< Genesis 7 >

1 And God said to Noah, "Come with all of your household into the ship, for I have seen your righteousness before me in this generation.
नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “चल, तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस.
2 You shall take seven pairs of every clean animal with you, the male and his female. Of the animals that are not clean, take two, the male and his female.
प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या सात सात जोड्या घे, इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यापैकी, नर व मादी अशी दोन दोन घे.
3 Also of the clean flying creatures of the sky, seven pairs, a male and a female, and of all the unclean flying creatures, one pair, a male and a female, to preserve their offspring on the surface of all the earth.
आणि आकाशातल्या पक्षांच्या नर व मादी अशा सात जोड्या तुझ्याबरोबर तारवात ने. अशाने पृथ्वीवर त्यांचे बीज राहील.
4 In seven days, I will cause it to rain on the earth for forty days and forty nights. Every living thing that I have made, I will destroy from the surface of the ground."
आतापासून सात दिवसानी मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन. मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टींचा मी पृथ्वीवरून नाश करीन.”
5 Noah did everything that God commanded him.
परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.
6 Noah was six hundred years old when the flood of waters came on the earth.
जलप्रलय आला तेव्हा नोहा सहाशे वर्षांचा होता.
7 Noah went into the ship with his sons, his wife, and his sons' wives, because of the waters of the flood.
नोहा, त्याची मुले, त्याची पत्नी, आणि त्याच्या मुलांच्या स्त्रिया, हे सर्व जलप्रलयामुळे तारवात गेले.
8 Clean animals, animals that are not clean, flying creatures, and everything that crawls on the ground
पृथ्वीवरील शुद्ध व अशुद्ध पशुतून, पक्षी आणि जमिनीवर रांगणारे सर्वकाही,
9 went by pairs to Noah into the ship, male and female, as God commanded Noah.
देवाने नोहाला सांगितल्याप्रमाणे दोन-दोन नर व मादी असे ते नोहाकडे आले आणि तारवात गेले.
10 It happened after the seven days, that the waters of the flood came on the earth.
१०मग सात दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली.
11 In the six hundredth year of Noah's life, in the second month, on the seventeenth day of the month, on the same day all the fountains of the great deep were burst open, and the floodgates of the sky were opened.
११नोहाच्या जीवनातील सहाशाव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्व झरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरुन वाहू लागले. त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. आणि आकाशाच्या खिडक्या उघडल्या.
12 The rain was on the earth forty days and forty nights.
१२पावसास सुरुवात झाली आणि चाळीस दिवस व चाळीस रात्र पृथ्वीवर पाऊस पडत होता.
13 In the same day Noah, and Shem, Ham, and Japheth, the sons of Noah, and Noah's wife, and the three wives of his sons with them, entered into the ship;
१३त्याच दिवशी नोहा आणि त्याची मुले शेम, हाम आणि याफेथ आणि नोहाची पत्नी व त्यांच्या बरोबर त्याच्या मुलांच्या तीन बायकांनीही तारवात प्रवेश केला.
14 they, and every wild animal after its kind, and every tame animal after their kind, every creature that crawls on the earth after its kind, and every flying creature after its kind, everything with wings.
१४त्यांच्याबरोबर प्रत्येक रानटी प्राणी त्याच्या जातीप्रमाणे आणि प्रत्येक पाळीव प्राणी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे आणि पृथ्वीवर रांगणारी प्रत्येक गोष्ट तिच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, आणि प्रत्येक पक्षी त्याच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे, प्रत्येक प्रकारचा पंख असलेला प्राणी, यांनी तारवात प्रवेश केला.
15 They went to Noah into the ship, by pairs of all flesh with the breath of life in them.
१५ज्यांच्या शरीरात जीवनाचा श्वास आहे असे सर्व दोन दोन तारवात नोहाकडे आले आणि त्यांनी तारवात प्रवेश केला.
16 Those who went in, went in male and female of all flesh, as God commanded him; and God shut him in.
१६देवाने त्यास आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे देहधारी प्राणी नर व मादी असे तारवात गेले. मग परमेश्वराने दार बंद केले.
17 The flood was forty days on the earth. The waters increased, and lifted up the ship, and it was lifted up above the earth.
१७मग पृथ्वीवर चाळीस दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले.
18 The waters prevailed, and increased greatly on the earth; and the ship floated on the surface of the waters.
१८मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला, आणि तारू पाण्यावर तरंगू लागले.
19 And the waters rose very high on the earth. And all the high mountains that were under the whole sky were covered.
१९पृथ्वीवरील पाणी जोराने उंच आणि उंच वाढत गेले. आकाशाखालील सर्व उंच पर्वत पूर्णपणे त्याखाली झाकून गेले;
20 The waters rose and covered the highest mountains to a depth of more than twenty-six feet.
२०पाणी पर्वत शिखरावर पंधरा हातापेक्षा अधिक उंच इतके वर चढले.
21 And all flesh died that moved on the earth, flying creatures, and tame animals, and wild animals, and every creature that crawls on the earth, and all humankind.
२१पृथ्वीवरील हालचाल करणारे सर्व जिवंत प्राणी, सर्व पक्षी, गुरेढोरे, वनपशू, थव्याने राहणारे प्राणी, आणि सर्व मानवजात मरून गेले.
22 All in whose nostrils breathed the breath of life, of all that was on the dry land, died.
२२ज्यांच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता असे, कोरड्या जमिनीवरील सर्वजण मरण पावले.
23 Every living thing was destroyed that was on the surface of the ground, including people, animals, crawling creatures, and flying creatures of the sky. They were destroyed from the earth. Only Noah was left, and those who were with him in the ship.
२३अशा रीतीने देवाने सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला. पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला. केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होते तेच फक्त वाचले.
24 The waters prevailed on the earth one hundred fifty days.
२४एकशे पन्नास दिवस पृथ्वीवर पाण्याचा जोर होता.

< Genesis 7 >

The Great Flood
The Great Flood