< Exodus 37 >
1 and to make Bezalel [obj] [the] ark tree: wood acacia cubit and half length his and cubit and half width his and cubit and half height his
१बसालेलने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला; तो अडीच हात लांब, दीड हात रुंद व दीड हात उंच होता.
2 and to overlay him gold pure from house: inside and from outside and to make to/for him border gold around
२त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढवला आणि त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला.
3 and to pour: cast metal to/for him four ring gold upon four beat his and two ring upon side his [the] one and two ring upon side his [the] second
३त्याच्या चाऱ्ही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या चार कड्या ओतून एका बाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावल्या.
4 and to make alone: pole tree: wood acacia and to overlay [obj] them gold
४त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते शुद्ध सोन्याने मढवले.
5 and to come (in): bring [obj] [the] alone: pole in/on/with ring upon side [the] ark to/for to lift: bear [obj] [the] ark
५कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यांत घातले.
6 and to make mercy seat gold pure cubit and half length her and cubit and half width her
६नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते अडीच हात लांब व दीड हात रुंद होते.
7 and to make two cherub gold beating to make [obj] them from two end [the] mercy seat
७बसालेलने सोने घडवून दोन करुब बनवले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले.
8 cherub one from end from this and cherub one from end from this from [the] mercy seat to make [obj] [the] cherub from two (end his *Q(K)*)
८त्याने एक करुब एका टोकासाठी व दुसरा करुब दुसऱ्या टोकासाठी बनवला. करुब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकांना बनवले.
9 and to be [the] cherub to spread wing to/for above [to] to cover in/on/with wing their upon [the] mercy seat and face their man: anyone to(wards) brother: compatriot his to(wards) [the] mercy seat to be face [the] cherub
९त्या करुबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती.
10 and to make [obj] [the] table tree: wood acacia cubit length his and cubit width his and cubit and half height his
१०त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होते.
11 and to overlay [obj] him gold pure and to make to/for him border gold around
११त्याने ते शुद्ध सोन्याने मढवले व त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला;
12 and to make to/for him perimeter handbreadth around and to make border gold to/for perimeter his around
१२आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला.
13 and to pour: cast metal to/for him four ring gold and to give: put [obj] [the] ring upon four [the] side which to/for four foot his
१३त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चाऱ्ही पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या.
14 to/for close [the] perimeter to be [the] ring house: container to/for alone: pole to/for to lift: bear [obj] [the] table
१४या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या.
15 and to make [obj] [the] alone: pole tree: wood acacia and to overlay [obj] them gold to/for to lift: bear [obj] [the] table
१५मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले;
16 and to make [obj] [the] article/utensil which upon [the] table [obj] dish his and [obj] palm: dish his and [obj] bowl his and [obj] [the] jug which to pour in/on/with them gold pure
१६नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली.
17 and to make [obj] [the] lampstand gold pure beating to make [obj] [the] lampstand thigh her and branch: stem her cup her capital her and flower her from her to be
१७त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली.
18 and six branch to come out: issue from side her three branch lampstand from side her [the] one and three branch lampstand from side her [the] second
१८या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.
19 three cup be almond shaped in/on/with branch [the] one capital and flower and three cup be almond shaped in/on/with branch one capital and flower so to/for six [the] branch [the] to come out: come from [the] lampstand
१९प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, बोंडाफुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या बोंडाफुलासारख्या केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती.
20 and in/on/with lampstand four cup be almond shaped capital her and flower her
२०दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोडांफुलांसह चार वाट्या होत्या.
21 and capital underneath: under two [the] branch from her and capital underneath: under two [the] branch from her and capital underneath: under two [the] branch from her to/for six [the] branch [the] to come out: issue from her
२१या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले प्रत्येकी एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती.
22 capital their and branch their from her to be all her beating one gold pure
२२शाखा व फुले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडवलेला होता.
23 and to make [obj] lamp her seven and tong her and censer her gold pure
२३त्याने त्या दीपावृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या.
24 talent gold pure to make [obj] her and [obj] all article/utensil her
२४त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची बनवली.
25 and to make [obj] altar [the] incense tree: wood acacia cubit length his and cubit width his to square and cubit height his from him to be horn his
२५मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती.
26 and to overlay [obj] him gold pure [obj] roof his and [obj] wall his around and [obj] horn his and to make to/for him border gold around
२६त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चाऱ्ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला;
27 and two ring gold to make to/for him from underneath: under to/for border his upon two side his upon two side his to/for house: container to/for alone: pole to/for to lift: bear [obj] him in/on/with them
२७वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्यांच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना लावल्या.
28 and to make [obj] [the] alone: pole tree: wood acacia and to overlay [obj] them gold
२८त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले.
29 and to make [obj] oil [the] anointing holiness and [obj] incense [the] spice pure deed: work to mix
२९नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला.