< Ezekiel 42 >
1 and to come out: send me to(wards) [the] court [the] outer [the] way: direction way: direction [the] north and to come (in): bring me to(wards) [the] chamber which before [the] cutting/separation and which before [the] building to(wards) [the] north
१नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडून बाहेरच्या अंगणात आणले आणि मग त्याने मला ती सोडलेली जागा आणि उत्तरेकडील इमारत यासमोरील खोल्या असलेल्या इमारतीत आणले.
2 to(wards) face: before length cubit [the] hundred entrance [the] north and [the] width fifty cubit
२शंभर हात लांबीच्यासमोर तिच्या उत्तरेकडचा प्रवेश होता आणि इमारतीची रुंदी पन्नास हात होती.
3 before [the] twenty which to/for court [the] inner and before pavement which to/for court [the] outer gallery to(wards) face: before gallery in/on/with third
३आंतील अंगणासमोर वीस हात व बाहेरील अंगणाच्या इमारतीसमोर तिसऱ्या मजल्याला समोरासमोर सज्जे होते.
4 and to/for face: before [the] chamber journey ten cubit width to(wards) [the] inner way: direction cubit one and entrance their to/for north
४खोल्यासमोर दहा हात रुंद व शंभर हात लांब असा एक रस्ता होता; त्याचे दरवाजे उत्तरेकडे होते.
5 and [the] chamber [the] high be short for to eat gallery from them from [the] lower and from [the] middle building
५पण या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील जागा सज्ज्यात गुंतली होती म्हणून तेथल्या खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा लहान होत्या.
6 for to do three they(fem.) and nothing to/for them pillar like/as pillar [the] court upon so to reserve from [the] lower and from [the] middle from [the] land: soil
६कारण त्या खोल्यांचे तीन मजले होते. त्यांना अंगणातल्या खांबासारखे खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यापेक्षा लहान होत्या.
7 and wall which to/for outside to/for close [the] chamber way: direction [the] court [the] outer to(wards) face: before [the] chamber length his fifty cubit
७आणि त्या खोल्यांशी समांतर अशी खोल्यांसमोरील बाहेरच्या बाजूला, खोल्यांना समांतर अशी भिंत होती. ती बाहेरच्या अंगणापर्यंत गेलेली एक भिंत होती; तिची लांबी पन्नास हात होती.
8 for length [the] chamber which to/for court [the] outer fifty cubit and behold upon face: before [the] temple: nave hundred cubit
८कारण बाहेरच्या अंगणाच्या खोल्यांची लांबी पन्नास हात होती. मंदिराच्या समोर शंभर हात होती.
9 (and from underneath: under [the] chamber *Q(K)*) [the] these ([the] to come (in): come *Q(K)*) from [the] east in/on/with to come (in): come he to/for them from [the] court [the] outer
९या खोल्यांच्या खालून पूर्वेस प्रवेशद्वार होते, त्यातून बाहेरच्या अंगणातून येणारे त्या खोल्यांत जात असत.
10 in/on/with width wall [the] court way: direction [the] east to(wards) face: before [the] cutting/separation and to(wards) face: before [the] building chamber
१०अंगणाच्या भिंतीला लागून पूर्वेकडे, सोडलेल्या जागेसमोर व मंदिराच्या अंगणासमोर बाहेरच्या बाजूलाही खोल्या होत्या.
11 and way: road to/for face: before their like/as appearance [the] chamber which way: direction [the] north like/as length their so width their and all exit their and like/as justice: custom their and like/as entrance their
११उत्तरेकडील खोल्यासमोर जसा रस्ता होता तसा त्याच्या समोरही रस्ता होता. त्यांची लांबी-रुंदी, त्यांच्या बाहेर जाण्याच्या सर्व वाटा व त्यांची एकंदर व्यवस्था त्यांच्याप्रमाणेच होती.
12 and like/as entrance [the] chamber which way: direction [the] south entrance in/on/with head: first way: road way: road in/on/with face: before [the] wall suitable way: direction [the] east in/on/with to come (in): come them
१२उत्तरेकडील दारांसारखेच दक्षिणेकडे असलेल्या खोल्यांचे दारे होती; रहदारीच्या तोंडाजवळ म्हणजे उजव्या भिंतीजवळील रस्त्यावरून त्या दारातून पूर्वेकडून येणारे लोक प्रवेश करीत असत.
13 and to say to(wards) me chamber [the] north chamber [the] south which to(wards) face: before [the] cutting/separation they(fem.) chamber [the] holiness which to eat there [the] priest which near to/for LORD holiness [the] holiness there to rest holiness [the] holiness and [the] offering and [the] sin: sin offering and [the] guilt (offering) for [the] place holy
१३मग तो मनुष्य मला म्हणाला, “अंगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिणेकडील खोल्या या पवित्र असून त्यामध्ये परमेश्वराजवळ जाणारे याजक परमपवित्र पदार्थ खातील. तेथे ते परमपवित्र पदार्थ, अन्नार्पण, पापार्पण व दोषार्पण ठेवतील, कारण ते स्थान पवित्र आहे.
14 in/on/with to come (in): come they [the] priest and not to come out: come from [the] Holy Place to(wards) [the] court [the] outer and there to rest garment their which to minister in/on/with them for holiness they(fem.) (and to clothe *Q(K)*) garment another and to present: come to(wards) which to/for people
१४जेव्हा याजक तेथे प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात जाऊ नये तर ज्या वस्त्रांनी ते सेवा करतात ती त्यांनी बाजूला तेथेच उतरवून ठेवावी कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. म्हणून त्यांनी लोकांपुढे जाण्याआधी दुसरी वस्रे घालावी.”
15 and to end: finish [obj] measure [the] house: home [the] inner and to come out: send me way: journey [the] gate which face: before his way: direction [the] east and to measure him around around
१५आतील मंदिराचे मोजमाप करून झाल्यावर त्या मनुष्याने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले आणि तेथे त्यांने सर्व सभोवतालच्या बाजूंचे मोजमाप केले.
16 to measure spirit: side [the] east in/on/with branch: stem [the] measure five (hundred *Q(K)*) branch: measuring rod in/on/with branch: measuring rod [the] measure around
१६त्याने ते मापावयाच्या काठीने मापले, पूर्वेकडे मापण्याच्या काठीने पांचशे हात मापले.
17 to measure spirit: side [the] north five hundred branch: measuring rod in/on/with branch: stem [the] measure around
१७त्याने उत्तरेची बाजू मोजली. ती मापण्याच्या काठीने पाचशे हात भरली.
18 [obj] spirit: side [the] south to measure five hundred branch: measuring rod in/on/with branch: stem [the] measure
१८त्याने दक्षिणेची बाजू सुद्धा मोजली. ती मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
19 to turn: turn to(wards) spirit: side [the] sea: west to measure five hundred branch: measuring rod in/on/with branch: stem [the] measure
१९मग तो वळला आणि पश्चिमेची बाजू मोजली, मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
20 to/for four spirit: side to measure him wall to/for him around around length five hundred and width five hundred to/for to separate between [the] holiness to/for common
२०त्याने चारी बाजूंनी मोजमाप केले. पवित्रस्थळे व अपवित्र स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्यास सभोवती भिंत होती. तिची लांबी पांचशे हात व रुंदी पांचशे हात होती.