< Matthew 8 >
1 And when he came down from the mountain, large crowds followed him.
१येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्यामागे जावू लागले.
2 And look, a leper came to him and worshiped him, saying, "Lord, if you want to, you can make me clean."
२तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात.”
3 And he stretched out his hand, and touched him, saying, "I am willing. Be cleansed." And immediately his leprosy was cleansed.
३तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” आणि लगेचच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला.
4 And Yeshua said to him, "See that you tell nobody, but go, show yourself to the priest, and offer the gift that Mushe commanded, as a testimony to them."
४मग येशूने त्यास म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”
5 And when he came into Kepharnakhum, a centurion came to him, asking him,
५मग येशू कफर्णहूम शहरात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्यास विनंती करत म्हणाला,
6 and saying, "Lord, my servant lies in the house paralyzed, grievously tormented."
६“प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय आजारी होऊन घरात पडून आहे.”
7 And he said to him, "I will come and heal him."
७येशू त्यास म्हणाला, “मी येऊन त्यास बरे करीन.”
8 And the centurion answered, "Lord, I'm not worthy for you to come under my roof. Just say the word, and my servant will be healed.
८तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अश्या योग्यतेचा मी नाही; पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.
9 For I am also a man under authority, having under myself soldiers. I tell this one, 'Go,' and he goes; and tell another, 'Come,' and he comes; and tell my servant, 'Do this,' and he does it."
९कारण मीही एक अधिकारी असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत. मी एकाला ‘जा’ म्हणले की तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हणले की तो येतो आणि माझ्या दासास ‘हे कर’ म्हणले की तो ते करतो.”
10 And when Yeshua heard it, he was amazed, and said to those who followed, "Truly I tell you, I have not found so great a faith with anyone in Israyel.
१०हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांस तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, मला इस्राएलात एवढा विश्वास आढळला नाही.
11 And I tell you that many will come from the east and the west, and will sit down with Avraham, and Iskhaq, and Yaquv in the kingdom of heaven,
११मी तुम्हास सांगतो की, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या पंक्तीस बसतील;
12 but the children of the Kingdom will be thrown out into the outer darkness. There will be weeping and grinding of teeth."
१२परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
13 And Yeshua said to the centurion, "Go your way. Let it be done for you as you have believed." And the servant was healed in that hour.
१३मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास ठेवला तसे तुला मिळाले आहे.” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.
14 And when Yeshua came into Kipha's house, he saw his mother-in-law lying sick with a fever.
१४नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले.
15 So he touched her hand, and the fever left her. She got up and served him.
१५तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; मग ती उठून त्याची सेवा करू लागली.
16 And when evening came, they brought to him many possessed with demons. He cast out the spirits with a word, and healed all who were sick;
१६मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी असंख्य दुष्ट आत्म्याने ग्रासलेल्यांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भूते केवळ शब्दाने घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले.
17 that it might be fulfilled which was spoken through Eshaya the prophet, saying, "He took our infirmities, and bore our diseases."
१७“त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
18 Now when Yeshua saw large crowds around him, he gave the order to depart to the other side.
१८मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना गालीलच्या सरोवरापलीकडे जाण्याची आज्ञा केली.
19 Then a scribe came, and said to him, "Teacher, I will follow you wherever you go."
१९तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्यास म्हणाला, “गुरूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”
20 And Yeshua said to him, "The foxes have holes, and the birds of the sky have nests, but the Son of Man has nowhere to lay his head."
२०येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.”
21 And another of the disciples said to him, "Lord, allow me first to go and bury my father."
२१मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एकजण त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला पित्याच्या मरणापर्यंत त्याच्याजवळ राहून, त्याच्या मरणानंतर त्यास पुरून येऊ द्या.”
22 But Yeshua said to him, "Follow me, and leave the dead to bury their own dead."
२२येशूने त्यास म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना आपल्या मरण पावलेल्यांना पुरू दे.”
23 And when he got into a boat, his disciples followed him.
२३मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्यही त्याच्यामागे चढले.
24 And look, a violent storm came up on the lake, so much that the boat was covered with the waves, but he was asleep.
२४तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता.
25 They came to him, and woke him up, saying, "Save us, Lord. We are dying."
२५तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत.
26 And he said to them, "Why are you fearful, O you of little faith?" Then he got up, rebuked the wind and the lake, and there was a great calm.
२६तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले.
27 And the men were amazed, saying, "What kind of person is this, that even the wind and the lake obey him?"
२७तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”
28 And when he came to the other side, into the country of the Gedraye, two people possessed by demons met him there, coming out of the tombs, exceedingly fierce, so that nobody could pass that way.
२८मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर त्यास दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असतांना भेटले; ते भयंकर हिंसक होते म्हणून त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते.
29 And look, they shouted, saying, "What do we have to do with you, Son of God? Have you come here to torment us before the time?"
२९तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हास पीडा द्यायला येथे आलेला आहेस काय?”
30 Now there was a herd of many pigs feeding far away from them.
३०तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता.
31 And the demons begged him, saying, "If you cast us out, permit us to go away into the herd of pigs."
३१मग ती दुष्ट आत्मे त्यास विनंती करू लागली की, तू जर आम्हास काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हास पाठवून दे.
32 And he said to them, "Go." And they came out, and went into the pigs, and look, the whole herd rushed down the cliff into the lake, and died in the water.
३२त्याने त्यास म्हटले, “जा,” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो संपुर्ण कळप कड्यावरून धडक धावत जाऊन समुद्रात पाण्यात बुडून मरण पावला.
33 And those who fed them fled, and went away into the city, and told everything, including what happened to those who were possessed with demons.
३३मग त्या डुकरांना चारणारे नगरांत पळाले आणि त्यांनी जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले.
34 And look, all the city came out to meet Yeshua. And when they saw him, they pleaded with him to leave their region.
३४तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्यास सीमेबाहेर जाण्याची विनंती केली.