< Genesis 30 >

1 When Rachel saw that she was not bearing Jacob any children, Rachel envied her sister. She said to Jacob, "Give me children, or else I will die."
याकोबापासून आपल्याला मुल होत नाहीत हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करू लागली; तेव्हा राहेल याकोबाला म्हणाली, “मला मुल द्या, नाही तर मी मरेन.”
2 Then Jacob became very angry with Rachel, and he said, "Am I in God's place, who has withheld from you the fruit of the womb?"
याकोबाचा राहेलवर राग भडकला. तो म्हणाला, “ज्याने तुला मुल होण्यापासून रोखून धरले आहे, त्या देवाच्या ठिकाणी मी आहे की काय?”
3 She said, "Look, my servant Bilhah. Sleep with her, so that she will bear children for me, that I too may have children through her."
ती म्हणाली, “पाहा, माझी दासी बिल्हा आहे. तुम्ही तिच्या जवळ जा म्हणजे मग ती माझ्या मांडीवर मुलाला जन्म देईल व तिजपासून मलाही मुले मिळतील.”
4 So she gave him Bilhah her servant as a wife, and Jacob slept with her.
अशा रीतीने तिने त्यास आपली दासी बिल्हा पत्नी म्हणून दिली. आणि याकोबाने तिच्याबरोबर संबंध ठेवला.
5 Bilhah conceived, and bore Jacob a son.
तेव्हा बिल्हा गरोदर राहिली व याकोबाच्या मुलाला जन्म दिला.
6 Rachel said, "God has judged me, and has also heard my voice, and has given me a son." Therefore she called his name Dan.
मग राहेल म्हणाली, “देवाने माझे ऐकले आहे. त्याने माझा आवाज नक्कीच ऐकला आहे आणि मला मुलगा दिला आहे.” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले.
7 Bilhah, Rachel's handmaid, conceived again, and bore Jacob a second son.
राहेलची दासी बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
8 Rachel said, "I have wrestled mightily with my sister, and have prevailed." So she named him Naphtali.
राहेल म्हणाली, “मी माझ्या बहिणीशी प्रबळ स्पर्धा करून लढा दिला व विजय मिळवला आहे.” तिने त्याचे नाव नफताली ठेवले.
9 When Leah saw that she had stopped bearing, she took Zilpah, her servant, and gave her to Jacob as a wife.
जेव्हा लेआने पाहिले की, आता आपल्याला मुले होण्याचे थांबले आहे. तेव्हा तिने आपली दासी जिल्पा हिला घेतले आणि याकोबाला पत्नी म्हणून दिली.
10 Zilpah, Leah's handmaid, bore Jacob a son.
१०नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या मुलाला जन्म दिला.
11 Leah said, "How fortunate." So she named him Gad.
११लेआ म्हणाली, “मी सुदैवी आहे.” तेव्हा तिने त्याचे नाव गाद ठेवले.
12 Zilpah, Leah's servant, bore Jacob a second son.
१२नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला दिला.
13 Leah said, "Happy am I, for the women will call me happy." So she named him Asher.
१३लेआ म्हणाली, “मी आनंदी आहे! इतर स्त्रिया मला आनंदी म्हणतील” म्हणून तिने त्याचे नाव आशेर ठेवले.
14 Reuben went out during the wheat harvest and found mandrakes in the field, and brought them to his mother, Leah. Then Rachel said to Leah, "Please give me some of your son's mandrakes."
१४गहू कापणीच्या हंगामाच्या दिवसात रऊबेन शेतात गेला आणि त्यास पुत्रदात्रीची फळे सापडली. त्याने ती आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली. नंतर राहेल लेआस म्हणाली, “तुझा मुलगा रऊबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फळातून मला काही दे.”
15 She said to her, "Is it a small matter that you have taken away my husband? Would you take away my son's mandrakes, also?" Rachel said, "Therefore he may sleep with you tonight for your son's mandrakes."
१५लेआ तिला म्हणाली, “तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घेतलेस हे काय कमी झाले? आता माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळेही तू घेतेस काय?” राहेल म्हणाली, “तुझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे मला देशील तर त्याच्या बदल्यात आज रात्री तो तुझ्याबरोबर झोपेल.”
16 Jacob came from the field in the evening, and Leah went out to meet him, and said, "You must sleep with me; for I have surely hired you with my son's mandrakes." So he slept with her that night.
१६संध्याकाळी याकोब शेतावरून आला. तेव्हा लेआ त्यास भेटण्यास बाहेर गेली व ती म्हणाली, “आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर झोपणार आहात, कारण माझ्या मुलाची पुत्रदात्रीची फळे देऊन मी तुम्हास मोलाने घेतले आहे.” तेव्हा याकोब त्या रात्री लेआपाशी झोपला.
17 God listened to Leah, and she conceived, and bore Jacob a fifth son.
१७तेव्हा देवाने लेआचे ऐकले व ती गर्भवती राहिली आणि तिने याकोबाच्या पाचव्या मुलाला जन्म दिला.
18 Leah said, "God has given me my wages, because I gave my servant to my husband." So she named him Issachar.
१८लेआ म्हणाली, “देवाने माझे वेतन मला दिले आहे कारण मी माझी दासी माझ्या नवऱ्याला दिली.” तेव्हा तिने आपल्या मुलाचे नाव इस्साखार ठेवले.
19 Leah conceived again, and bore a sixth son to Jacob.
१९लेआ पुन्हा गरोदर राहिली व तिने याकोबाच्या सहाव्या मुलाला जन्म दिला.
20 Leah said, "God has given me a good gift. Now my husband will live with me, because I have borne him six sons." So she named him Zebulun.
२०लेआ म्हणाली, “देवाने मला उत्तम देणगी दिली आहे. आता माझा पती माझा आदर करील कारण मी त्याच्या सहा मुलांना जन्म दिला आहे.” तिने त्याचे नाव जबुलून ठेवले.
21 Afterwards, she bore a daughter, and named her Dinah.
२१त्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिने तिचे नाव दीना ठेवले.
22 God remembered Rachel, and God listened to her, and made her fertile.
२२मग देवाने राहेलीचा विचार केला आणि तिचे ऐकले. त्याने तिची कूस वाहती केली.
23 She conceived, bore a son, and said, "God has taken away my shame."
२३ती गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “देवाने माझा अपमान दूर केला आहे.”
24 So she named him Joseph, saying, "May God add another son to me."
२४तिने त्याचे नाव योसेफ ठेवले. ती म्हणाली, “परमेश्वर देवाने आणखी एक मुलगा मला दिला आहे.”
25 It happened, when Rachel had borne Joseph, that Jacob said to Laban, "Send me away, that I may go to my own place, and to my country.
२५मग राहेलीला योसेफ झाल्यानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “मला माझ्या स्वतःच्या घरी आणि माझ्या देशात मला पाठवा.
26 Give me my wives and my children for whom I have served you, and let me go; for you know the service I have given you."
२६ज्यांच्यासाठी मी तुमची सेवा केली आहे त्या माझ्या स्त्रिया आणि माझी मुले द्या आणि मला जाऊ द्या, कारण मी तुमची सेवा कशी केली आहे हे तुम्हास माहीत आहे.”
27 Laban said to him, "If now I have found favor in your eyes, stay here, for I have learned by divination that God has blessed me for your sake."
२७लाबान त्यास म्हणाला, “परमेश्वराने केवळ तुझ्यामुळे मला आशीर्वादित केले आहे हे मी जाणतो. जर तुझ्या दृष्टीने माझ्यावर तुझी कृपा असेल तर आता थांब.”
28 He said, "Name your wages, and I will pay it."
२८नंतर तो म्हणाला, “तुला काय वेतन द्यावे हे सांग आणि ते मी देईन.”
29 He said to him, "You know how I have served you, and how well your livestock have done with me.
२९याकोब त्यास म्हणाला, “मी तुमची सेवा केली आहे आणि तुझी गुरेढोरे माझ्याजवळ कशी होती हे तुम्हास माहीत आहे.
30 For you had little before I came, and it has increased abundantly. And God has blessed you wherever I worked. Now when will I also provide for my own household?"
३०मी येण्यापूर्वी तुम्हापाशी फार थोडी होती. आणि आता भरपूर वाढली आहेत. मी जेथे जेथे काम केले तेथे तेथे परमेश्वराने तुम्हास आशीर्वादित केले आहे. आता मी माझ्या स्वतःच्या घराची तरतूद कधी करू?”
31 He said, "What should I give you?" Jacob said, "You do not need to give me anything. If you will do this one thing for me, I will again pasture your flock and take care of it.
३१म्हणून लाबान म्हणाला, “मी तुला काय देऊ?” याकोब म्हणाला, “तुम्ही मला काही देऊ नका. जर तुम्ही माझ्यासाठी ही गोष्ट कराल तर मी पूर्वीप्रमाणे आपले कळप चारीन व सांभाळीन.
32 I will pass through all your flock today, removing from there every speckled and spotted one, and every black one among the sheep, and the spotted and speckled among the goats. This will be my wages.
३२परंतु आज मला तुमच्या सगळ्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार व प्रत्येक काळे व तपकरी असलेली मेंढरे व शेळ्यांतून तपकरी आणि काळ्या रंगाची ही मी बाजूला करीन; हेच माझे वेतन असेल.
33 So my honesty will testify for me later on, when the subject of my wages comes before you. Every one that is not speckled and spotted among the goats, and black among the sheep that I have in my possession, will be counted as stolen."
३३त्यानंतर तुमच्यापुढे असलेल्या माझ्या वेतनाविषयी हिशोब घ्यायला याल तेव्हा माझा प्रामाणिकपणा माझ्याकरिता साक्ष देईल, जर त्यामध्ये तुम्हास माझ्याजवळच्या शेळ्यांतले जे प्रत्येक ठिपकेदार व तपकरी नाही व मेंढरांतले जे काळे नाही ते आढळले, तर ते मी चोरले आहे असे समजावे.”
34 Laban said, "Look, let it be as you have said."
३४लाबान म्हणाला, “मी मान्य करतो. तुझ्या शब्दाप्रमाणे कर.”
35 That day, he removed the male goats that were streaked and spotted, and all the female goats that were speckled and spotted, every one that had white in it, and all the black ones among the sheep, and put them in the care of his sons.
३५परंतु त्याच दिवशी लाबानाने ठिपकेदार व बांडे एडके तसेच ठिपकेदार व बांड्या शेळ्या आणि मेंढरापैकी काळी मेंढरे कळपातून काढून लपवली, गुपचूप ती आपल्या मुलांच्या हवाली केली व त्यावर लक्ष ठेवून त्यांना सांभाळण्यास सांगितले;
36 He set three days' journey between himself and Jacob, and Jacob pastured the rest of Laban's flocks.
३६तेव्हा लाबानाने आपल्यामध्ये व याकोबामध्ये तीन दिवसाचे अंतर ठेवले. याकोब लाबानाचे बाकीचे कळप चारीत राहिला.
37 Jacob took fresh branches from poplar, almond and plane trees and made white streaks by peeling them, exposing white stripes on the branches.
३७मग याकोबाने हिवर व बदाम व अर्मोन या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या, त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या.
38 He set up the peeled branches which he had peeled opposite the flocks in the troughs, that is, the watering places where the flocks came to drink. And since they bred when they came to drink,
३८त्याने त्या पांढऱ्या फांद्या किंवा पांढरे फोक कळपांच्या समोर पाणी पिण्याच्या टाक्यात ठेवले जेव्हा शेळ्यामेंढ्या पाणी पिण्यास तेथे येत तेव्हा त्यांच्यावर त्याचे नर उडत व त्या फळत.
39 the flocks bred in front of the branches, and the flocks brought bore streaked, speckled, and spotted.
३९तेव्हा त्या काठ्यांपाशी शेळ्यामेंढ्यांचे कळप फळले आणि त्या कळपात बांडी व ठिपकेदार, तपकरी अशी पिल्ले झाली.
40 Jacob separated the lambs, and made the flocks face toward the streaked and all the black in the flock of Laban. So he kept his own flocks separate, and did not put them into Laban's flock.
४०याकोब कळपातील इतर जनावरांतून ठिपकेदार, पांढऱ्या ठिपक्यांची व काळी करडी कोकरे लाबानाच्या कळपापासून वेगळी करून ठेवत असे.
41 It happened, whenever the stronger of the flock were breeding, that Jacob would set up the branches in front of the flock in the troughs, so that they would breed near the branches;
४१जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरेसमोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्यांसमोर फळत.
42 but for the weaker of the flock, he did not put them there. So the weaker would be Laban's, and the stronger Jacob's.
४२परंतु जेव्हा दुर्बल जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरेसमोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे. म्हणून मग अशक्त नर-माद्यापासून झालेली करडी, कोकरे लाबानाची होत. आणि सशक्त नर-माद्यांपासून झालेली करडी, कोकरे याकोबाची होत.
43 Thus the man became very rich, and had large flocks, female servants and male servants, and camels and donkeys.
४३अशा प्रकारे याकोब संपन्न झाला. त्याच्यापाशी शेरडेमेंढरे, उंट, गाढवे व दासदासी हे सर्व भरपूर होते.

< Genesis 30 >