< Deuteronomy 17 >
1 not to sacrifice to/for LORD God your cattle and sheep which to be in/on/with him blemish all word: thing bad: harmful for abomination LORD God your he/she/it
१परमेश्वरास यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरू यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे.
2 for to find in/on/with entrails: among your in/on/with one gate: town your which LORD God your to give: give to/for you man or woman which to make: do [obj] [the] bad: evil in/on/with eye: seeing LORD God your to/for to pass: trespass covenant his
२तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या नगरात राहायला लागल्यावर एखादे दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर आले. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळले. परमेश्वराच्या आज्ञेविरूद्ध,
3 and to go: went and to serve: minister God another and to bow to/for them and to/for sun or to/for moon or to/for all army [the] heaven which not to command
३म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले,
4 and to tell to/for you and to hear: hear and to seek be good and behold truth: true to establish: right [the] word: promised to make: do [the] abomination [the] this in/on/with Israel
४अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची खात्री झाली,
5 and to come out: send [obj] [the] man [the] he/she/it or [obj] [the] woman [the] he/she/it which to make: do [obj] [the] word: thing [the] bad: evil [the] this to(wards) gate your [obj] [the] man or [obj] [the] woman and to stone them in/on/with stone and to die
५तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा.
6 upon lip: word two witness or three witness to die [the] to die not to die upon lip: word witness one
६त्या व्यक्तीच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका.
7 hand [the] witness to be in/on/with him in/on/with first to/for to die him and hand all [the] people in/on/with last and to burn: purge [the] bad: evil from entrails: among your
७प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.
8 for to wonder from you word: case to/for justice: judgement between blood to/for blood between judgment to/for judgment and between plague to/for plague word: case strife in/on/with gate: town your and to arise: rise and to ascend: rise to(wards) [the] place which to choose LORD God your in/on/with him
८एखादे खूनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हास आवाक्याबाहेरचे वाटेल, या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल, तेव्हा परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे.
9 and to come (in): come to(wards) [the] priest [the] Levi and to(wards) [the] to judge which to be in/on/with day [the] they(masc.) and to seek and to tell to/for you [obj] word: promised [the] justice: judgement
९तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्यावा. या समस्येची सोडवणूक ते करतील.
10 and to make: do upon lip: word [the] word: promised which to tell to/for you from [the] place [the] he/she/it which to choose LORD and to keep: careful to/for to make: do like/as all which to show you
१०परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हास सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा.
11 upon lip: word [the] instruction which to show you and upon [the] justice: judgement which to say to/for you to make: do not to turn aside: turn aside from [the] word: case which to tell to/for you right and left
११तुला ज्या सूचना ते देतील व जो निर्णय तुला सांगतील त्याप्रमाणे कर. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासुन उजवीडावीकडे वळू नको.
12 and [the] man which to make: do in/on/with arrogance to/for lest to hear: obey to(wards) [the] priest [the] to stand: stand to/for to minister there [obj] LORD God your or to(wards) [the] to judge and to die [the] man [the] he/she/it and to burn: purge [the] bad: evil from Israel
१२जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याचे तेथे हजर असणाऱ्या याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्यास चांगले शासन करा. त्यास मृत्यूदंड द्या. इस्राएलातून या नीच मनुष्याचे उच्चाटन करा.
13 and all [the] people to hear: hear and to fear and not to boil [emph?] still
१३हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
14 for to come (in): come to(wards) [the] land: country/planet which LORD God your to give: give to/for you and to possess: take her and to dwell in/on/with her and to say to set: appoint upon me king like/as all [the] nation which around me
१४तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे रहाल. मग इतर राष्ट्राप्रमाणे आपण आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हास वाटेल.
15 to set: appoint to set: appoint upon you king which to choose LORD God your in/on/with him from entrails: among brother: compatriot your to set: appoint upon you king not be able to/for to give: put upon you man foreign which not brother: compatriot your he/she/it
१५तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तीची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये.
16 except not to multiply to/for him horse and not to return: return [obj] [the] people Egypt [to] because to multiply horse and LORD to say to/for you not to add: again [emph?] to/for to return: return in/on/with way: road [the] this still
१६त्याने स्वत: साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये, असे परमेश्वराने बजावले आहे.
17 and not to multiply to/for him woman: wife and not to turn aside: turn aside heart his and silver: money and gold not to multiply to/for him much
१७तसेच त्यास बऱ्याच स्त्रिया असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत्त होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
18 and to be like/as to dwell he upon throne kingdom his and to write to/for him [obj] second [the] instruction [the] this upon scroll: book from to/for face: before [the] priest [the] Levi
१८राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत: साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे.
19 and to be with him and to call: read out in/on/with him all day life his because to learn: learn to/for to fear: revere [obj] LORD God his to/for to keep: obey [obj] all word [the] instruction [the] this and [obj] [the] statute: decree [the] these to/for to make: do them
१९नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने तो परमेश्वर देवाचे भय बाळगायला शिकेल.
20 to/for lest to exalt heart his from brother: compatriot his and to/for lest to turn aside: turn aside from [the] commandment right and left because to prolong day: always upon kingdom his he/she/it and son: descendant/people his in/on/with entrails: among Israel
२०म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्यास स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.