< Jonah 4 >
1 And it was displeasing to Jonah displeasure great and it burned to him.
१परंतु यामुळे योनाला फार वाईट वाटले व त्यास राग आला.
2 And he prayed to Yahweh and he said I beg you O Yahweh ¿ not [was] this word my until was I on own land my there-fore I did [the] first time to flee Tarshish towards that I knew that you [are] a God gracious and compassionate long of anger and great of covenant loyalty and [who] relents on evil.
२तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, “हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस.
3 And therefore O Yahweh take please life my from me for [is] good death my more than life my.
३माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, माझा जीव घे, कारण जिवंत राहण्यापेक्षा मला मरण चांगले वाटते.”
4 And he said Yahweh ¿ rightly does it burn to you.
४मग परमेश्वर म्हणाला, “तुला राग येणे चांगले आहे काय?”
5 And he went out Jonah from the city and he sat from east of the city and he made for himself there a shelter and he sat under it in the shade until that he will see what? will it be in the city.
५मग योना बाहेर निघून निनवे शहराच्या पूर्व दिशेला बसला; तेथे तो एक मंडप करून सावलीत, शहराचे काय होईल हे पाहत बसला.
6 And he appointed Yahweh God a plant and it went up - over Jonah to be shade over head his to deliver him from distress his and he rejoiced Jonah on the plant a joy great.
६मग परमेश्वर देवाने योनाच्या डोक्यावर सावलीसाठी एक वेली उगविली, म्हणजे त्याने दुःखातून मुक्त व्हावे असे केले. त्या वेलीमुळे योनाला खूप आनंद झाला.
7 And he appointed God a worm when came up the dawn to the next day and it attacked the plant and it withered.
७मग दुसऱ्या दिवशी देवाने एक किडा तयार केला, तो त्या वेलीला लागल्यामुळे ती वेल सुकून गेली.
8 And it was - when arose the sun and he appointed God a wind an east wind hot and it struck the sun on [the] head of Jonah and he became faint and he asked life his to die and he said [is] good death my more than life my.
८मग देवाने, सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून झळईचा वारा सोडला; आणि ऊन योनाच्या डोक्याला लागले त्याने तो मूर्छित झाला व त्यास मरण येवो अशी तो विनवणी करत म्हणाला, “मला जिवंत राहण्यापेक्षा मरण चांगले वाटते.”
9 And he said God to Jonah ¿ rightly does it burn to you on the plant and he said rightly it burns to me to death.
९मग देव योनाला म्हणाला, “त्या वेलीमुळे तुला राग येणे हे चांगले आहे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.”
10 And he said Yahweh you you had compassion on the plant which not you had toiled in it and not you had made grow it that a son of a night it was and a son of a night it perished.
१०परमेश्वर त्यास म्हणाला, “या वेलीसाठी तू काहीच कष्ट केले नाहीस व तू हिला मोठे केले नाही, ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली, त्या वेलीची तुला एवढी काळजी आहे;
11 And I not will I have compassion? on Nineveh the city great which there in it [are] many more than two [plus] ten ten thousand person[s] who not he distinguishes between right [hand] his and left his and livestock much.
११ज्यांना उजव्या व डाव्या हाताचा फरक समजत नाही असे एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त लोक या मोठ्या निनवे शहरात आहेत आणि पुष्कळ गुरेढोरे आहेत. त्यांची मी काळजी करू नये काय?”