the] to fear: revere to stretch upon head their from to/for above [to]
२२त्या जिवंत प्राण्यांच्या मस्तकावर महागड्या घुमटासारखे चकाकणारे दिसत होते, त्यांच्या कपाळावर स्फटिकासारखे चमकत होते.
23 and underneath: under [the] expanse wing their upright woman: another to(wards) sister her to/for man: anyone two to cover to/for them and to/for man: anyone two to cover to/for them [obj] body their
२३घुमटाखाली प्राणी आपले पंख सरळ लांब पसरवत होते आणि एकमेकांच्या पंखांना ते स्पर्श करीत होते. प्रत्येक प्राण्याच्या पंखांच्या जोडीने आपले शरीर झाकीत आणि दोन-दोन पंखांनी स्वतःला आवरण करीत.
24 and to hear: hear [obj] voice: sound wing their like/as voice: sound water many like/as voice: sound Almighty in/on/with to go: went they voice: sound tumult like/as voice: sound camp in/on/with to stand: stand they to slacken wing their
२४तेव्हा मी त्यांच्या पंखांचा पाण्याच्या धबधब्यासारखा मोठा आवाज ऐकला. तो सर्वसामर्थ्य देवाच्या वाणीसारखा होता. ते चालत तेव्हा जोरदार पर्जन्यवृष्टीयुक्त वादळासमान ध्वनी होता. तो ध्वनी मोठ्या सेनेसारखा होता. जेव्हा ते थांबत असे तेव्हा ते आपले पंख खाली करत होते.
25 and to be voice from upon to/for expanse which upon head their in/on/with to stand: stand they to slacken wing their
२५जेव्हा ते थांबत व आपले पंख खाली स्तब्ध ठेवीत तेव्हा त्यांच्या माथ्यावरील घुमटातून आवाज येत होता.
26 and from above to/for expanse which upon head their like/as appearance stone sapphire likeness throne and upon likeness [the] throne likeness like/as appearance man upon him from to/for above [to]
२६त्यांच्या माथ्याच्या वरील घुमटाच्या भागात नीलरत्न जडीत सिंहासन दिसत होते, आणि सिंहासनावर मनुष्याच्या चेहऱ्या समान कोणी असल्याची जाणीव होत होती.
27 and to see: see like/as eye: appearance amber like/as appearance fire house: inside to/for her around from appearance loin his and to/for above [to] and from appearance loin his and to/for beneath to see: see like/as appearance fire and brightness to/for him around
२७त्याच्या ठायी सर्वत्र तृणमण्याच्या तेजासारखा प्रकाश मी पाहिला, त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास झाला, व त्याच्या भोवती प्रभा चमकत होती.
28 like/as appearance [the] bow which to be in/on/with cloud in/on/with day [the] rain so appearance [the] brightness around he/she/it appearance likeness glory LORD and to see: see and to fall: fall upon face my and to hear: hear voice to speak: speak
२८पाऊस पडतांना दिसणाऱ्या मेघधनुष्यासारखा तो भासत होता त्याच्या भोवती प्रखर तेजोमय प्रकाश होता. हे परमेश्वर देवाचे गौरवयुक्त तेज दिसत होते. जेव्हा मी हे पाहिले व माझ्यासोबत बोलणारी वाणी ऐकली तेव्हा मी उपडा पडलो.

< Ezekiel 1 >