< Hebrews 2 >
1 For this reason we must pay the more earnest heed to the things which we have heard, for fear we should drift away.
१या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये.
2 For if the word uttered through angels stood firm, so that every transgression and act of disobedience met with its just retribution, how shall we escape if we neglect so great a salvation?
२कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते.
3 Which having begun to be spoken by the Lord, was confirmed to us by those who heard him;
३तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
4 God himself corroborating their testimony by signs and wonders and a variety of miraculous powers, and by gifts of the Holy Spirit imparted in accordance with his own will.
४देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
5 It is not to angels that God subjected the age to be, of which we are speaking.
५आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही.
6 But some one, somewhere, testified, saying. What is Man, that thou art mindful of him? Or any man, that thou carest for him?
६पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावा?
7 Thou hast made him only a little lower that the angels; With glory and honor hast thou crowned him; And hast set him to govern the works of thy hands;
७थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
8 Thou hast put all things under his feet. For this putting all things under man means leaving nothing not subject to him. But we do not yet see all things subject to him.
८तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवलेस.” देवाने सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्वकाही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.
9 What we do see is Jesus, who was made for a time a little lower than the angels, now crowned with glory and honor, because of the suffering of death, in order that through God’s grace he might taste death for every man.
९परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचीत कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
10 For it befitted him, for whom and through whom all things exist, in bringing many sons to glory, to make the Pioneer of their salvation perfect through sufferings.
१०देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले.
11 For both he who sanctifies and those whom he is sanctifying are all from One; for which reason he is not ashamed to call them brothers, saying.
११जो लोकांस पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधू म्हणण्यास लाजत नाही.
12 I will proclaim thy name to my brothers; In the midst of the Church I will hymn thy praises.
१२तो म्हणतो, मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन.
13 And again, I myself will put my trust in God. And again, Lo, I and the children God has given me.
१३तो आणखी म्हणतो, “मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन.” आणि तो पुन्हा म्हणतो, येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.
14 Therefore, since the children are sharers in flesh and blood, he also similarly partook of the same, in order that through death he might render powerless him that had the power of death, that is, the devil;
१४म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
15 And might deliver those who through fear of death had been subject to life-long bondage.
१५आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय ठेवून त्याचे दास असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे.
16 For assuredly it is not angels, nay, it is the offspring of Abraham, whom he is ever taking by the hand.
१६कारण खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नाही, तर अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो,
17 And so it was necessary that he should in all points be made like his brothers, so that he might become a compassionate and faithful high priest, in all that relates to God, to make reconciliation for the sins of the people.
१७या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा महायाजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते.
18 For inasmuch as he himself has suffered, being tempted, he is also able instantly to succor those who are tempted, he is also able instantly to succor those who are tempted.
१८कारण ज्याअर्थी येशूला स्वतः परीक्षेला व दुःखसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.