< Matthew 18 >
1 In that hour the disciples came to Yeshua, saying, "Who then is greatest in the kingdom of heaven?"
१त्यावेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?”
2 He called a little child to himself, and set him in the midst of them,
२तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले,
3 and said, "Truly I tell you, unless you turn, and become as little children, you will in no way enter into the kingdom of heaven.
३आणि म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
4 Whoever therefore humbles himself as this little child, this one is the greatest in the kingdom of heaven.
४म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे.
5 Whoever receives one such little child in my name receives me,
५आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.
6 but whoever causes one of these little ones who believe in me to stumble, it would be better for him that a huge millstone should be hung around his neck, and that he should be sunk in the depths of the sea.
६परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे.
7 "Woe to the world because of stumbling blocks. For there will always be something to cause people to stumble, but woe to the person through whom the stumbling block comes.
७अडखळण्याच्या कारणामुळे जगाला धिक्कार असो! तरी अशा काही गोष्टी होत राहणारच, पण जे लोक या अडखळण्याला कारणीभूत होतील त्यांना फार हानीचे ठरेल.
8 If your hand or your foot causes you to stumble, cut it off, and cast it from you. It is better for you to enter into life maimed or crippled, rather than having two hands or two feet to be cast into the everlasting fire. (aiōnios )
८जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. दोन हात व दोन पाय असून सर्वकाळच्या कधीही न विझणाऱ्या अग्नीततुम्ही टाकले जाण्यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन सार्वकालिक जीवनात जावे जास्त बरे होईल. (aiōnios )
9 If your eye causes you to stumble, pluck it out, and cast it from you. It is better for you to enter into life with one eye, rather than having two eyes to be cast into the fire of Gihana. (Geenna )
९जर तुमचा डोळा तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या कारण एकच डोळा असला आणि तुम्हास सार्वकालिक जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यासह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे. (Geenna )
10 See that you do not despise one of these little ones, for I tell you that in heaven their angels always see the face of my Father who is in heaven.
१०सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.
११आणखी, जे हरवलेले त्यास तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे.”
12 "What do you think? If someone has one hundred sheep, and one of them goes astray, does he not leave the ninety-nine, go to the mountains, and seek that which has gone astray?
१२जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही?
13 If he finds it, truly I tell you, he rejoices over it more than over the ninety-nine which have not gone astray.
१३आणि जर त्या मनुष्यास हरवलेले मेंढरू सापडले तर त्यास कधीही न हरवलेल्या नव्याण्णव मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. असे मी तुम्हास खरे सांगतो,
14 Even so it is not the will of my Father who is in heaven that one of these little ones should perish.
१४तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.
15 "If your brother sins against you, go, show him his fault between you and him alone. If he listens to you, you have gained back your brother.
१५जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस.
16 But if he does not listen, take one or two more with you, that at the mouth of two or three witnesses every word may be established.
१६पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील,
17 If he refuses to listen to them, tell it to the church. If he refuses to hear the church also, let him be to you as an unbeliever or a tax collector.
१७जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.
18 Truly I tell you, whatever you bind on earth will be bound in heaven, and whatever you loose on earth will be loosed in heaven.
१८मी तुम्हास खरे सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले.
19 Again, truly I tell you, that if two of you agree on earth concerning anything that they will ask, it will be done for them by my Father who is in heaven.
१९तसेच मी तुम्हास खरे सांगतो की, जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघांचे कोणत्याही गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरता एकत्रित होऊन विनंती करतील तर ती. माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल;
20 For where two or three are gathered together in my name, there I am in the midst of them."
२०कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यांमध्ये मी आहे.
21 Then Kipha came to him and said, "Lord, how often can my brother sin against me, and I forgive him? Up to seven times?"
२१नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “प्रभू, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास सात वेळा क्षमा करावी काय?”
22 Yeshua said to him, "I do not tell you up to seven times, but up to seventy times seven.
२२येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा.”
23 Therefore the kingdom of heaven is like a certain king, who wanted to reconcile accounts with his servants.
२३म्हणूनच स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल. आपले जे चाकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरवले.
24 When he had begun to reconcile, one was brought to him who owed him ten thousand talents.
२४जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे लक्षावधी रुपयांचे कर्ज होते त्यास त्याच्याकडे आणण्यात आले.
25 But because he could not pay, his lord commanded him to be sold, with his wife and children, and all that he had, and payment to be made.
२५त्या देणेकऱ्याकडे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते, तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परतफेड व्हावी.
26 The servant therefore fell down and kneeled before him, saying, 'Lord, have patience with me, and I will repay you all.'
२६परंतु त्या चाकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन.
27 The lord of that servant, being moved with compassion, released him, and forgave him the debt.
२७त्या मालकाला आपल्या चाकराचा कळवळा आला, म्हणून त्याने त्या चाकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्यास सोडले.
28 "But that servant went out, and found one of his fellow servants, who owed him one hundred denarii, and he grabbed him, and took him by the throat, saying, 'Pay what you owe.'
२८नंतर त्याच चाकराचे काही शंभर चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे.
29 "So his fellow servant fell down at his feet and begged him, saying, 'Have patience with me, and I will repay you all.'
२९परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन.
30 He would not, but went and cast him into prison, until he should pay back that which was due.
३०पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरूंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत रहावे लागणार होते.
31 So when his fellow servants saw what was done, they were exceedingly sorry, and came and told to their lord all that was done.
३१घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या चाकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले.
32 Then his lord called him in, and said to him, 'You wicked servant. I forgave you all that debt, because you begged me.
३२तेव्हा पहिल्या चाकराच्या मालकाने त्यास बोलावले व तो त्यास म्हणाला, “दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले.
33 Should you not also have had mercy on your fellow servant, even as I had mercy on you?'
३३म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?”
34 His lord was angry, and delivered him to the tormentors, until he should pay all that was due.
३४मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही.
35 So my heavenly Father will also do to you, if you do not each forgive your brother his trespasses from your heart."
३५“जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही.”