< 1 Peter 4 >
1 Christ therefore/then to suffer (above/for me *K*) flesh and you the/this/who it/s/he thought/purpose to arm that/since: since the/this/who to suffer (in/on/among *k*) flesh to cease (sin *NK(o)*)
१म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
2 toward the/this/who never again a human desire but will/desire God the/this/who remaining in/on/among flesh to live time
२म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
3 sufficient for (me *K*) the/this/who to pass by time (the/this/who life *K*) the/this/who (plan *N(k)O*) the/this/who Gentiles (to workout/produce *N(k)O*) to travel in/on/among debauchery desire drunkenness orgy carousing and unlawful idolatry
३कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात.
4 in/on/among which to host not to flock you toward the/this/who it/s/he the/this/who debauchery outpouring to blaspheme
४अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात.
5 which to pay word the/this/who readily to have/be (to judge *NK(o)*) to live and dead
५तरीही, देव जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्यास ते आपला हिशोब देतील.
6 toward this/he/she/it for and dead to speak good news in order that/to to judge on the other hand according to a human flesh to live then according to God spirit/breath: spirit
६कारण, याकरिता, मृतांनादेखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे.
7 all then the/this/who goal/tax to come near be of sound mind therefore/then and be sober toward (the/this/who *k*) prayer
७पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा;
8 before all (then *k*) the/this/who toward themself love fervent to have/be that/since: since love (to cover *N(k)O*) multitude sin
८आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते.
9 hospitable toward one another without (murmuring *N(k)O*)
९काही कुरकुर न करता तुम्ही सर्वजण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा.
10 each as/just as to take gift toward themself it/s/he to serve as/when good manager various grace God
१०तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा.
11 if one to speak as/when oracles God if one to serve as/when out from strength (which *NK(o)*) to provide the/this/who God in order that/to in/on/among all to glorify the/this/who God through/because of Jesus Christ which to be the/this/who glory and the/this/who power toward the/this/who an age: eternity the/this/who an age: eternity amen (aiōn )
११जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन. (aiōn )
12 beloved not to host the/this/who in/on/among you burning to/with temptation/testing: testing you to be as/when foreign you to happen
१२प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका.
13 but insofar as to participate the/this/who the/this/who Christ suffering to rejoice in order that/to and in/on/among the/this/who revelation the/this/who glory it/s/he to rejoice to rejoice
१३उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखात भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लासित व्हावे.
14 if to revile in/on/among name Christ blessed that/since: since the/this/who the/this/who glory and the/this/who the/this/who God spirit/breath: spirit upon/to/against you to give rest (according to on the other hand it/s/he to blaspheme according to then you to glorify *K*)
१४ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.
15 not for one you to suffer as/when murderer or thief or wrongdoing or as/when meddler
१५पण तुमच्यातील कोणी खुनी किंवा चोर म्हणून, वाईट करणारा किंवा दुसर्याच्या कामात लुडबुड करणारा म्हणून कोणी दुःख भोगू नये.
16 if then as/when Christian not be ashamed to glorify then the/this/who God in/on/among the/this/who (name *N(K)O*) this/he/she/it
१६ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्यास लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.
17 that/since: since the/this/who time/right time the/this/who be first the/this/who judgment away from the/this/who house: household the/this/who God if then first away from me which? the/this/who goal/tax the/this/who to disobey the/this/who the/this/who God gospel
१७कारण देवाच्या घराण्यापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आता आली आहे आणि तो जर प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाचे शुभवर्तमान मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल?
18 and if the/this/who just hardly to save the/this/who (then *o*) ungodly and sinful where? to shine/appear
१८नीतिमान जर कष्टाने तर जो भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?
19 so and the/this/who to suffer according to the/this/who will/desire the/this/who God (as/when *K*) faithful creator to set before the/this/who soul (it/s/he *N(k)O*) in/on/among doing good
१९म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्याहाती आपले जीव सोपवावेत.