< 1 Chronicles 15 >
1 David made him houses in the City of David; and he prepared a place for the ark of God, and pitched for it a tent.
१दावीदाने दावीद नगरात स्वत: साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला.
2 Then David said, "No one ought to carry the ark of God but the Levites. For the LORD has chosen them to carry the ark of God, and to minister to him forever."
२मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच देवाचा कोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाळ परमेश्वराची सेवा करण्यासाठीच त्यांची निवड झाली आहे.”
3 David assembled all Israel at Jerusalem, to bring up the ark of the LORD to its place, which he had prepared for it.
३मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले.
4 David gathered together the sons of Aaron, and the Levites:
४दावीदाने अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही एकत्र जमवले.
5 of the sons of Kohath, Uriel the chief, and his brothers one hundred twenty;
५कहाथाच्या घराण्यातील उरीएल त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशें वीस माणसे होती.
6 of the sons of Merari, Asaiah the chief, and his brothers two hundred twenty;
६मरारीच्या कुळातला असाया हा त्यांचा नेता होता व त्याचे नातेवाईक दोनशे वीस माणसे होती.
7 of the sons of Gershom, Joel the chief, and his brothers one hundred thirty;
७गर्षोमच्या घराण्यातला योएल हा त्यांचा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक असे एकशेतीस माणसे होती.
8 of the sons of Elizaphan, Shemaiah the chief, and his brothers two hundred;
८अलीसाफानच्या घराण्यापैकी त्यांचा नेता शमाया होता व त्याचे नातेवाईक दोनशे माणसे होते.
9 of the sons of Hebron, Eliel the chief, and his brothers eighty;
९हेब्रोनाच्या वंशातला अलीएल त्यांच्या नेता होता व त्याचे नातेवाईक ऐंशी माणसे होते.
10 of the sons of Uzziel, Amminadab the chief, and his brothers one hundred twelve.
१०उज्जियेलाच्या घराण्यातला अमीनादाब हा प्रमुख होता व त्याचे नातेवाईक एकशें बारा माणसे होती.
11 David called for Zadok and Abiathar the priests, and for the Levites, for Uriel, Asaiah, and Joel, Shemaiah, and Eliel, and Amminadab,
११दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले.
12 and said to them, "You are the heads of the ancestral houses of the Levites. Sanctify yourselves, both you and your brothers, that you may bring up the ark of the LORD, the God of Israel, to the place that I have prepared for it.
१२दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आपल्या भावांसहीत आपणास पवित्र करा. यासाठी की, इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या कोशासाठी मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो आणावा.
13 For because you were not prepared the first time, the LORD our God made an outbreak against us, because we did not seek him according to the ordinance."
१३पहिल्या वेळी तुम्ही तो उचलून आणला नव्हता. आपण आपला देव परमेश्वर याच्या विधीचे पालन केले नाही किंवा त्याचा धावा आम्ही केला नाही, म्हणून त्याने आपल्याला शिक्षा दिली.”
14 So the priests and the Levites sanctified themselves to bring up the ark of the LORD, the God of Israel.
१४यावरुन याजक व लेवी यांनी इस्राएलाचा देव परमेश्वर याचा कोश आणण्यासाठी आपणांस पवित्र केले.
15 The descendants of the Levites bore the ark of God on their shoulders with the poles thereon, as Moses commanded according to the word of the LORD.
१५मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आज्ञा केली होती त्याप्रमाणे लेव्यांनी देवाच्या कोशास लावलेल्या त्याच्या काठ्या आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला.
16 David spoke to the chief of the Levites to appoint their brothers the singers, with instruments of music, stringed instruments and harps and cymbals, sounding aloud and lifting up the voice with joy.
१६दावीदाने लेवीच्या प्रमुखांना आज्ञा केली की, सतार, वीणा, ही तंतूवाद्ये, झांजा, ही संगीत वाद्ये मोठ्याने वाजवून आनंदाने उंच स्वराने गायन करणारे असे तुमच्या भावांतले गायकांची नेमणूक करा.
17 So the Levites appointed Heman the son of Joel; and of his brothers, Asaph the son of Berechiah; and of the sons of Merari their brothers, Ethan the son of Kushaiah;
१७लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलाचा पुत्र. आसाफ बरेख्याचा पुत्र. एथान कुशायाचा पुत्र. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
18 and with them their brothers of the second degree, Zechariah, and Jaaziel, and Shemiramoth, and Jehiel, and Unni, Eliab, and Benaiah, and Maaseiah, and Mattithiah, and Eliphelehu, and Mikneiah, and Obed-Edom, and Jeiel, and Azaziah were doorkeepers.
१८याखेरीज लेवीचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
19 So the singers, Heman, Asaph, and Ethan, were given cymbals of bronze to sound aloud;
१९हेमान, आसाफ आणि एथान हे गाणारे, यांना पितळेच्या झांजा मोठ्याने वाजवायला नेमले होते.
20 and Zechariah, and Jaaziel, and Shemiramoth, and Jehiel, and Unni, and Eliab, and Maaseiah, and Benaiah, with stringed instruments set to Alamoth;
२०जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे अलामोथ या सुरावर तंतूवाद्ये वाजवायला नेमले होते.
21 and Mattithiah, and Eliphelehu, and Mikneiah, and Obed-Edom, and Jeiel, and Azaziah, with harps tuned to the eight-stringed lyre, to lead.
२१मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे शमीनीथ सुरावर वीणा वाजवण्याच्या कामावर होते.
22 Chenaniah, chief of the Levites, was over the song: he instructed about the song, because he was skillful.
२२लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
23 Berechiah and Elkanah were doorkeepers for the ark.
२३बरेख्या आणि एलकाना हे कोशाचे रक्षक होते.
24 Shebaniah, and Joshaphat, and Nethanel, and Amasai, and Zechariah, and Benaiah, and Eliezer, the priests, blew the trumpets before the ark of God: and Obed-Edom and Jehiah were doorkeepers for the ark.
२४शबन्या, योशाफाट, नथनेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक देवाच्या कोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
25 So David, and the elders of Israel, and the captains over thousands, went to bring up the ark of the covenant of the LORD out of the house of Obed-Edom with joy.
२५अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.
26 It happened, when God helped the Levites who bore the ark of the covenant of the LORD, that they sacrificed seven bulls and seven rams.
२६परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
27 David was clothed with a robe of fine linen, and all the Levites who bore the ark, and the singers, and Chenaniah the master of the song with the singers: and David had on him an ephod of linen.
२७कराराचा कोश वाहून नेणाऱ्या सर्व लेव्यांनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायक प्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाने तागाचे एफोद घातले होते.
28 Thus all Israel brought up the ark of the covenant of the LORD with shouting, and with sound of the cornet, and with trumpets, and with cymbals, sounding aloud with stringed instruments and harps.
२८अखेर सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कराराचा कोश आणला. जयघोष करत रणशिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा अशी तंतूवाद्ये वाजवत त्यांनी तो आणला.
29 It happened, as the ark of the covenant of the LORD came to the City of David, that Mikal the daughter of Saul looked out at the window, and saw king David dancing and playing; and she despised him in her heart.
२९पण परमेश्वराच्या कराराचा कोश दावीद नगरात पोहचला तेव्हा शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून बाहेर पाहिले. तिने दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून तिने आपल्या अंतःकरणात त्यास तुच्छ लेखले.