< 2 Thessalonians 3 >
1 Finally, brothers, pray for us, that the word of the Lord may spread rapidly and be glorified, even as also with you;
१शेवटी बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की, जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे;
2 and that we may be delivered from unreasonable and evil people; for not all have faith.
२आणि हेकेखोर व दुष्ट मनुष्यांपासून आमचे संरक्षण व्हावे; कारण सर्वाच्या ठायी विश्वास आहे असे नाही.
3 But the Lord is faithful, who will establish you, and guard you from the evil one.
३परंतू प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हास स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील.
4 We have confidence in the Lord concerning you, that you both do and will do the things we command.
४तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल.
5 May the Lord direct your hearts into the love of God, and into the patience of Meshikha.
५प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
6 Now we command you, brothers, in the name of our Lord Yeshua Meshikha, that you withdraw yourselves from every brother who lives an undisciplined life, and not after the tradition which they received from us.
६बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या संप्रदायाप्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.
7 For you know how you ought to imitate us. For we were not undisciplined among you,
७आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही;
8 neither did we eat bread from anyone's hand without paying for it, but in labor and travail worked night and day, that we might not burden any of you;
८आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही; परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.
9 not because we do not have the right, but to make ourselves an example to you, that you should imitate us.
९तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास उदाहरण घालू द्यावे म्हणून असे केले.
10 For even when we were with you, we commanded you this: "If anyone will not work, neither let him eat."
१०कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.
11 For we hear that some among you are living an undisciplined life, who do not work at all, but are busybodies.
११तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबुड करतात, असे आम्ही ऐकतो.
12 Now those who are that way, we command and exhort in the Lord Yeshua Meshikha, that with quietness they work, and eat their own bread.
१२अशा लोकांस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे.
13 But you, brothers, do not be weary in doing well.
१३तुम्ही तर बंधूंनो, बरे करतांना खचू नका.
14 If anyone does not obey our word in this letter, note that person, that you have no company with him, to the end that he may be ashamed.
१४या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्यास लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका;
15 Do not count him as an enemy, but admonish him as a brother.
१५तरी त्यास शत्रू समजू नका, तर त्यास बंधू समजून त्याची कानउघडणी करा.
16 Now may the Lord of peace himself give you peace at all times in all ways. The Lord be with you all.
१६शांतीचा प्रभू हा सर्वकाळ सर्व प्रकारे तुम्हास शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो.
17 The greeting of me, Paul, with my own hand, which is the sign in every letter: this is how I write.
१७मी, पौलाने, स्वहस्ते लिहिलेला नमस्कार; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.
18 The grace of our Lord Yeshua Meshikha be with you all.
१८आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.