< Zechariah 14 >
1 Lo! a day, cometh, pertaining to Yahweh, —when apportioned shall be thy spoil in thy midst;
१पाहा! परमेश्वराच्या न्यायाचा दिवस येत आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती त्या दिवशी तुमच्या शहरात वाटली जाईल.
2 Yea I will gather together all the nations unto Jerusalem, to battle, and the city, shall be captured, and the houses, plundered, and, the women, ravished, —and half of the city, shall go forth, into exile, but, the remainder of the people, shall not be cut off out of the city.
२यरूशलेमेशी लढावयास मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांना लुटतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे-अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांस नगरीतून नेले जाणार नाही.
3 Then will Yahweh go forth, and fight against those nations, —just as he did in the day when he fought, in the day of battle;
३मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल; युद्धाच्या दिवसात जसे तो युद्ध करत असे तशाप्रकारे तो राष्ट्रांशी युध्द करेल.
4 Yea his feet, shall stand, in that day, on the Mount of Olives, which is before Jerusalem on the east, and the Mount of Olives, shall cleave asunder, from the midst thereof, towards the east and towards the west, an exceeding great valley, —and half of the mountain, shall give way, toward the north, and half of it toward the south.
४त्यावेळी, तो यरूशलेमेच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहताच तो पर्वत दुभंगेल; त्या पर्वताचा अर्धा भाग उत्तरेकडे व अर्धा भाग दक्षिणेकडे सरकेल. जैतूनाच्या झाडांचा डोंगर पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत दुभागून एक खोल दरी निर्माण होईल.
5 Then shall ye flee to the valley of my mountains, for the valley of the mountains, shall reach, very near, Yea, ye shall flee, just as ye fled from before the earthquake, in the days of Uzziah king of Judah, —Then, shall arrive, Yahweh my God, All thy holy ones, with thee!
५तेव्हा तुम्ही माझ्या पर्वताच्या खोऱ्याकडे पळाल, कारण ती दरी आसलापर्यंत पोहोंचेल; व यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल; पण माझा परमेश्वर, देव तेथे येईल आणि तुमच्याबरोबर त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील.
6 And it shall come to pass, in that day, —that there shall be no light, the bright stars, shall be withdrawn;
६आणि तो एक विशेष दिवस असेल त्यावेळी प्रकाश नसेल, आणि गारठा वा कडाक्याची थंडी नसेल.
7 And it shall be a day by itself, The same, shall be known unto Yahweh—Not day, nor night, —But it shall come to pass, that, at evening time, there shall be light.
७तो दिवस विशेष होईल तो परमेश्वरासच ठाऊक; कारण तो दिवसही नसणार वा रात्रही नसणार. तर संध्याकाळचा प्रकाशासारखा प्रकाश असेल.
8 And it shall come to pass, in that day, that there shall go forth living waters out of Jerusalem, half of them unto the sea before, and half of them unto the sea behind, in summer and in winter, shall it he.
८तेव्हा यरूशलेमेतून सतत वाहणाऱ्या पाण्याचा झरा वाहील, त्यास दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाऊन पुर्वेकडील समुद्राला मिळेल तर दुसरा पाट पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल, हिवाळा असो वा उन्हाळा तो वाहत राहील.
9 So will Yahweh become king over all the earth, —In that day, shall there be one Yahweh, and, his Name, be one.
९त्यावेळी, परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. त्यादिवशी केवळ परमेश्वर व केवळ त्याचे नाव असणार.
10 All the land shall turn into a plain, from Geba to Rimmon, south of Jerusalem, —and shall lift herself on high and abide in her own place, from the gate of Benjamin up to the place of the first gate, up to the corner gate, and from the tower of Hananeel up to the wine-presses of the king.
१०तेव्हा सर्व देश यरूशलेमेच्या दक्षिणेस असलेली गिबा ते रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरूशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल; अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत; अशी ती आपल्या स्थळी वसेल.
11 So shall men dwell therein, and, utter destruction, shall not be any more, —but Jerusalem, shall abide, in security.
११लोक तेथे वस्ती करतील, ह्यापुढे त्यांचा नाश होणार नाही; यरूशलेम अगदी सुरक्षित असेल.
12 And, this, shall be the plague wherewith Yahweh will plague all the peoples who have made war against Jerusalem, —his flesh, shall be made to rot, while he is standing upon his feet, and, his eyes, shall rot in their sockets, and, his tongue, shall rot in their mouth;
१२पण यरूशलेमविरुध्द लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील; तो त्या राष्ट्रांचा या मरीने संहार करील: ते आपल्या पायांवर उभे असतांनाच त्यांची कातडी कुजू लागेल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचांत आणि त्यांच्या जीभा त्यांच्या तोंडांत सडतील.
13 And it shall come to pass, in that day, that there shall be a great confusion from Yahweh among them, —and they will lay hold every one upon the hand of his neighbour, and his hand, will rise up, against the hand of his neighbour;
१३तेव्हा परमेश्वराकडून खरोखरच लोकांची त्रेधा उडेल; प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील.
14 Moreover also, Judah, will fight with Jerusalem, —and the wealth of all the nations round about, shall be gathered together, gold and silver and apparel, in great abundance.
१४यहूदाही यरूशलेममध्ये लढेल. भोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून संपत्ती मिळेल; त्यांना भरपूर सोने, चांदी आणि वस्रे यांचा पूर येईल.
15 And, so, shall be the plague of the horse, the mule, the camel, and the ass, and all the beasts which shall be in those camps, —like this plague!
१५ही मरी शत्रू सैन्याच्या छावणीत पसरेल व त्यांच्या घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर आणि गाढवांवर व प्रत्येक जनावरावर ही मरी येईल.
16 And it shall come to pass, that, as for every one that is left out of all the nations that came against Jerusalem, that they shall come up, from year to year, to bow down to the king, Yahweh of hosts, and to celebrate the festival of booths.
१६यरूशलेमेशी लढण्यास आलेल्या राष्ट्रांपैकी जे वाचतील ते सर्व, सेनाधीश परमेश्वराची उपासना करण्यासाठी, मंडपाचा सण साजरा करायला, दरवर्षी यरूशलेमेला येतील.
17 And it shall come to pass that—whoso shall not come up out of the families of the earth unto Jerusalem, to bow down to the king, Yahweh of hosts, —there shall not, on them, be any rain.
१७पृथ्वीवरील जी सर्व कुटुंबे यरूशलेमेला प्रभूराजाची, सेनाधीश परमेश्वराची उपासना करायला जाणार नाहीत त्यांच्या देशात परमेश्वर पाऊस पाडणार नाही.
18 And, if the family of Egypt shall not come up, and shall not enter in, upon whom there falleth none, then shall smite them the plague wherewith Yahweh, did plague, the nations, because they came not up to celebrate the festival of booths.
१८जर मिसराचे घराणे मंडपाचा सण साजरा करण्यासाठी आले नाही, तर त्यांच्यावरही पर्जन्यवृष्टी होणार नाही; मंडपाच्या सणात जी राष्ट्रे वर चढून जाणार नाहीत त्यांच्यावर, शत्रूंच्या राष्ट्रांत परमेश्वराने जी मरी पसरवली होती, ती तो त्यांच्यावर आणिल.
19 This, shall be the punishment of Egypt, —and the punishment of all the nations, when they come not up to celebrate the festival of booths.
१९ही शिक्षा मंडपाच्या सणाला न आल्याबद्दल मिसराला व इतर प्रत्येक राष्ट्रांना असेल.
20 In that day, shall there be [inscribed] upon the bells of the horses, Holy unto Yahweh, —and the caldrons in the house of Yahweh shall be like the dashing bowls before the altar.
२०त्यावेळी, घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरलेली असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातीली भांडी, वेदींपुढील कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.
21 And every caldron in Jerusalem and in Judah shall be Holy unto Yahweh of hosts, —So shall all who are offering sacrifice, come in, and take of them, and boil therein, —Neither shall there be a merchant any more in the house of Yahweh of hosts, in that day.
२१यरूशलेमेतील व यहूदातील प्रत्येक पात्र सेनाधीश परमेश्वरास पवित्र होईल; परमेश्वरासाठी यज्ञ करणारा प्रत्येकजण ही भांडी घेईल व त्यामध्ये अन्न शिजविल; त्यादिवसापासून सेनाधीश परमेश्वराच्या निवासस्थानात कनानी आणखी असणार नाहीत.