< James 2 >
1 My brothers, do not hold the faith of the Lord Jesus, the Lord of Glory, in a spirit of caste.
१माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका
2 Suppose a man comes into your synagogue with a gold ring and dazzling clothes, and suppose a poor man comes in, also, in shabby clothes,
२कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला,
3 and you look up to him who wears the fine clothing, and say to him, "Sit here in this fine place!" and to the poor man you say, "Stand there!" or "Sit on the floor at my feet!"
३तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.”
4 are you not drawing distinctions among yourselves, and have you not become judges with evil thoughts?
४तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना?
5 Listen, my dear brothers, has not God chosen the poor of this world to be rich in faith, and to inherit the kingdom which he has promised to those who love him?
५माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?
6 But you have dishonored the poor man. Do not the rich oppress you and drag you to court?
६पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही?
7 Are they not blaspheming that glorious Name by which you are called?
७आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना?
8 If you are keeping the royal law, which says, Thou shalt love thy neighbor as thou dost thyself, you are doing well.
८खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात.
9 If you have the spirit of caste you are committing sin, and are convicted by the Law as transgressors.
९पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.
10 For if a man keeps the whole of the Law, and yet stumbles in one point, he is guilty of all.
१०कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो.
11 For he who said, Do not commit adultery, said also, Do not Kill. Now if you do not commit adultery, but if you do kill, you have transgressed the Law.
११कारण ज्याने म्हणले की, “व्यभिचार करू नको,” त्यानेच म्हणले की, “खून करू नको” आता, तू जर व्यभिचार केला नाहीस, पण तू खून केला आहेस तर तू नियमशास्त्र उल्लंघणारा झालास.
12 So speak and act like men who are to be judged by the law of liberty.
१२तर स्वातंत्र्याच्या नियमाप्रमाणे ज्यांचा न्याय होणार आहे त्यांच्याप्रमाणे बोला आणि करा.
13 For judgment is without mercy to the man who has showed no mercy. but mercy glories in the face of judgment.
१३कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.
14 My brothers, what good is it if any one says that he has faith, if he has no deeds? Can such faith save him?
१४माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की “माझ्याजवळ विश्वास आहे”; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय?
15 If a brother or sister be naked and in need of daily food,
१५जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल,
16 and one of you says to them, "Depart in peace, find warmth and food for yourselves," but at the same time you do not give the necessaries of the body, what good would that do them?
१६आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ?
17 In just the same way faith, if it have not deeds, is by itself a lifeless thing.
१७म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
18 Some one indeed may say, "You have faith, and I have deeds." "Then show me your faith," I answer, "apart from any deeds, and I will show you my faith by my deeds."
१८आता, कोणी मनुष्य म्हणेल की, “तुझ्याजवळ विश्वास आहे आणि माझ्याजवळ कृती आहेत.” तुझ्या कृतींशिवाय तुझा विश्वास मला दाखव आणि मी माझ्या कृतीवरून माझा विश्वास तुला दाखवीन.
19 You believe that God is one? You do well; even the demons believe, and they shudder.
१९एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भूतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात.
20 But do you want to be convinced, O foolish man, that faith apart from deeds is barren?
२०परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय?
21 Was not Abraham our ancestor justified by deeds, in that he offered up Isaac, his son, upon the altar?
२१आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा यज्ञवेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतीनी नीतिमान ठरला नव्हता काय?
22 You see how faith was cooperating with deeds, and faith was made perfect by deeds.
२२आता, त्याच्या कृतीबरोबर विश्वासाने कसे काम केले आणि त्या कृतीकडून विश्वास पूर्ण केला गेला, हे तुला दिसते का?
23 And the Scripture was fulfilled which said, And Abraham believed God, and this was imputed to him as righteousness, and he was called God’s friend.
२३‘अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व गणण्यात आले’, हे म्हणणारा शास्त्रलेख पूर्ण झाला आणि त्यास देवाचा मित्र म्हणण्यात आले.
24 You see, then, that it is by his deeds a man is justified, and not simply by his faith.
२४तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो.
25 In like manner was not Rahab, the harlot, justified by her deeds, in the fact that she received the messengers and sent them forth by another way?
२५तसेच राहाब वेश्येने जेव्हा जासुसांना आत घेतले व दुसर्या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतीनी नीतिमान ठरली नाही काय?
26 So just as the body without a spirit is dead, so faith is dead without deeds.
२६कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.