< John 17 >
1 When he had thus spoken, Jesus raised his eyes to heaven and said. "Father, the hour is come. Glorify the Son, that thy Son may glorify thee;
१“या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर.
2 "since thou hast given him authority over all mankind, to give eternal life to all whom thou hast given him. (aiōnios )
२जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. (aiōnios )
3 "And this is eternal life, to know thee, the only true God, and Jesus Christ whom thou hast sent. (aiōnios )
३सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. (aiōnios )
4 "I have glorified thee on the earth; I have finished the work which thou gavest me to do.
४जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.
5 "And now, O Father, glorify thou me with own self, with the glory I had with thee before the world began.
५तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर.
6 "I have made known thy name to the men whom thou gavest me out of the world. Thine they were, and thou gavest them to me, and they have kept thy word.
६जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.
7 "They know now that whatever thou hast given me was from thee;
७आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत.
8 "for I have given them the words which thou gavest me; and they have received them, and they have believed that thou didst send me.
८कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले. असा त्यांनी विश्वास ठेवला.
9 "I am praying for them; I am not praying for the world, but for those whom thou hast given me; for they are thine,
९त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत.
10 "and all thine are mine, and mine are thine; and I am glorified in them.
१०जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व माझे आहे आणि त्यांच्याठायी माझे गौरव झाले आहे.
११आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.
१२जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.
१३पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो.
१४मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.
१५तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो.
१६जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.
१७तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
18 "As thou hast sent me into the world, even so I also have sent them into the world.
१८जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे.
19 "And for their sakes I dedicate myself, that they also may be thoroughly dedicated in the truth.
१९आणि त्यांनीही सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो.
20 "Nor do I pray for them alone, but for those also who believe in me through their word,
२०मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो
21 "that they may all be one, even as thou, Father, art in me and I in thee; that they also may be in us; in order that the world may believe that thou hast sent me.
२१की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
22 "And the glory which thou gavest me I have given them; that they may be one even as we are one,
२२तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे;
23 "I in them and thou in me; that they may be made perfectly one, so that the world may recognize that thou didst send me, and hast loved them as thou hast loved me.
२३म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.
24 "Father, it is my will that wherever I am these also, thy gift to me, may be with me, that they may see the glory, my glory which thou hast given me, because thou didst love me before the foundations of the world.
२४हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की, जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाचा पाया घातला त्यापुर्वी तू माझ्यावर प्रीती केली.
25 "O righteous Father, though the world knew thee not, I have known thee, and these have known that though didst send me.
२५हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे.
26 "And I have declared - and will declare - thy name unto them, that the love with which thou hast loved me may be in them, and that I may be in them."
२६मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”